Saturday 9 July 2016

Whats App वर कॉमेंट कशी द्यावी ?

How to give comment for Whats App post.

सगळ्या जगाला अडाणी समजून मी हि पोस्ट लिहितोय. पण तसे नाही याची मला जाणीव आहे. हे असं करता येतं याची माहिती मलाच आज झाली. अर्थात हे फिचर फार जुनाट नसून नवीनच आहे. परंतु माझ्यासारखे बापडे बिचारे कोणी असतील तर त्यांच्यासाठी हि पोस्ट आहे. आणि त्याहीपेक्षा मी ज्या चार सहा ग्रुपचा सभासद आहे त्यात कोणी हा पर्याय वापरल्याचे मी पहिले नाही म्हणून मी या विषयावर लिहायला घेतलं.   

whats app नं repaly हे फिचर आणलं खरं . पण ते फारसं प्रभावी नाही. मला वाटलं होतं ग्रुपमधल्या दोघांमधलं  संभाषण त्यांच्या त्या दोघांमध्येच मर्यादित ठेवण्यासाठी या फिचरचा उपयोग केला असेल पण तसं होत नाही.  आधी कमीत कमी स्क्रीनवर जास्त पोस्ट दिसायच्या. आता जर तुम्ही replay या ऑप्शनचं वापर केलात तर त्यात स्क्रीनवरील बरीच जागा व्यापली जाते. आणि मुख्य अथवा तुम्हाला हवी असलेली पोस्ट शोधण्यासाठी जास्त स्क्रोलिंग करावे लागते. आधी ग्रुपमधील होय , नाही , स्मायलीच्या पोस्टची संख्या वाढायची. या फिचरच्या साह्याने त्यावर नियंत्रण आणलं जाईल असं अपेक्षित होतं. पण तसं होत नाही.

या फिचरचा एकमेव फायदा आहे तो म्हणजे कोणी कोणाच्या कोणत्या पोस्टला कॉमेंट दिली आहे ते लक्षात येते.

असो कॉमेंट हा पर्याय कसा वापरायचा ते पाहू. -

१ ) ज्या पोस्टला तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. त्या पोस्ट वर तुम्ही तुमच्या पोस्टच्या संदर्भातली माहिती चेक करण्यासाठी जसे प्रेस करता तसे थोडावेळ प्रेस करा.ज्या पोस्टला तुम्ही उत्तर देऊ इच्छित आहात ती पोस्ट खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे निळी होईल. 

 २ ) आता तुम्हाला तुमचं स्क्रीन खालील प्रमाणे दिसेल. यातील  वरच्या बाजूला दिसणाऱ्या बारमधील चित्रातील खुणेवर क्लिक करा.



 ३ ) आता तुम्हाला ज्या पोस्टला उत्तर द्याचे आहे त्या पोस्टची सुरवात असणारी एक विंडो ओपन होईल. दिसणाऱ्या विंडोत तुमचे उत्तर टाईप करा.


 ४ ) नेहमीप्रमाणे अॅरो कि दाबून तुमचे उत्तर पोस्ट करा.

आता तुमचे उत्तर ज्या पोस्टला तुम्हाला उत्तर द्यायचे आहे त्याच पोस्टखाली दिसेल आणि इतरांना ते दिसणार नाही. ग्रुप मधील सभासदांनी या सुविधेचा नक्की लाभ घ्यावा.  

No comments:

Post a Comment