' पर्सन ऑफ द इअर ' ठरविण्यासाठी ABP माझानं ओट पोल घेतला. या निकलातून सगळ्यांनीच बोटे तोंडात घालावीत असे निकाल जनतेसमोर आले. अगदी सुरवातीला या ओटपोलमध्ये उद्धव ठाकरेंना ५८ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आणि शिवसैनिकांमध्ये एकदम चैतन्य संचारले. ' एकच साहेब…….' , ' शिवसेनेचा वाघ…….' अशा अडगळीत पडलेल्या प्रतिक्रिया फेसबुकवर दिसू लागल्या. मतदानाच्या अखेरच्या दिवसापर्यंत उद्धव ठाकरेंना
अरविंद केजरीवालांनी २ ते ३ टक्क्यांनी मागे टाकले. आणि उद्धव ठाकरेंना मतदान करण्यासाठी शिवसैनिक एकमेकांना आव्हान करू लागले.
अखेरीस ABP माझाच्या या ओट पोलमध्ये अरवंद केजरीवालांनी बाजी मारली. उद्धव ठाकरे ४१ टक्के मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले. पण हे ओट पोल काही केवळ उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल या दोघांसाठीच घेण्यात आलेले नव्हते. अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे तर पोलच्या यादीत होतेच. पण आज जगभर ज्यांचा गवगवा झालाय ते भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोडी सुद्धा त्या यादीत होते.
अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांची नावं बाद करू या. पण जगभरातल्या प्रसिद्ध व्यक्तींसाठी ' टाईमं नियतकालिकाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ' पर्सन ऑफ द इअर ' . या उपाधीसाठी घेण्यात आलेल्या पोलमध्ये नरेंद्र मोदी १०.८ टक्के मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले. आणि ABP माझाच्या ओट पोलमध्ये मोदी तिसऱ्या क्रमांकावर राहतात हे कसे पटावे ?
एकीकडे जगातले अनेक पोल मोदींना जगभरात प्रथम अथवा द्वितीय क्रमांक भाल करीत असताना, फेसबुकवर मोदींच्या बहुतेक पोस्टला लाखो लाईक आणि हजारो प्रतिक्रिया मिळत असताना, ABP माझाच्या ओट पोलमध्ये मोदी तिसऱ्या क्रमांकावर कसे फेकले जातात ? बातम्या देण्या खेरीज ABP माझानं इतर उद्योग करूच नयेत. कारण या असल्या उद्योगांमुळे मोदींची लोकप्रियता कमी होत नसते पण ABP माझाची विश्वासर्हता नक्कीच कमी होते.
एकवेळ उद्धव ठाकरेंपेक्षा केजरीवालांना अधिक मते मिळणे मी समजू शकतो. कारण आण्णाच्या आंदोलनात सक्रीय असल्यामुळे नाही म्हणाले तरी केजरीवालाना राष्ट्रीय प्रतिमा लाभली आहे. त्यामुळेच त्यांचा आवाका राष्ट्रीय नेत्याचा आहे. पण उद्धव ठाकरेंची झेप महाराष्ट्राच्या कुंपणापर्यंत असताना उद्धव ठाकरेंना ४१. % मते कशी मिळू शकतात ?
असो. मोदींपेक्षा उद्धव ठाकरेंना अधिक मते मिळाल्यामुळे मला वाईट वाटले नाही. उलट उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय मान्यता मिळाली, आणि महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून ते राष्ट्रीय राजकारणात एक सक्षम पर्याय म्हणुन पुढे आले तर मला आनंदच वाटेल. पण असले पोल कुणाची लोकप्रियता जोखू शकत नाहीत हे मात्र नक्की.
या पोलवर विश्वास ठेवणे शक्यच नाही.
ReplyDeleteकिरणजी, पण शिवसेनेच्या समर्थकांना हे पटणार नाही.
Deleteउद्धव ठाकरेंच्या विरोधात लिहिल्यानंतर आपल्याला कोणते समाधान मिळते ?
ReplyDeleteविनयजी, प्रथमता आपण आपले मत अत्यंत सभ्य भाषेत नोंदवलेत त्याबद्दल आभार. मी शिवसेनेचाच आहे. आणि आज माझी बहीण शिवसेनेची नगरसेवक आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर टीका करणे हा माझ्या लेखनाचा हेतू कधीही नसतो. कृपया गैरसमज करून घेवू नये. असेच भेटत रहा
Deleteयोग्य आणि परखड लेख.
ReplyDeleteप्रथमेश प्रतिक्रियेबद्दल आभार. अनेकांना मात्र मी जाणीव पूर्वक उद्धव ठाकरेंवर टीका करतोय असे वाटते.
DeleteSurekh Blog aahe Keep it up
ReplyDeleteSubmit This Blog in Blog directory
http://directory.blogdhamal.com/
अजिंक्यजी ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आणि आपल्या सल्ल्याबद्दल मनापासुन आभार. गावी शेतावर गेलो होतो. त्यामुळे उत्तर द्यायला वेळ झाला. आपण दिलेली लिंक ओपन होत नाही.
ReplyDelete