Showing posts with label भारतीय सण. Show all posts
Showing posts with label भारतीय सण. Show all posts

Wednesday, 1 July 2020

आणि राज्य त्याच्या हवाली करा

vijay shendge images

शिवशाही आणतो असं स्वप्न दाखवून जनतेवर अत्याचार करायचे हे योग्य नाही. घरकाम करणाऱ्या मंडळींना सोसायटीमध्ये प्रवेश द्या नाही तर गुन्हे दाखल करतो. घरातून बाहेर पडलात तर गुन्हे दाखल करतो. गाड्या जप्त

Saturday, 6 June 2020

सीझर आणि जोडवी

vijay shendge images
हिंदू धर्माला, हिंदू श्रद्धांना, हिंदू रितीरिवाजांना वेड्यात काढण्यात अनेकांना धन्यता वाटते. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ चालवली म्हणून देशातली अंधश्रद्धा दूर झाली असे काही नाही. आणि दाभोळकरांनी अवतार घेतला नसता तर आजही लोक गळ्यात काळ्या बाहुल्या बांधून फिरले असते असे नाही. माझी श्रद्धा आहे. परंतु अंधश्रद्धा मी देखील मानत नाही. माझ्यावर अंधश्रद्धा मनू नये हे संस्कार करायला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कोणी कार्यकर्ता आलेला नाही. 

काल वटपौर्णिमा होतो. आणि एका मुलीची वडाला फेऱ्या मारणाऱ्या बायकांचे नवरे मरत नाहीत का?

Tuesday, 11 October 2016

विजयादशमीसाठी शुभेच्छा पत्रे ( greeting for Vijaya Dashami )

दसऱ्यासाठी शुभेच्छा पत्रे , Greeting cards for Dasara



उशीर झालाय खरा. पण इकडून तिकडून उचलेलं शुभेच्छा पत्र पोस्ट कार्ड पोस्ट करण्यापेक्षा मला नव्यानं तयार केलेलं शुभेच्छा कार्ड पोस्ट करायला आवडतं. अर्थात पार्श्वभूमी गुगलवरनंच घेतलेली असते. पण

Friday, 15 January 2016

Indian Festival : मकरसंक्रांतीलाच एवढ महत्व का ?

काल गावाहून आलो. अनेकांनी मकरसंक्रांती संबंधित काहीतरी मिळेल या अपेक्षेने माझ्या ब्लॉगला भेट दिली होती. नवं काहीतरी द्यावं या हेतूनं बसलो. इकडून तिकडून थोडी माहिती गोळा केली. मनातल्या मनात काही ओळी आकाराला आल्या. एक भेटकार्ड तयार करून त्या त्यावर उतरवल्या. ते भेटकार्ड तुम्हाला मनापासून आवडेल अशी आशा आहे. 

Wednesday, 11 November 2015

दिवा म्हणजे नेमकं काय ?


अनेकांना अनेकांकडून दिवाळीच्या खुप शुभेच्छा आल्या असतील. त्याचा फार मोठा ढीग झाला असेल. त्यात आणखी भर. कोण आणि कशा शोधणार त्या ढिगातून माझ्या शुभेच्छा. कोण वाचणार हि पोस्ट ? कशासाठी वाचणार ? पण हि पोस्ट वाचायलाच हवी मित्रांनो. कारण

Thursday, 22 October 2015

अंधेर से देर......

खरंतर खूप उशीर झालाय. दुपारच्या जेवणाच्या वेळी सकाळचा चहा पुढ्यात आणून ठेवावा तसं काहीसं करतोय मी . पण म्हणतात ना , " अंधेर से…. देर भली. " तसं उशिरका होईना पण मला शहानपण सुचलंय ना. ' अंधेर से देर भली 'असा वाकप्रचार हिंदीत हे कि नाही मला माहित नाही. पण

Saturday, 21 March 2015

बहुजनांनी गुढी उभारू नये ?

सण आले, आषाढीला माउलींची पालखी पुण्यात आली अथवा आषाढ मेघ दाटले कि मला काय होतं कुणास ठाऊक पण माझ्यातला कवी एकदम जागा होतो. जाणीवपूर्वक मी कधीच काही लिहित नाही. पण सणांना अनुसरून काहीतरी लिहावंसं वाटतं. मग मी लिहितो. गेल्या गुढीपाडव्याला लिहिलेली ' गुढी का उभारतात ? ' हि गोष्ट अशीच स्फुरली होती. आणि खरंच का उभारत असतील गुढी

Wednesday, 22 October 2014

Diwali Greetings : दिवाळी माझ्या बैलाची


परवा गावाहुन निघालो. आता गावाकडंचं घर आठ - दहा दिवसासाठी बंद. तिथं दारात दिवा लावायलाही कुणी नाही. आम्ही सारे पुण्यात. दिव्यांच्या झगमगाटात.  गावाकडंचं दार अंधारात. दारात बांधलेला, अंधाराची सोबत करणारा माझा बैल पठाण ! अंधाराची सोबत करणारा माझा पठाण !

दिवाळीचं………….आकाशदिव्यांच………… पणत्यांचा………… दिवाळीच्या झगमगाटाचं कौतुक

Friday, 3 October 2014

Dussehra, Dasara : दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा.

( तुमच्यासाठी खाली भेटकार्ड दिलंय. ते भेटकार्ड आणि त्यावरच्या ओळी तुम्हाला आवडतील असा विश्वास वाटतोय. तुमच्या प्रतिक्रिया मिळतीलच. )

Friday, 19 September 2014

Shiv sena, BJP, Congress : शिवसेना माघार घेईल पण का आणि कशी ?

अर्ज भरण्याचे दिवस जवळ आलेत. आणि अजूनही युतीच्या जागा वाटपाच कोडं सुटलं नाही. राजेशाही थाटात उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुका झाल्यापासून भाजपावर दबाव टाकायला सुरवात केली होती. आणि भाजपानं निम्म्या जागांवर दावा सांगण्या अगोदर पासून शिवसेनेने मुख्यमंत्री पदावर दावा सांगायला सुरवात केली होती. पण आता युती शेवटचा आचका देत असताना उद्धव ठाकरे काढा घ्यायला तयार होतील असं दिसतय. पण का आणि कोणत्या अटीवर ते पाहू.

Saturday, 7 June 2014

social media and sex : जागरण गोंधळ आणि चावटपणा


जागरण गोंधळ. हिंदू संस्कृतीनुसार हि खंडोबाची पूजा. खंडोबाचा दरबाराच असतो हा. प्रत्यक्ष देवाचा. या दरबारात वाघ्या, मुरुळी असतात. टिमकीची तिडतीड असते. तुणतुण्याची तुणतुण असते. संभळाचं घुमणं असतं. आणि त्या सगळ्या तालावर मुरळीच थिरकणं असतं. हे सगळं रात्रभर सुरु असतं. इंद्राच्या दरबारात नाचणारी मेनकाच वाटत असते ती मुरळी. हे सारं छान वाटत असतं. पण त्यात मध्येच तमाशा सुरु होतो. अगदीच तमाशा नव्हे पण तमाशातल्या वगात असते तशी चावट जुगलबंदी. ती नकोशी वाटते. त्यातल्या काही शाब्दिक चावटपणाची उदाहरणं खाली देणारच आहे.

Sunday, 30 March 2014

Indian Festival : गुढी का उभारतात ?

गुढी का उभारतात त्याची गोष्ट -

छोट्या मित्रांनो,

उदया पाडवा तुम्हाला गोड गाठी आणि पापा दयाला हवा ना! म्हणून आज वेळ काढला.

हं, तर मग उदया काय आहे?

" माहित नाही म्हणताय ? छे ! तुम्हाला माहित नसणं शक्यच नाही. खरंच माहित नाही कि माझ्याकडून वदवून घ्यायचय. "

" खरंच माहित नाही म्हणताय. ठीक आहे. मी सांगतो,  उदया आहे गुढी पाडवा."

" हे काय ? आत्ता कोण म्हणालं ,” पाडवा,पाडवा, नीट बोल गाढ़वा ?”असं म्हणु नये. आज आपल्या हिंदू नव वर्षाचा पहिला दिवस. मग असं वाईट कशाला बोलायचं.?


"पाडवा, पाडवा नीट बोल गाढ़वा."

असं म्हणण्यापेक्षा -