Wednesday, 12 November 2014

BJP, Shivsena, NCP : उद्धवा आता तरी शहाणा हो !

शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंना निर्णय घ्यायला जमले नाही. काँग्रेसन विरोधी पक्ष नेतेपदावर दावा सांगितला म्हणुन आम्ही सांगितला. असं म्हणत आपण विरोधी पक्ष नेतेपदावर दावा सांगितला नसता तर आपली अवस्था , ' xxx xx , न घरका ना घटका. ' अशी झाली असती. हे उद्धव ठाकरेंनी मान्य केलं. गाळलेल्या जागी
काय शब्द असावेत याची जाणीव वाचकांना असेलच. म्हणजे नाही सत्तेत सहभाग मिळाला तरी तेवढं एक तरी पद पदरात पडून घेण्याची त्यांना अनिवार इच्छा आहे.


मी ' शरद पवारांची गुगली ' या लेखात शरद पवारांवर अत्यंत टोकाची टिका केली असली तरी शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंची तुलना करणं म्हणजे महाराष्ट्रातल्या सह्याद्रीची आणि गावाकडच्या टेकडीची तुलना केल्यासारखे होईल. कसं  ते पहा -

एकतर युती तुटल्यानंतर प्रचारादरम्यान शिवसेनेने भाजपावर टीका नको इतकी टिका केली. त्यातुन भाजपाचा तोटा झाला नाहीच पण शिवसेनेचा फायदाही झाला नाही.
शरद पवारांनी टीका केली पण ते कधीही भाजपाचे मित्रपक्ष नव्हते.

निकालानंतर उद्धव ठाकरेंनी एकतर भाजपाला बिनशर्त पाठींबा दयायला हवा होता किंवा सरळ विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घ्यायला हवी. बरं विरोधी पक्षात बसण्याची भुमिका घेण्यासाठी भाजपाला राष्ट्रवादीन जाहीर केलेला पाठींबा हे सबळ कारण शिवसेनेला पुढं करता आलं असतं.
शरद पवार मात्र धुरंधर. त्यांनी कोण काय म्हणेल याचा विचार न करता आपला पाठींबा देऊ केला.

भाजपाला बहुमतासाठी केवळ १५ आमदार कमी पडत असताना उद्धवरावांनी दोनास एक पदांची अपेक्षा केली. भाजपा आपली ही मागणी कधीच पूर्ण करणार नाही याचं भान उद्धव ठाकरेंनी बाळगायला हवं होतं. का ते मी माझ्या ' काय आहे भाजपाच्या मनात ' या लेखात स्पष्ट केलं आहे. 
शरद पवारांनी मात्र सत्तेचा कोणताही वाट मागितला नाही.

आणि आता शेवटच्या क्षणी विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगतानाच, चर्चा सुरूच राहील असं जाहीर केलं.
हे कुठलं धोरण.

खरंतर भाजपा आपल्या कोणत्याही दबावतंत्राला बळी पडत नाही याचा अनुभव जागा वाटपाच्या घोळापासून उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे. तरीही ते अजुनही त्याच तंत्राचा वापर करताहेत. यातून साध्या काहीच होणार नाही. पण दोन्ही पक्षातली दरी मात्र आणखी वाढेल. त्याचे परिणाम भविष्यात येणाऱ्या नगरपालिकांच्या आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीवर होतील. काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र लढले तर भाजपा शिवसेनेला एकत्र लढण्यावाचून पर्याय रहाणार नाही. पण उद्धव ठाकरे जे विष पेरताहते त्यातुन पुढच्या युतीच्या शक्यता अधिकाधिक मावळणार आहेत.    

अजुनही वेळ गेलेली नाही. अगदी या क्षणी शिवसेनेने भाजपाला बिनशर्त पाठींबा दयावा. कोणत्याही पदावर हक्क सांगू नये. भाजपानं दिलं तरी कोणतही पद घेऊ नये. पाच वर्ष भाजपाला निर्विघ्नपणे सरकार चालवू द्यावं. शिवसेनेने या क्षणी हा पावित्रा घेतला तर गोची भाजपाची होईल. आणि जनमानसातली शिवसेनेची आणि उद्धव ठाकरेंची प्रतिमा उंचावेल. महाराष्ट्राची सहानभूती मिळेल.

पण उद्धव ठाकरे असं काही करणार नाहीत. कारण आपल्यापुढे बसुन घोषणा देणारे आमदार आणि कार्यकर्ते म्हणजे अवघा महाराष्ट्र नव्हे हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. उशिरा का होईना पण शहाणं व्हायला हवं.   

15 comments:

  1. "उद्धवा अजब तुझा कारभार …!! विजय सर राजकारणातील मला अधिक काही कळत नाही पण तरीही शिवसेनेची आजची स्थिती घर न घाटका अशीच झाली आहे! शिवसेनेची स्वत:ची कोणतीच धोरणे स्पष्ट नाहीत … कोणाचा कुणाला पायपोस नाही ! कुठून तरी एखादे पद मिळवायचे आणि आपले सत्तेतले किंबहुना महाराष्ट्रातल्या राजकारणातील क्षुल्लक का होईना अस्तित्व टिकवण्याची दयनीय धडपड दिसते आहे …! आर या पार ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची नीति कुठेच दिसत नाही .!

    ReplyDelete
  2. समिधाजी प्रत्येक मतदाराला राजकारणातल खूप नाही कळालं तरी कोण आपलं आणि देशाचं भलं करेल हे नक्कीच कळायला हवं. माझा शिवसेनेलाच नव्हे तर देशातल्या तमाम स्थानिक, भाषिक , जातीय, प्रांतवादी पक्षांना विरोध आहे. हि मंडळी भारतातली लोकशाही अस्थिर करून आपला स्वार्थ साधण्यापेक्षा अधिक काहीच करणार नाहीत.

    ReplyDelete
  3. प्रसाद वैद्य12 November 2014 at 16:39


    नमस्कार सर ,
    मला आपले मत अजिबातच पटले नाही .
    आपण जे मघापासुन किंवा आधिच्या तुमच्या लेखामधुन मांडत आले आहात कि शिवसेनेने भाजपाला बिनशर्त पाठींबा द्यावा . मुळातच हा पाठिंबा का द्यावा हाच प्रश्न आहे .
    सत्तेत सहभागी होताना सन्मानजनक वागणुक मिळावी हाच खरा सेनेचा मुद्दा आहे असे मला तरी वाटतेय . आता तुम्ही म्हणाल निवडणुकीत सेनेने ज्या प्रमाणे भाजपवर हल्ला केला त्याच काय ? पण निवडणुकीच्या रणधुमाळीत जे झाले ते गंगेला मिळाले आता त्याच गोष्टी पुन्हा उगाळण्यात काय अर्थ आहे . आता तुम्हाला स्पष्ट बहुमत नसतान सेनेला बरोबर घ्यायला काय जातय पण चाणाक्याचा पक्ष असणार्या भाजपला सेनेची साथ मुळात नकोयच .

    मागे ज्यावेळी युती सरकार अस्तित्वात आले होते त्यावेळी भाजपाला जी खाती देण्यात आली होती ती खाती किंवा योग्य असा प्रस्ताव सेनेला देणे हे भाजपाचे काम आहे .
    पण एकीकडे भ्रष्टवादी काँग्रेसने न मागता दिलेला पाठींबा स्विकारायचा कि नाही त्यावर बोलायचे नाही आणि दुसरीकडे सेनेला तिष्टत उभे ठेवायचे हा कसला प्रकार .
    मुळातच शिवसेनेची भुमिका सुरवातीलाच चुकली त्यानी निकाल जाहीर झाल्यानंतर भुमिका मांडायला हवी होती कि आम्ही विरोधात बसु जनतेचा कौल हा आम्हाला नसुन आमच्या विरुध्द आहे तेव्हापासुन सेनेची जी फरफट चालु आहे ती बघवत नाही. परंतु आज ज्या पध्दतीने भाजपाने घटनेची पायमल्ली करुन विश्वासदर्शक ठराव मंजुर करुन घेतलाय त्या दृष्टीने त्यानी जनतेचा विश्वास थोडा फार का होइना पण गमावलाय (तुमचा गमावला नसेल ही वेगळी गोष्ट ).
    कोणाकोणाच्या मेंदुच्या साच्याच्या संदर्भात किंवा तत्सम प्रकारच्या गोष्टी बोलणे हे पुण्यात बसुन सगळ्या जगाची अक्कल मलाच अश्या व्यक्ती म्हणत असतात तुम्ही त्यातले नसाल ही अपेक्षा आहे पण नेहमी भाजपाच्या राजकारणाच्या बाजुने बोलायचे (जरी ते राजकारण अगदी हीन दर्जाचे असले तरीही ) किंवा शिवसेना आणि कॉंग्रेस वर नुसतीच पहावत नही म्हणुन टीका करायची हे योग्य नाही.




    (नोट. आपले लेख (ब्लॉग ) हे सुंदर असतात बहुतांशी त्यामधे चांगले विचार असतात आणि हे लेख मी वाचतोही परंतु प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देणे जमत नाही .
    आता ह्या घडीला माझे एवढेच म्हणणे आहे की आपण जरा निपक्ष राहुन लेख लिहत चला .)


    धन्यवाद

    ReplyDelete
  4. प्रसादजी आपण शिवसेनेचे समर्थक दिसता. अनेकांना सांगितली ती बाब तुम्हालाही सांगतो किंवा कदाचित सांगितलीही असेल कि मी शिवसेनेचाच आहे. अगदी नगरसेवक हे पद माझ्या घरात आहे. पण तरीही उद्धव ठाकरेंचे कोणतेच निर्णय आणि त्यांची ताठर भुमिका मला योग्य वाटली नाही. युतीचा सरकार आलं असतं तर मला आनंदच झाला असता.

    आणखी एक शिवसेनाच काय कोणत्याही स्थानिक पक्षाला माझ विरोध आहे. कारण हे स्थानिक पक्ष केवळ राजकीय अस्थैर्य निर्माण करतात. माझा राम नसलेला आठवले हा लेख आपण वाचलाही असेल. नसेल तर नक्की वाचवा. गरज म्हणून नव्हे पण आजच्या घडामोडींवर लिहिलेला लेख नक्की वाचावा. मी माझी भूमिका मांडली आहे. आजची भाजपाची कृती मलाही फारशी रुचली नाही. आपण म्हणता भाजपाने शिवसेनेला न्याय द्यायला हवा होता. पण मला सांगा विरोधात बसण्यापेक्षा शिवसेनेणे भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला असता तर काय बिघडले असते ? यातून शिवसेनेची प्रतिमा उंचावलीच असती. पण ह्ट्ट. आधी मिशन १५०+ आणि मुख्यमंत्रीपदाचा आणि आता दहा खात्यांचा.



    असो पण या सगळ्याचा आपल्या मैत्रीवर परिणाम होऊ नये हे नक्की.

    ReplyDelete
  5. प्रसादजी मैत्रीच्या आश्वासनाबद्दल आभार. पाहु यात. एक चुक महागात पडते कि भाजपानं जनहिताला दिलेलं प्राधान्य कामी येतं.

    ReplyDelete
  6. जाहीर निषेध , जाहीर निषेध , जाहीर निषेध
    आज हायकोर्टानी मराठा आरक्षणस स्थगिती दिली..
    मराठा विरोधी बीजेपी
    बीजेपी ला फ़क्त मराठा मतदान पाहिजे होते
    बीजेपी ने मराठा समाजाला गंडवले
    मराठा समाजाने अता तरी एकत्र यावे
    जो मराठा स्वताच्या समाजाचा नाही होउ शकत तो महाराष्ट्राचा पण नाही होऊ शकत
    देवेन्द्र फडनवीस यांचा मुख्यमंत्रीचा मराठा समजा तर्फे जाहिर निषेध

    जय जय जय मराठा
    जय जिजाऊ.../>
    जय शिवराय.../>
    जय शंभुराजे..../>
    जयस्तू मराठा.../>

    ReplyDelete
  7. मराठ्यांनो आपल्या हक्काला घोडा लागला.
    सरकारचा जाहिर निषेध .......#
    बामनी कावा ध्यानात घ्यावा.

    ReplyDelete
  8. मस्त. आवडला.

    ReplyDelete
  9. मित्रांनो कृपा करून निनावी प्रतिक्रिया देऊ नये. कारण मी कोणाला उत्तर देत आहे हे इतर वाचकांना कळण्यास मार्ग उरत नाही. आपण नाव टाकले तरी आपल्यावर कोणीही कसलीही कारवाई करणार नाही. कृपया अपशब्द वापरू नयेत. यापुढे अशा प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जाणार नाहीत.

    हे बरं आहे. आरक्षण दिलं काँग्रेस - राष्ट्रवादीनं. सर्वाधिक जागा मिळाल्या भाजपाला. यावरून एक लक्षात येते कि मतदारांनी आरक्षणासाठी मंदान नाही केलं. तसं असतं तर २५ टक्क्याहून अधिक असणाऱ्या मराठा समाजाची शंभर टक्के मते त्यांना मिळून तो पक्ष सत्तेत यायला हवा होता.

    ReplyDelete
  10. मित्रांनो कृपा करून निनावी प्रतिक्रिया देऊ नये. कारण मी कोणाला उत्तर देत आहे हे इतर वाचकांना कळण्यास मार्ग उरत नाही. आपण नाव टाकले तरी आपल्यावर कोणीही कसलीही कारवाई करणार नाही. कृपया अपशब्द वापरू नयेत. यापुढे अशा प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जाणार नाहीत. या ब्लॉगवर जातीयवादाला थारा नाही.

    ReplyDelete
  11. मित्रांनो कृपा करून निनावी प्रतिक्रिया देऊ नये. कारण मी कोणाला उत्तर देत आहे हे इतर वाचकांना कळण्यास मार्ग उरत नाही. आपण नाव टाकले तरी आपल्यावर कोणीही कसलीही कारवाई करणार नाही. कृपया अपशब्द वापरू नयेत. यापुढे अशा प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जाणार नाहीत

    ReplyDelete
  12. विजय सर यामध्ये लेखामध्ये तुम्ही फक्त भाजप ची बाजू घेताय असेच दिसते जरा मोदी लाठ दिसली म्हणून राज्य भाजप ने शिवसेनेला डावलले, विजय सर यामध्ये सगळी चूक भाजप ची आहे सत्तेला हपापले आहेत सर्व भाजप नेते. शिवसेनेला संपउ पाहत आहे
    भाजप.. पण ते अशक्य आहे आता बघा न कसे हात धरून शिवसेनेच्या मागे लागलेत भाजप वाले सत्तेत या म्हणून ,....
    .................................................................................एक कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक प्रसाद रावण

    आता ह्या घडीला माझे एवढेच म्हणणे आहे की आपण जरा निपक्ष राहुन लेख लिहत चला..............

    ReplyDelete
  13. प्रसादजी अभिप्रायाबद्दल आभार. आपण माझ्या ब्लॉगवरील केवळ एकाच पोस्ट वाचुन थांबला असाल. आणखी काही पोस्ट वाचा. माझा शिवसेनेला विरोध नाही. तर सर्वच स्थानिक पक्षांना विरोध आहे. चला क्षणभर शिवसेना जनतेचं हित फाटे असं मान्य करू. मग RIP कशाला, MIM कशाला, मेटेंचा शिवसंग्राम कशाला, जानाकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष कशाला ? प्रत्येक जण आपापल्या समाजाच्या मतांचं राजकारण करून आपापला स्वार्थ साधतो आहे. देशात केवळ दोनच पक्ष असावेत. मग ते भाजपा काँग्रेस असोत, भाजपा शिवसेना असोत, शिवसेना काँग्रेस असो अथवा अन्य कोणी नवल महत्व नाही. राज्यापासून केंद्रापर्यंत केवळ दोनच पक्षांचं राजकारण असायला हवं. फारतर दोन पक्षांना शह देऊ शकेल असा आणखी एक तिसरा पक्ष. पण त्या पक्षाची देशभर राजकारण करण्याची कुवत असावी. उदया शिवसेना देशव्यापी पक्ष म्हणुन उदयास आला तर मला दुखः वाटणार नाही. पण महाराष्ट्र हि आपल्या बापाची जहागीर असल्याच्या तोऱ्यात कुणी वागायचं कारण नाही.

    ReplyDelete
  14. विजयजी आपला ब्लॉग वाचत असतो,
    पण एक गोष्ट सातत्याने जाणवत राहते,
    कि आपण सैनिक असल्याचे सांगता आणी मनात मात्र पराकोटीचा सेना द्वेष असतो।।
    महायुती ६ पक्षांची होती, भाजपने त्यांचे जातियवादी राजकारणाचा विषप्रयोग करुन विधानसभेत सेनेला एकटे पाडून अणी ईतर ४ पक्षांना सोबत घेऊन जातिय ध्रुवीकरण करुन १२२ आमदार निवडूण आणले।।
    रिपाईमुळे दलित, रासपमुळे धनगर, मेटेंमुळे मराठा आणी स्वाभिमानी मुळे काही शेतकरी मते मिळविली, बाहेरुन राष्ट्रवादीचा पाठिंबा होताच तो विषय वेगळा।।
    एवढे सगळं करुनही शिवसेनेला संपवू शकले नाहीत आणी बहुमतही मिळवू शकले नाहीत।।
    सेनेला संपवायचा एवढा मोठा कट शिजत असताना उद्धव ठाकरेंनी गप्प राहून माघार घ्यायला हवी होती, बिनशर्त पाठिंबा द्यायला हवा होता ह्या तुमच्या भाबड्या अपेक्षा मला हास्यास्पद वाटतात।।
    असो, मि कॉग्रेस आणी सेना ह्या दोन्ही पक्षांना मानतो।।
    पूर्णवेळ कार्यकर्ता मात्र कुठल्याच पक्षाचा नाही।।
    रोहीत देशपांडे।।

    ReplyDelete