अलीकडे माणसांच्या चांगुलपणाचे अनुभव अभावानेच येतात. परस्पर सहकार्याची भावना खूप अभावाने आढळते. बसमधला प्रवास दहा वीस मिनिटांचा. फारतर अर्ध्या तासाचा.पन तेवढ्यासाठी महिलांच्या राखीव जागेवर बसलेल्या पुरुषाला स्त्री उठवते. एखादयाने नकार दिला तर
आरक्षणाची छडी उगारते. स्त्रियांच्या राखीव जागेत जागा रिकामी नसेल आणि एखादी मुल कमरेवर घेऊन उभी असेल तर स्त्री तर नाहीच नाही पण पुरुषही स्त्रीलासुद्धा आपली जागा देत नाहीत.
मी माझी नौकरी सोडून गावी गेलो. सवय नसतानाही हिंमतीने शेती करतोय. परंतु भवतीचे सगेसोयरे सहकार्य करण्याऐवजी मला त्रास कसा होईल आणि मी शेती पडीक टाकून पुन्हा पुण्यात कसा निघून जाईल याचाच विचार अधिक करतात. माझी फार अपेक्षा नसतेच कुणाकडून. पण तरीही मी प्रत्येकाला सहकार्य करत रहातो. वेळ आली तर पाठीशी उभी रहातील अशी वाट पहातो. माझ्या भुमिकेमुळे चार सहा जणांची भुमिका बदलतेय. बरं वाटतं. त्यामुळे मनाला पालवी फुटते.
का जमत नाही आपल्याला सगळ्यांशी प्रेमाने वागायला ? आपला अहंकार, आपला स्वार्थ, आपला मोह, आपला लोभ का आडवा येतो ? खरंच आपल्या जगण्याचं प्रयोजन काय ? का नाही आपण माणूस म्हणून प्रत्येकावर निख्खळ प्रेम करू शकत ? अवतीभवती सारं जग असं वागताना, एकमेकांना पाण्यात पहात असताना आपली जगण्याची उमेद संपते. वाटत का जगतो आहोत आपण ? कशासाठी लिहितो ब्लॉग ?
ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीने, तुकारामच्या गाथेन जिथं या जगाची मानसिकता बदलत नाही तिथं माझ्या सारख्या किडा - मुंगी सारख्या जीवानं लिहून काय फरक पडणार आहे ? का ह्या कानपिचक्या आणि उपदेश देत बसतो मी जगाला ? बस्स...........बस्स !!! थांबवावं सारं.
पण मग वाटतं नाही असं नाउमेद होऊन नाही चालणार. जग वागू दे कसंही. आपण मात्र साऱ्यांवर प्रेम करू या.
चालताना वाट सगळी अंधारात बुडालेली असते. संकटच संकटं असतात समोर. पण आपण सूर्याचा आदर्श ठेवायचा, काळोखान ग्रासलंय म्हणून सूर्य कधी उगवायचा थांबलाय का ? झाडाचाही आदर्श ठेवायचा आपण. अंगाखांद्यावर लहानाची मोठ्ठी झालेली पानं गळून पडलीय म्हणू झाडाला कुणी रडताना पाहिलंय का ? आपलेच सवंगडी आपल्यापासून गळुन पडताना एकेक पान गळून पडताना, फांदीनफांदी निष्पर्ण होताना झाड रडत बसत नाही. आसवं गालात नाही. मग काय करतं झाड ? असं विचार मनात येतो तेव्हा मी लिहितो -
खोल खोल आतून आतून
झाड पुन्हा फुलत असतं
वसंत ऋतू येणार म्हणून
शिशिरसुद्धा झेलत असतं
आपणही दुखणं खचून जायचं नाही. संकटांना शरण जायचं नाही. काळोखाला पाहुन मलूल व्हायचं नाही. अडचणींना घाबरायचं नाही. झाडासारखंच आपण सुद्धा उद्याच्या सुखाच्या आशेनं फुलत राहिलं पाहिजे. उद्याच्या सुखासाठी आजचं दुखंसुद्धा झेललं पाहिजे.
माणसांमधला पराकोटीचा स्वार्थ पहिला, फक्त फक्त स्वतःच्या सुखासाठी चाललेली धडपड पहिली कि अखंड उन सोसून दुसऱ्याला सावली देणारं झाड मला आठवतं. आणि मग वाटतं...........माणसं का अशी
झाडासारखी वागत नाहीत ? इतरांची दुख झेलून त्यांना सुख का देत नाहीत ? अशा अनेक विचारांच्या प्रभावाखाली लिहिलेली हि कविता -

.M
ReplyDeleter.vijay ur prose is poetry. Not to say anything abt ur poem"
प्रमोदजी, आपले अभिप्राय नेहमीच माझी उमेद वाढवतात आणि मला अधिक दर्जेदार लिहिण्यास प्रवृत्त करतात. अभिप्रायाबद्दल आभार.
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteअभिप्रायाबद्दल मनापासून आभार. परंतु साहित्यिक मुल्य म्हणजे काय हे स्पष्ट झाले तर खुप बरे होईल. आपला ब्लॉग ' रिमझिम पाऊस ' वर दिसतो आहे.पन कंचनीचा महाल यानंतर आपण नवीन काही लिहिल्याचे दिसत नाही.
Deleteग्रेट. याशिवाय दुसरा शब्दच मला सापडत नाही.
ReplyDeleteस्वप्ना प्रतिक्रियेबद्दल आभार. अशा प्रतिक्रिया मिळाल्या कि आणखी चांगलं लिहिण्याची उमेद निर्माण होते.
Deleteमी माझी नौकरी सोडून गावी गेलो. -कशाला ?
ReplyDeleteसवय नसतानाही हिंमतीने शेती करतोय. - उपकार केले का?
मादरचोद
अप्रतिम कविता.
ReplyDeleteआभार श्रेया.
DeleteSundar.
ReplyDelete' रिमझिम पाऊस ' आपले मनापासून स्वागत. अभिप्रायाबद्दल आभार. आपल्याला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
Deleteमस्त!
ReplyDeleteपंकजजी, अभिप्रायाबद्दल आभार. माझ्या अनेक कवितांमधली माझी हि अत्यंत आवडती कविता. आपल्या कौतुकाने खुप आनंद झाला. पुन्हा एकदा आभार.
Delete