Monday, 9 March 2015

Love Poem , Prem Kawita : मी तुझ्या श्वासात आहे

स्त्री तिचं पाहिलं प्रेम कधीच विसरत नाही असं म्हणतात.पण खरंतर स्त्रीच काय कोणतीही व्यक्ती आयुष्यात कोणतीही घटना कधीच विसरत नाही. प्रेम तर कधीच विसरता येत नाही.
आणखी एक गोष्ट
जगात कुणाचंही प्रेम डोंगर उतारावरून एखादा दगड घरंगळत पायथ्याशी यावा इतक्या सहजपणे प्रेम कधी शेवटला जात नाही, किनाऱ्याला लागत नाही. अनेक अडचणी.........कधी घरच्यांचा विरोध........कधी समाजाचे शिंतोडे.........कधी परस्परातले गैरसमज...........कधी वैचारिक मतभेद..........कधी अपेक्षांच्या कठपुतळ्या. एक ना अनेक हजार अडचणी.

या सगळ्यातून तरून किनाऱ्याला लागणारं प्रेम एखादंच. इतर सगळ्याच्या पदरी एक हुरहूर. भोवतीने आठवणींचा पसारा. त्या आठवणींनी व्याकुळ होणारं काळीज. मग मनात आकार घेणाऱ्या ओळी. आपल्या प्रेमावरचा विश्वास पाहून आपल्याच ओठावर फुलणारं हसू.
प्रेम कविता

अशाच या ओळी. तिच्या मनात आकार घेणाऱ्या. खरंतर तिची केवढी भक्ती त्याच्यावर. केवढं प्रेम. पण नात्यागोत्यांच्या झटापटीत तिला तिच्या प्रेमाचा हात सोडवा लागतो.आयुष्याचं दान दुसऱ्या कुणाच्यातरी ओंजळीत द्यावं लागतं. ती तिथंही रमून जाते. चोहो अंगानं आयुष्य फुलवण्याचा प्रयत्न करते. पण कधी तरी मनात अशा ओळी आकार घेतात -

6 comments:

  1. आजकाल प्रेम म्हणजे काय हेच समजत नाही. आमच्या जनरेशनने मजाक उडवून टाकला आहे.
    आजकाल प्रेम कोणावर करावे हेच खरं समजत नाही.
    त्यामुळे प्रेम वगैरे च्या नादात पडण्यापेक्षा सरळ पालक जो काही निर्णय घेतील तो मान्य करावा.

    ReplyDelete
    Replies

    1. आकाशजी, आपला अभिप्राय अत्यंत मनस्वी आहे. खुप आवडला. आई वडील नेहमी मुलांच्या आणि कुटुंबाच्या हिताचाच विचार करत असतात. पण अनेकांना हे कळत नाही. लवकरच ' मुली पळून का जातात ? ' हा लेख लिहिणार आहे. आपली प्रतिक्रिया मिळेलच हि अपेक्षा.

      Delete
  2. मी एक Great Love Story लिहिलेली आहे. ती माझ्या मालवणी भषेमधून लिहिलेली आहे. तुम्हाला ती कधाचित आवडेल. तुमचा Email ID मला दया म्हणजे मी तुम्हाला त्यावर पाठविन.

    ReplyDelete
    Replies
    1. अक्षयजी, तुमची स्टोरी नक्की पाठवा. आपण चांगलीच लिहिली असेल हा विश्वास.shendgevijay2@gmai/.com

      Delete
  3. लेख खूपच छान विजयजी ....
    खर तर आजकाल प्रेम म्हणजे काय ....हे जास्तीत जास्त जणांना कळतच नाही ....
    कारण ते जे आवडल तेच करतात .....अनेकवेळा अस होत की ते केवळ आकर्षण असत दुसर काही नाही मग त्यालाच प्रेम समजू लागतात ..

    )तिचेच बोल आठवतो ...... :)

    तिचेच बोल पुन्हा पुन्हा आठवतो
    नाही म्हटलं तरी पुन्हा तिलाच मनात साठवतो .......!! धृ !!

    तिच्या मधुर आवाजातली गाणी
    आठवण येता तिची येतात माझ्या ध्यानी
    मग हळूच हृदयाच्या आत तिला सजवतो .........!! १ !!

    कधी कधी ती भलताच सल्ला देते
    कारण नसतानाही माझे मन रमते तेथे
    आणि मग तिच्याच स्वप्नात हरवतो .............!! २ !!

    उगचच वाटू लागत ती बोलते तेच खरे
    पण तिच्याविना तर भासच सारे
    आणि पुन्हा तिचीच सुंदर काया आठवतो .........!! ३ !!

    ती म्हणायची कुठेतरी दूर एकांतात जावे
    मग तिथेच आपले जीवन गाणे गावे
    आणि हेच बोल मी माझ्या कवितेत दडवितो.........!! ४ !!

    ती नसताना उठत मनात आठवणीच वादळ
    आणि मन तरंगात साचत तिच्याच प्रितीच तळ
    तिथेच माझ्या भावनांची गर्दी दाटवतो ............!! ५ !!

    तिला काय माहित तिच्या विना मी कसा जगतो
    तिला होऊ नये त्रास म्हणून जगाच्या नजरा चुकवितो
    तिच्याच साठी माझ्या कविता मी जुळवितो ..........!! ६ !!
    तिचेच बोल पुन्हा पुन्हा आठवतो
    नाही म्हटलं तरी पुन्हा तिलाच मनात साठवतो ......

    कवी :- विजय वाठोरे सरसमकर

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून आभार. आपली कवितासुद्धा खूप सुंदर आहे.

      Delete