अलीकडे प्रत्येकाला प्रसिद्धी हवी. परंतु आपल्याला प्रसिद्धी मिळताना आपण समाजाला काय देतो याचा विचार कोणीच करत नाही. बरं समाज सुद्धा असा आहे कि तो मरण पहायला सुद्धा गोळा होतो. पण कोणी चार शब्द चांगले सांगत असेल तर त्याभोवती कोणी गोळा होत नाही. तुम्ही बोधप्रद, वैचारिक लिहा. तुमच्याकडे कोणी वळून पहाणार नाही. छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीत ढोल वाजवायला आणि बाबासाहेबांच्या मिरवणुकीत 'चोली के पीछे'असो
वा'आवाज वाढव डिजे तुझ्या ...' या गाण्यावर नाचणारे अनेक भेटतील. परंतु याच मंडळींना व्याख्यानाला जा म्हटले तर
जातील का?वा'आवाज वाढव डिजे तुझ्या ...' या गाण्यावर नाचणारे अनेक भेटतील. परंतु याच मंडळींना व्याख्यानाला जा म्हटले तर
बार सर्वच माध्यम अशी आहेत कि त्यांना चांगल्या उपक्रमांना प्रसिद्धी द्यायची म्हटलं कि अगदीच जीवावर येतं. परंतु कोणी तरी मजूर नवरा बायको एका सिनेमाच्या गाण्यावर नाच करतात. टिक टॉक वरून तो व्हायरल होतो. आणि अगदी टीव्हीवाले सुद्धा त्याची दाखल घेतात. गोविंदा स्टाईल डान्स करणाऱ्या संजय श्रीवास्तव या पंचेचाळीस वर्षाच्या गृहस्थांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होतो. सगळेच न्यूज चॅनल त्यांची दखल घेताहेत म्हटल्यावर म्हाताऱ्या माणसांनी नाचून आपले व्हिडीओ समाज माध्यमांवर पोस्ट करणाऱ्या म्हाताऱ्या माणसांची अगदीच फौज आली. मग त्यात वयस्कर स्त्रिया सुद्धा मागे राहिल्या नाहीत.
काल तर लॉकडाऊन मध्ये घराबाहेर पडलेल्या तरुणांना पोलिसांनी दांडक्यांचा प्रसाद देण्याऐवजी गाण्यावर नाच करण्याची शिक्षा दिली. त्यांनीही ती आनंदाने स्विकारली. त्याला सगळ्याच न्यूजचॅनलने प्रसिद्धी दिली. असले चाळे करून टीव्हीवर झळकता येत असेल तर तसेच करणारी पैदास आमच्या देशात कमी नाही. जर आम्ही असे व्हिडीओ व्हायरल केले नाही, माध्यमांनी अशा मंडळींची कोणी दखल घेतली नाही तर कोणी तसे चाळे करणार नाही. अहो अत्यंत दर्जेदार कलावंतालाही त्याची बातमी यायला, न्यूज चॅनलने त्याची दखल घ्यायला आयुष्य खर्ची घालावे लागते.
पण नागवे नाचून प्रसिद्धी मिळत असेल तर लोक नागवेच नाचतील ना.
अगदी बरोबर... कोणत्याही मीडिया ने लोकांनीं अनुकरण केले पाहिजे अश्या जास्तीत जास्त चांगल्या बातम्या दाखवायला पाहिजे....
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
Deleteअगदी योग्य विचार.ठराविक समाज वर्गात वैचारिक दिवाळखोरी आहे व सरकारी सवलतिंमुळे हा सांमज अजुनच वैचारीक दिवाळखोरिकडे जात आहे.
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
Deleteखूपच छान सर
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.
Delete