Sunday, 19 April 2015

मराठी ब्लॉगर्स साठी स्पर्धा

मित्रहो आज जवळ जवळ दोन हजारहून अधिक मराठी ब्लॉगर्स ब्लॉग लिहिताहेतय़ ब्लॉगर्सना एकत्रित बांधून ठेवणाऱ्या अनेक ब्लॉग डिरेक्टरी आहेत. अनेकजण खूप दर्जेदार लिहितात. पण या लिखाणाची दखल मराठी साहित्य विश्वानं, मराठी साहित्य परिषदेन कधीच घेतली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने आपली दखल घेणं तर फार दूरची गोष्ट.

यात
भारतीय ब्लॉगर्स जसे आहेत तसेच देशाविदेशातून मराठी ब्लॉग लिहिणारेही अनेकजण आहेत. पण ब्लॉगर्स लिहितात. वाचक वाचतात. अभिप्राय मिळतात. बस्स एवढेच. वाचकांशिवाय अन्य कुणी ब्लॉगर्सची दखल घेत नाही. त्यांना वर्तमानपत्रात स्थान नाही. टिव्ही सारखा माध्यम तर फार दूरची गोष्ट. ब्लॉगर्ससाठी कोणी स्पर्धा आयोजित करत नाहीत. कोणता ब्लॉग सर्वोत्तम याची चर्चा होत नाही.  

पण एबीपी माझा मात्र याला अपवाद. एबीपी माझा गेली काही वर्ष सातत्यानं मराठी ब्लॉगर्ससाठी स्पर्धा आयोजित करून त्यांना प्रोस्ताहन देण्याचा प्रयत्न करते आहे. पण या स्पर्धेविषयीची माहिती मराठी ब्लॉगर्सना कळण्याचा कोणताही सहज सुलभ मार्ग नाही. 

यापूर्वी या स्पर्धेत भाग घेणाऱ्या ब्लॉगर्सना या स्पर्धेविषयी माहिती मिळत असेल. पण इतर ब्लॉगर्सला कुणी त्याविषयी कुणी कळवत नाही. का ते मात्र सांगता येत नाही. या  स्पर्धेत विजयी झाल्यानंतर त्यांच्या विजया संदर्भात कळविण्यासाठी काही ब्लॉगर्सनी लिहिलेल्या पोस्ट यापुर्वी माझ्या वाचण्यात आल्या आहेत. पण स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात कुणी कळविल्याचे मला स्मरत नाही. 

मलाही आज चुकून या स्पर्धेविषयी कळालं. आणि आपण त्या स्पर्धेत भाग घ्यावा म्हणुन मी हि पोस्ट लिहायला घेतली. अवधी खुप थोडा उरला आहे. ३ एप्रिलला हि स्पर्धा जाहीर झाली. २० एप्रिल हि स्पर्धेत होण्यासाठीची शेवटची तारीख आहे तेव्हा त्वरा करा. http://abpmajha.abplive.in/ या लिंकवर जा. तिथे तुम्हाला स्पर्धेत सहभागी होण्याविषयीची सर्व माहिती उपलब्ध होईल. 

तेव्हा त्वरा करा एबीपी माझानं आपल्याला दिलेल्या या संधीचा लाभ घ्या आणि अधिकाधिक प्रमाणात स्पर्धेत सहभागी व्हा. 

त्यांच्या अटीतला ब्लॉग युनिकोड मराठीतच ( देवनागरीत ) हवा म्हणजे काय ते मला कळाले. माझ्या मते ब्लॉगचे नाव असावे. ब्लॉगर मित्रांनी स्पष्ट करावे.      



                              

No comments:

Post a Comment