Tuesday, 11 November 2014

Shivsena, BJP : शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळेल ?

शिवसेनाला सत्ता मिळायला हवी असं मलाही वाटतंय. पण खरंच उद्धव ठाकरे हे शिवसेनेचं समर्थ नेतृत्व आहे ? राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा मेंदु परमेश्वरानं एकाच साच्यात तयार केला असावा असं नाही का वाटत ?

चला शिवसेना आणि भाजपा एकत्र नाही आले तर शिवसेनेचा विरोधी पक्षनेता विधानमंडळात बसेल हे नक्की. पण खरंच का शिवसेनेचा विधानसभा अध्यक्षपदासाठी उभा केलेला उमेद्वार निवडून येईल आणि शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळेल ? इतर वाचकांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावंच पण शिवसैनिकांनी नक्कीच द्यावं. 

विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यापासून भाजपावर दबाव आणण्यासाठी उद्धव ठाकरे एकामागून एक अस्त्र बाहेर काढताहेत. निकाल लागल्यानंतर भाजपानं माझ्या दारी प्रस्ताव घेऊन यावं अशी अपेक्षा केली. भाजपा आपल्या दारात येत नाही हे पाहुन दिल्लीशी बोलणी सुरु केली. म्हणजे कधी आम्ही दिल्लीपुढे झुकणार नाही म्हणायचं तर दिल्लीत जाताना महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांना खाली मन घालायला लावायची. आधी महाराष्ट्रातला निर्णय घ्या मग दिल्लीतला बघू म्हणायचं,  सत्तेसाठी लाचार नाही म्हणायचं आणि केंद्रात २ कॉबिनेट आणि २ राज्यमंत्री पदाची मागणी करायची. अनिल देसाई यांना शपथविधीसाठी दिल्लीला पाठवायचं आणि विमानतळावरून परत बोलावून घ्यायचं. विरोधीनेतेपदावर दावा सांगायचा आणि चर्चा सुरूच राहील असंही विधान करायचं. सत्तेत सहभागी होण्याची अभिलाषा बाळगतानाच विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाच्या विरोधात उमेद्वार उभा करायचा. किती खेळ्या ? असं राजकारण करतात का ? उद्धव ठाकरेंनी कुठल्या शाळेत राजकारणाचे धडे घेतलेत कुणास ठाऊक ! 

बाळासाहेबांनी पक्ष स्थापन करून नावारूपाला आणला आणि यांना आयत्या पिठावर रेघोट्या ओढता येत नाहीत. कसलं हे राजकारण ? वीट आला अक्षरशा. 

आता काय तर विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार दिला. का दिला ? काही नाही. हे त्यांचं आणखी एक अस्त्र. या कृतीनं भाजपावर दबाव येईल आणि ते धावत येऊन आपल्याला हवी तेवढी मंत्रीपदं देतील अशी अपेक्षा करताहेत उद्धव ठाकरे. 

पण जी भाजपा आजपर्यंत आपल्या कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडली नाही ती आत्ता या शेवटच्या क्षणी आपल्या दबावाला बळी पडणार नाही हे उद्धव ठाकरेंना समजायला नको. शिवाय भाजपानं आपल्या वाडग्यात भीक घातली नाही तर आपण उभा करत असलेला उमेदवार निवडुन येईल का ? याचा तरी उद्धव ठाकरेंनी विचार करायला हवा होता. कोण रहाणार शिवसेनेच्या पाठीशी उभे ? समजा राष्ट्रवादी तटस्थ राहिली तरी २८८ - ४१ = २४७ आमदार विधानसभा अध्यक्ष पदासाठी मतदान करणार. आता भाजपाचे प्रत्यक्ष संख्याबळ १३५ आहे. हे सोडून बाकी सारे शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले तरी ११२ आमदार आमदार उरतात. सहाजिकच शिवसेनेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळु शकत नाही. 

शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची एक शक्यता आहे. समजा राष्ट्रवादी बहुमताच्या वेळी अनुपस्थित राहिली आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या मतदानावेळी त्यांनी आत येऊन शिवसेनेला मतदान केलं तर शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद मिळू शकतं. पण असं उद्धव ठाकरेंच्या स्वप्नातच घडु शकतं. कारण एकदा विधानसभागृहाचा त्याग केल्यानंतर त्यादिवशी त्या आमदारांना पुन्हा विधानसभागृहात प्रवेश करता येत नाही. 

त्यामुळेच भाजपाशी युती तोडली त्या दिवशी शिवसेना पाच वर्ष मागे गेली होती. आपल्या मित्रपक्षावर आणि नरेंद्र मोदींसारख्या निष्कलंक पंतप्रधानांवर टीका करून आणखी पाच वर्ष मागे गेली. आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला तर शिवसेना आणखी पाच वर्ष मागे जाईल.

12 comments:

  1. उध्दव ठाकरेनी राजकारण सोडावे व सेनेला कणखर नेत्याकडे सोपवावे ।।

    ReplyDelete
  2. जातीयवादी, शेठजी भटजीं , रा. स्व. संघाचे बाळ, संधीसाधू, हाफ चड्डीवाले. जय शिवसेना. जय शिवाजी.

    ReplyDelete
  3. राजेंद्रजी, प्रतिक्रियेबद्दल आभार. आपण पहिल्यांदाच माझ्या ब्लॉगला भेट दिलीत. आपले स्वागत. शिवसेनेची अवस्था काँग्रेससारखीच आहे. शिवसेनेतल पक्षप्रमुख पद ते ठाकरे घराण्यापलीकडे कधीच जाऊ देणार नाहीत. माझी ' खुर्ची दिसते चोहीकडे ' हि पोस्ट वाचली नसेल तर जरूर वाचावी. पक्षप्रमुखाकडे कणखरपणा थोडा कमी असला तरी चालतो पण अविचारीपणा असुन मुळीच चालत नाही. काँग्रेस कडे आजही असे नेते आहेत पण गांधी समर्थक त्यांना पुढे येऊ देत नाहीत. पण आजतरी शिवसेनेकडे तसा नेताच नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी संयमान घेणं यातंच शिवसेनेचं उज्ज्वल भवितव्य आहे

    ReplyDelete
  4. मित्रा प्रतिक्रियेबद्दल आभार पण मी ब्राम्हण अथवा स्वर्ण नाही. मुळातच मी जातीयवाद मनात नाही. आपणास हे माहित नसल्यामुळे आपण माझ्यावर असे आरोप केले. पण आपण माझ्या इतर पोस्ट वाचून पहाव्यात. माझी भूमिका आपणास नक्की समजेल.

    ReplyDelete
  5. माझ्या मते हा पक्ष गुंडगिरी आणि हुकुमशाही यावर वाढला आणि पोसला गेला. ते एकेक जागा शाखेसाठी कशा हडपतात,त्यांची अंतर्गत कार्यशैली मी पहिली आहे. त्यामुळे हेमचंद्र प्रधान, प्रमोद नवलकर यांसारखे लोक एक तर सोडून गेले किंवा निष्प्रभ होऊन राहिले.
    बाळ ठाकरे यांच्यानंतर नव्हे ते असतांनाच त्यांनी आपल्या एका मुलाला गादीवर बसवला आणि त्याचे समर्थन करत राहिले. याने पुढे कसले निर्णय घेतले ?
    यंदा तर चालढकल करून आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. अभ्यासू नेत्याला दुर्लक्षून बाहेर जाण्यास भाग पाडले. आता काही कोंडाळ्यातून हे तीर मारत आहेत.

    ReplyDelete
  6. Mannb, शिवसेनेचं चुकलंच पण आज भाजपानं ज्या रितीनं बहुमत सिद्ध केलं त्या मार्गानं जायला नको होतं. त्याच विषयावर लिहितोय. प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  7. झोपलेल्या मराठ्यांना बामणी झटका - -केतन तिरोडकर आणि त्यांच्या जातभाईने अखेर घात केला. हरामखोर चड्डीवाल्यानी जात दाखवली ... शेंडीनी गळा कापला ... मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयानी स्थगिती दिली. .... बामणानी शेवटी आपल्या जाणवाची जाणीव ठेवून पुन्हा एकदा शेंडीनी घात केला. . फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले होते की सत्येत आल्यावर मराठा आरक्षण रद्द करणार कोर्टात वकील बदलून घात केला. दिल्या शब्दाला जागला मुख्यमंत्री आता तरी जागे व्हा .

    ReplyDelete
  8. बामनानी आरक्षण काढाया सुरूवात केली रे. आम्हाला या बामनापासून वाचवा.

    ReplyDelete
  9. मित्रांनो कृपा करून निनावी प्रतिक्रिया देऊ नये. कारण मी कोणाला उत्तर देत आहे हे इतर वाचकांना कळण्यास मार्ग उरत नाही. आपण नाव टाकले तरी आपल्यावर कोणीही कसलीही कारवाई करणार नाही. कृपया अपशब्द वापरू नयेत. यापुढे अशा प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जाणार नाहीत. या ब्लॉगवर जातीयवादाला थारा नाही.



    देवेंद्र फडणवीसांनी आधी जाहीर करूनही त्यांचे एवढे आमदार कसे विजयी झाले ? भाजपाच्या १२२ आमदारांपैकी केवळ २४ आमदार ब्राम्हण असुन ३८ आमदार मराठा समाजाचे आहेत.



    सत्तेत आल्यानंतर चार दिवसात आरक्षण काढयला मुख्यमंत्र्यांजवळ जादुची कांडी नाही. आणि न्यायालय मुख्यमंत्र्यांच्या एवढ मुठीत असतं तर जयललितानं नसती का स्वतःची भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्तता करून घेतली ?

    ReplyDelete
  10. मित्रांनो कृपा करून निनावी प्रतिक्रिया देऊ नये. कारण मी कोणाला उत्तर देत आहे हे इतर वाचकांना कळण्यास मार्ग उरत नाही. आपण नाव टाकले तरी आपल्यावर कोणीही कसलीही कारवाई करणार नाही. कृपया अपशब्द वापरू नयेत. यापुढे अशा प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जाणार नाहीत. या ब्लॉगवर जातीयवादाला थारा नाही.



    अशा प्रतिक्रिया दिल्या कि आपण फार मोठी लढाई जिंकली असे आपणास वाटते का ?

    ReplyDelete
  11. प्रमोद गायकवाड15 November 2014 at 17:42

    विजय सर या असल्या घाणेरड्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांची पोलिसात तक्रार करा.

    ReplyDelete
  12. प्रमोदजी, कशाला कुणाची तक्रार करायची ? त्यांना पाठीशी घालायची आणि उत्तरं दयायची माझी पुर्ण तयारी आहे .

    ReplyDelete