Tuesday 3 March 2015

मोदींचा कोट …… उद्धवची लंगोट

मोदींच्या कृपेने शिवसेनेला २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत १८ जागा मिळाल्या. भाजपा - शिवसेना युतीला ४३ जागा मिळाल्या. आणि आपणच वाघ मारला अशा अविर्भावात उद्धव ठाकरे वावरू लागले. बेताल वक्तव्ये करू लागले. मिशन १५१ ची घोषणा करून उद्धव ठाकरे विधानसभेला सामोरे गेले. मित्राशी दगा केला. आणि महाराष्ट्रात त्रिशंकू अवस्था निर्माण करून ठेवली. पण
सत्तेचा मोह सुटेना. ' अभी नही तो कभी नही ' याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. त्यामुळेच रुसत फुगत कसे का होईना पण उद्धव ठाकरे सत्तेत सहभागी झाले.

चार दोन महिने शांततेत गेले. केजरीवालांनी दिल्ली जिंकली. आणि उद्धव ठाकरेंना हर्ष वायु झाला. ते जमेल तशी मोदींवर टीका करू लागले. याला म्हणतात घरभेदी. केजरीवालांनी जर दिल्लीची सत्ता एकहाती मिळवली तर आपणही महाराष्ट्रात सत्ता मिळवू शकतो अशी स्वप्न उद्धव ठाकरेंना पडू लागलीत. 

त्यामुळेच ते संधी मिळताच आपल्या मित्र पक्षावर जमेल तशी टीका करताहेत. आमच्या लोकशाहीतले विरोधक तर काय नुसते विरोधकच आहेत. ते फक्त विरोधाच करत असतात. युपीए सरकारच्या पंधरा वर्षाच्या कालावधीत भाजपा विरोधात होता. पण एखादा दुसरा अपवाद वगळता भाजपानं केवळ विरोधासाठी विरोध केल्याचे मला स्मरत नाही. मग विरोधी पक्ष म्हणुन भाजपानं काय केलं तर…… कोळसा घोटाळा उघडकीस आणला. टुजी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आणला. अगदी महाराष्ट्रातल सांगायचं झालं तर २०१२ च्या दुष्काळात झालेला चारा घोटाळा उघडकीस आणला, पाटबंधारे खात्यातला घोटाळा उघडकीस आणला, आदर्श घोटाळा उघडकीस आणला. जिथे जिथे काँग्रेसची राजवट होती त्या प्रत्येक राज्यात पानिपत व्हायला त्या पक्षाची कार्यशैली कारणीभूत होती.

पण आज लालूंपासून मुलायमसिंगांपर्यंत आणि सोनियांपासून ममतांपर्यंत सगळेच केवळ विरोधासाठी म्हणुन विरोध करताहेत. मग कधी त्यांनी स्मृती इरिणी यांच्या शिक्षणाच भांडवल केलं………. कधी साध्वी निरंजन ज्योती यांचं विधान उचलुन धरत संसदेच कामकाज बंद पाडलं ………… कधी मोदींचा कोट अंगावर घेतला…………. कधी मोदींच्या प्रदेश दौऱ्यावर आक्षेप नोंदवले तर कधी मोदिनी ड्रम वाजवले म्हणून त्यांची हुर्ये केली.

मोदी सरकारनं एवढ चांगलं बजेट सादर केलं. पण विरोधकांची तोंड वाकडी ती वाकडीच. जेव्हा पहावं तेव्हा एका हातात काळ्या पैशाचा मुद्दा धरलेला. इंदिरा गांधींनी पाचवी लोकसभा निवडणुक केवळ गरिबी हटावचा नारा देत जिंकली. काय झाले गरीबीचे ?

त्यामुळे विरोधकांनी उगाच पराचा कावळा करू नये. समजा विरोधकांनी तसे केले तरी जनतेने त्याला बळी पडू नये. विरोधकांची मानसिकता मी समजू शकतो पण आपणच आपल्या घराचे पोपडे काढणं कितपत योग्य आहे. उद्धव ठाकरे आज असेच आपल्या घराचे पोपडे काढण्याचे काम करीत नाहीत का ?

मोदींच्या कोटाच्या लिलावावर भाष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी त्यांच्या चित्रांच्या विक्रीतून जमा झालेली किती रक्कम देशहितासाठी दिली ? ते सांगावे. भरीस भर म्हणुन राज ठाकरेंनीही या कोट प्रकरणात उडी घेतली. पण तुम्ही देशहितासाठी काय केले ? चार कोटी तर सोडा साधे चार लाख तरी आपले काही विकुन देशहितासाठी दिले आहेत का ?

असो. केजरीवालांनी दिल्ली जिंकली म्हणुन आपणही महाराष्ट्र जिंकू या भ्रमात उद्धव ठाकरे यांनी राहू नये. कारण महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्याच तर मोदींच्या कोटाची शिलाईसुद्धा उसवणार नाही पण उद्धव ठाकरेंची लंगोट सुटेल हे नक्की.    



    



                

12 comments:

  1. मोदींचा कोट …… उद्धवची लंगोट................Great.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल आभार मित्रा.पन आपले नाव लिहिलेत तर अधिक बरे होईल. प्रतिक्रिया कशी दयावी यांसंदर्भात माझा http://maymrathi.blogspot.com/2014/07/comment.html हा लेख पाहिलात तर बरे होईल.

      Delete
  2. विजयजी उत्कृष्ट लेखन मस्त
    टायटल खुप छान आहे
    आणि दोन्ही स्वंयमघोषित मराठीचे स्वंताला रखवलदार समजणार्याना
    चांगला आरसा दाखवलात
    लोकसभेतील विरोधकांना पण चांगल

    ReplyDelete
    Replies
    1. आभार रमेशजी. या विषयाला धरूनच एक कविता लिहिली आहे उद्या पोस्ट करीन. नक्की वाचा. पण मी उद्धव ठाकरेंचा विरोधक नाही हे उद्धव ठाकरेंच्या चाहत्यांना कधीच कळणार नाही का ?

      Delete
  3. केदार नवले4 March 2015 at 14:34

    सारं जग शहाणं होईल शेंडगे साहेब. पण या उध्दव ठाकरेंना काही शहाणपण येणारलनाही. मस्त लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. आभार केदारजी. आपल्या अभिप्रायांची नेहमीच वाट पाहीन. असेच भेटत रहा.

      Delete
  4. sneha kulkarni4 March 2015 at 16:01

    mast lekh.

    ReplyDelete
  5. उद्धव ठाकरे यांच्याविषयी मनात इतका राग का ???

    ReplyDelete
    Replies
    1. अक्षयजी अभिप्रायाबद्दल आभार. पण उद्धव ठाकरे यांच्या विषयी माझ्या मनात राग असावा असे आपणास का वाटते. माझ्या जुन्या पोस्ट चाळल्या तर स्थानिक पक्ष हे केवळ स्वार्थाच राजकारण करतात असे माझे मत आहे. देशाच्या राजकारणाला स्थिरता यायची असेल तर स्थानिक पक्ष मोडीतच काढायला हवत असे माझे मत आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीपासून उद्धव ठाकरे आपल्या मित्रपक्षाशी ज्या रीतीने वागलेत त्याचं आपण समर्थन करू शकाल ?

      Delete
  6. Replies
    1. आभार प्रमोदजी. आज बऱ्याच दिवसांनी आपला अभिप्राय मिळाला. आपल्या अभिप्रायाची नेहमीच वाट पहात असतो.

      Delete