Saturday 5 July 2014

Sms : दिमाग का दही


मी माझ्या ब्लॉगवर इकडे तिकडे वाचेले  विनोदी SMS टाकतो. खरंतर हे SMS अनेकांनी कुठे ना नक्कीच वाचलेले असतील. तरी असे SMS मी पुन्हा माझ्या ब्लॉगवर टाकून काय साधणार कि नुसत्याच पोस्ट वाढवणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यावर मी एवढंच सांगेन कि हे SMS तुमच्यासोबत शेअर करताना त्यावर थोडं भाष्य करावं आणि वाचकांना सामाजिक चिमटा काढावा. 
परवा  माझ्या मुलाला आलेला असाच एक SMS . खूप सुरेख. पण प्रश्न पडला मुलांनी हा SMS  वाचून सोडून दिला तर  ठीक. मुलं जर त्याच भाषेत बापाशी बोलू लागली तर ?

मोबाईल  आणि इंटरनेट या गोष्टी आता मुलांच्या बोटावर आल्यात. मुलांना त्या कचाट्यातून सोडवणं आता फार अवघड आहे. मुलांना कशापासून किती दूर रहायचं याची जाणीव करून देणं एवढंच आपल्या हाती आहे. मुलांनी  ते समजावून घ्यावं  आणि स्वतःला घडवाव. असे फनी जोक्स वाचून त्यांचा आनंद घ्यावा आणि सोडून द्यावेत. आमच्या सरकारनं आठवीपर्यंत परीक्षा रद्द  केल्या असल्यातरी स्पर्धेशिवाय मजा नाही. आणि शिक्षणाशिवाय काही खरं नाही हेच वास्तव. हे वेळीच कळलं तर ठीक. हे कळायला उशीर झाला तर सगळा अंधारच.

एक मुलगा प्रत्येक वर्गात दोन-दोन वर्ष काढणारा. मुलं कितीही चुकली तरी त्यांच्यावर लक्ष ठेवणं आणि वेळोवेळी त्यांना समाज देणा हे आई बाबांचं कर्तव्यच.

SMS मधला आपल्या मुलाची परीक्षा जवळ आलेला असाच एक बाप आपल्या मूलाला समाज देताना म्हणतो -


बाप : अगर फिर एक्साम  में फेल हुआ तो मुझे बाप             मत  बोलना.

एक्साम के  बाद

बाप : आप का रिझल्ट कैसा  रहा ?


बेटा : दिमाग का दही मत कर बाबुलाल. तुने  बाप
होणे का अधिकार खो दिया है. 

No comments:

Post a Comment