Thursday 15 January 2015

Indian Festival : मकरसंक्रांत का साजरी करतात ?

मागेही मी ' चैत्री पाडव्याला गुढी का उभारतात ? '  हे सांगितलं होतं.  तसंच ' गणेशोस्तोव अर्थात गणेश जयंती का साजरा करतात ? ' याची कहाणीही दोन भागात सांगितली होती. तसंच आज मकरसंक्रांत का साजरी करतात हे सांगणार आहे. सोबतच तळाचं भेटकार्ड आणि त्याच्यावरचं शब्दांचं तिळगुळ तुम्हाला आवडेल हि अपेक्षा. 


प्रत्येक सण म्हणजे एक चैतन्य असतं. मग तो सण कुणाचाही असो. मुस्लिमांची ईद असो, ख्रिश्चनांचा नाताळ असो, पारशींचा पतेती असो, शिखांचा बैसाखी असो अथवा बौद्ध साजरा करतात तो बाबासाहेबांचा महानिर्वाणदिन असो. प्रत्येक सण फक्त आनंद आणि उत्साह घेऊन येतो. इतर समाजाच्या सणांच्या अख्यायिका फार सरळ सरळ असतात.पण हिंदूंचा प्रत्येक सण साजरा करण्याला विशेष अर्थ आहे. आणि म्हणुनच आज तुम्हाला केवळ मकरसंक्रांतीच्या नुसत्या शुभेच्छा देऊन जमणार नाही तर मकरसंक्रांत का साजरी करतात ?  हे सांगायला हवं . 

बारा राशी असतात. हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे. ज्या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला संक्रांत म्हणतात. आजच्या दिवशी सुर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणुन आजच्या दिवसाला मकरसंक्रांत म्हणतात.    

बारा महिन्यांच्या बारा राशी असतात. म्हणजेच प्रत्येक महिन्यात सूर्य दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्यामुळेच प्रत्येक महिन्यात संक्रांत असते. मग मकरसंक्रांतीलाच एवढ महत्व का ? 

२२ डिसेंबर पासुन उत्तरायण सुरु झालेले असते. दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागलेली असते. सुर्य भारताच्या अधिकाधिक जवळ येऊ लागतो. अंधार हे वाईटाचं तर प्रकाश हे चांगुलपणाचं प्रतिक मानतात. अंधार हे अधोगतीच तर प्रकाश उन्नतीच द्योतक आहे. सहाजिकच मकरसंक्रांतीचा दिवस वाईट गोष्टींच्या निर्मुलनाच्या आणि चांगल्या गोष्टींच्या आगमनाचा दिवस मानला जातो. आणि सण म्हणुन साजरा केला जातो. 

दिवस मोठा झाल्यामुळे प्रत्येक प्राणिमात्राला, वनस्पतीला अधिक उर्जा मिळू लागते. वसंत ऋतूच्या आगमनाला अनुकूल परिस्थिती निर्माण होते. फुलण्याची, मोहरण्याची प्रक्रिया आजच्या दिवसापासून सुरु होते. आजपासून वाढणारा उन्हाचा चटका उदयाच्या पावसाची रुजवात करणार असतो. थोडक्यात उद्याच्या भाग्योदयाची……. येणाऱ्या भविष्याची सुरवात आजपासुन होणार असते, म्हणुन आजचा दिवस सण म्हणून साजरा केला जातो. तिळगुळ देऊन प्रत्येकाच्या आयुष्यात गोडवा पेरला जातो. आज दिलेल्या,मिळालेल्या शुभेच्छा या नुसत्या शुभेच्छा नसतात तर वर्षभराच्या उज्ज्वल भविष्याची रुजवात असते.   

तेव्हा माझ्या तुम्हाला मनापासुन शुभेच्छा …… उदयाच्या उज्वल भविष्याच्या रुजवातीसाठी.  संक्रांतीच्या

तिळगुळ म्हणजे प्रेम असतं
तिळगुळ म्हणजे असते माया,
तिळगुळ म्हणजे संस्कृतीच्या
अत्तराचा असतो फाया.

अत्तराचा फाया हा
प्रत्येकानं जपावा,
अवती भोवती सगळीकडे
फक्त गोडवा शिपावा.

   
Tilgul
Tulgul , तिळगुळ 



                 



4 comments:

  1. उत्तरायण केव्हाच २२ डिसेंबरला सुरू झाले. आपण याची नोंद कधी घेणार कीं संक्रांत व उत्तरायण यांचा बादरायण संबंधहि उरलेला नाही. आता संक्रांत १५ जानेवारीला सरकली आहे आणखी ७० वर्षांनी ती १६ जानेवारीला होईल. उत्तरायण आहे तेथेच राहणार आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रभाकरजी, आपण रिमझिम पाऊसला पहिल्यांदाच भेट देताय. आपले मनपूर्वक स्वागत. आपण म्हणताय ती चूक लिहिण्याच्या ओघात झालेली आहे. परंतु २२ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस असतो. आणि तेथुन पुढे उत्तरायण सुरु होते. तर २६ जुन सर्वात मोठा दिवस असुन तिथून पुढे दक्षिणायन सुरु होते. आणि दिवस लहान होत जातो. याची मला जाणीव आहे. अभिप्रायाबद्दल आभार.

      Delete
  2. सदाशिव शिंदे15 January 2015 at 18:16

    आज पहिल्यांदाच तुमच्या ब्लॉगला भेट दिली. खूप छान लिहिताय. राजकीय लेखन करताना भाजपा धार्जिणे वाटता. पण लिखाण उत्तम आहे. यापुढे नियमित वाचणार. तुम्हालाही मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. सदाशिवजी, आपण रिमझिम पाऊसला पहिल्यांदाच भेट देताय. आपले मनपूर्वक स्वागत. अभिप्रायाबद्दल आभार.

      Delete