Wednesday 4 March 2020

खरंच कोणी बांधला ताजमहाल? - भाग ३



जे राममंदिराचे झाले तेच 'तेजो महालय'चे झाले नसेल कशावरून? १५२७ मध्ये राममंदिराची बाबरी मशीद होऊ शकते तर १६२८ मध्ये 'तेजो महालय'चे 'ताजमहाल' झाले नसेल कशावरून? 'ताज' हा तसा संस्कृत शब्द. परंतु कालौघात तो राजकीय गादीला उद्देशून हिंदी / उर्दू रूढ झाला. त्यामुळेच शहाजानने प्लायवर फॉर्मायका ( लॅमिनेशन ) लावून त्याला चकचकीतपणा आणावा तसे 'तेजोमहालय'चे काहीसे नूतनीकरण करून त्याचेच 'ताजमहल' नामकरण केले नसेल कशावरून? इतिहासकारांनी संशोधन क
रून वास्तव जनतेसमोर मांडावे.

तेजोमहालय हिंदू राजा परमार देव यांनी ११९६ मध्ये बांधला होता असे काही मंडळींचे म्हणणे आहे. ताजमहालाच्या जागेवर हिंदू राजा जय सिंग यांची हवेली होती. ती जागा राजा जयसिंग यांच्याकडून शहाजानने विकत घेतली होती असे इतिहासकार राणा सफ्वी मान्य करतात. परंतु ज्या मुघल सम्राटांनी लाखो हिंदूंची कत्तल केली, अनेक मंदिरे जमीनदोस्त करून तिथे मशिदी बांधल्या, कित्येक हिंदू राजांचा पराभव करून त्यांच्या राण्यांचा समावेश स्वतःच्या जनानखान्यात केला ते मुस्लिम सम्राट एका हिंदू राजाची जमीन खरेदी करत बसतील कि बळकावतील? 

काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना  आणि इतर हिंदू विरोधी धुरिणांना आजच  जशी बाबरी मशीद पाडण्यात आली तसाच ताजमहाल सुद्धा पाडण्यात येईल काय अशी
धास्ती वाटू लागली आहे. या संदर्भात कोर्टात सादर करण्यात आलेल्या याचिका सुप्रीम कोर्टाने आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. त्या याचिका कोणत्या पुराव्याच्या आधारे फेटाळण्यात आल्या हे सदर याचिका कर्त्यांना सांगण्यात आलेले नाही. पण इतिहासकारांनी सत्य शोधायला हवे हे मात्र नक्की.

मुळात कोणतीही वास्तू नदीकिनारी बांधू नये असा मुस्लिम धर्मात अलिखित नियम आहे. त्यामुळे त्यांची कब्रस्थाने असोत, मशिदी असोत पाणवठ्याच्या जवळपास असल्याचे दिसत नाही हिंदू धर्मात मात्र नदीचे स्थान पूजनीय असल्यामुळे बहुतांश मंदिरे नदीकिनारी स्थापन करण्यात आली आहेत. इंग्रज असोत व मुघल हिंदू संस्कृती मोडून काढण्यात त्यांना अधिक रस होता. हिंदूंच्या धर्मपरिवर्तनासाठी त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच ताज महाल हे तेजो महालय असल्याचे सिद्ध करण्याची गरज निर्माण झाली आहे. ताजमहाल वरील कमळाचे कोरीवकाम, जमिनीपासून उंचीवर असलेले काम, घुमटाचा आकार अशा कितीतरी गोष्टी ती वास्तू हिंदू राजाने निर्मिल्याची साक्ष देत आहेत. गरज आहे ती इतिहासकारांनी पाठबळ देण्याची.

अर्थात कोणी पाठबळ देवो अथवा न देवो, बाबरी मशीद जमीनदोस्त करण्यात आली त्याच प्रमाणे एका ना एक दिवस हिंदू ताजमहाल हे तेजो महालय असल्याचे सांगत त्याच्या अंतर्गत भागात असलेल्या शिवाची पूजा सुरु करतील हे नक्की.

कुतुबमिनार असो वा राम मंदिर असो वा ताजमहाल असो आक्रमक म्हणून या देशात आलेल्या मुगलांना आपल्या देशात अशा भव्य दिव्य वास्तू उभारण्याचे काही कारण नव्हते. आपण हि भूमी बालकावलेली आहे. शेरास सव्वाशेर कोणीतरी भेटेल आणि आपण गिळंकृत केलेला भूभाग पुन्हा ताब्यात घेईल याची कात्री त्यांना असणार. त्यामुळेच त्यांनी स्वतः फार कमी काम केले असेल आणि आणि हिंदूंनी बांधलेल्या वस्तूंचे थोडेफार नूतनीकरण करून अथवा नुसतेच त्यांचे नाव बदलून त्यावर अधिकार सांगितला असेल हे मुळीच नाकारता येत नाही.

३ भागातील शेवटचा भाग 

विजय शेंडगे 

No comments:

Post a Comment