Sunday 19 July 2015

बाहुबली की बजरंगी ?

देशातले सगळेच प्रश्न निकाली निघल्याप्रमाणे मिडिया गेली पंधरा दिवस केवळ बाहुबली आणि बजरंगी या दोन चित्रपटांवर चर्च करण्यात रंगली आहे. बाहुबली आला आणि हिटही झाला. मग सलमानच्या बजरंगीचे कसे होणार ? या चिंतेत मिडिया बुडून गेले. मग

मध्येच बजरंगी ३१ जुलैला रिलीज होणार अशी बातमी आली. मग मध्येच ' बाहुबलीचे यश पाहून माझ्या पोटात गोळा आला ' असे सलमाचे वक्तव्य झळकले. आणि शेवटी ठरल्याप्रमाणे बजरंगी ठरल्यादिवशीच रिलीज झाला.

फेसबुकवर फेसबुक मित्रांमध्ये सुद्धा बाहुबली कि बजरंगी अशी चर्चा रंगली. सलमानच्या नावाने बोटे मोडणारेच बजरंगीची शिफारस करू लागले. माझ्या दृष्टीने सिनेमा कुणाचा आहे याला काहीच महत्व नाही. सिनेमा कसा आहे हे महत्वाचे. शिल्पकार कितीही चांगल असला तरी त्याला मुर्तीत प्राण ओतता येत नाहीत.

पण रसिकांना सवय असते कुणा कुणाला खांद्यावर घ्यायची. जुन्या चित्रपटांचे ठीक होते. ते चित्रपट खरेच कलाकारांनीच जिवंत केले होते. राजेश खन्ना, दिलीप कुमार, राज कपुर, देवानंद हे असे शिल्पकार होते ज्यांच्यामध्ये कोणत्याही कथेत प्राण ओतण्याची ताकद होती. आजकाल अभिनय कमी आणि टेक्निक जास्त असते. गाणं कमी आणि संगीत जास्त असते. आयटम साँग हा एक नवा रोलच झालाय सिनेमातला. हिरोच्या मागे डझनान साईड हिरो असतात त्यामुळे हिरो उठून दिसतो. त्यामुळेच जर कथानक चांगले असेल तरच सिनेमा हिट होतो. सिनेमात अक्शन असेल तरच सिनेमा चालतो. पण हे लक्षात कोण घेतो.

पण बाहुबलीत ना सलमानच नाव होतं …… ना शाहरुखच, बाहुबलीला ना अमिरची झालर होती……  ना अक्षयची. गेल्या महिन्याभरापुर्वी बाहुबलीची चर्चा सुद्धा नव्हती कुठे. पण तरीही बाहुबली आला आणि हिट झाला.

कोण हिरो ? ………माहित नाही,
कथा कसली ? ………….  माहित नाही,
आयटम साँगचा पत्ता नाही.
विनोदाची फोडणी नाही

आणि तरीही बाहुबली आला आणि मैदान गाजवून गेला.

भारतीय सिनेमाला किती उज्वल परंपरा होती आणि भारतीय सिनेमा काय करू शकतो हे दाखवून गेला. बॉलीवुड सोडा हॉलीवुडला सुद्धा चितपट करून गेला. 

हिंदीत आजवर अनेक बिगबजेट सिनेमे आले. पण खरी भव्यता दाखवली ती बाहुबलीनेच. बजरंगी पाहू नका असे मी म्हणणार नाही पण बाहुबली नक्की पहा आणि तोही सिनेमा गृहात जाऊनच पहा हे मी नक्कीच सांगेन.

कारण - १ ) इतके भव्य सेट कधी कुठे पहायला मिळत नाहीत.
             २ ) पुराण काळातील युद्धाची तंत्रे पहाताना पुरण काळ जसाच्या तसा समोर उभा रहातो.
             ३ ) चित्रपट कधीही कंटाळवाणा होत नाही.
             ४ ) आपल्याला माहित नसलेले अभिनेते पण सगळ्यांनीच उत्तन अभिनय केला आहे.
             ५ ) चित्रीकरण आणि निसर्ग सौंदर्य उत्तम आहे.

चुकल्यासारखं वाटलेलं    - १ ) सुरवातीला कथानक पुढे सरकवताना घाई केली आहे. तर शेवटी सिनेमा संपवायचा म्हणुन कथानक गुंडाळले आहे.कथानक लकवर लक्षात येत नाही.

हि आणि हि एकमेव बाब सोडली तर चित्रपट अप्रतिम आहे.

याचा पुढचा भागसुद्धा येणार आहे. पण हा भाग पाहिल्याशिवाय पुढचा भाग पहाण्यात मजाच नाही. त्यामुळेच बाहुबली अजून पाहिला नसे तर नक्की पहा.   



                                     


                                      

   

4 comments:

  1. नमस्कार सर तुम्ही पहिला का बाहुबली ?? एकदा पहा खूपच मस्त सिनेमा आहे । अभिनय दिग्दर्शन सगळेच मस्त झाले आहे . एकदा पहा नक्की

    ReplyDelete
    Replies
    1. होय सुजितजी मी सिनेमा पाहिला. सिनेमा न पहाता मी त्यावरील समीक्षण लिहुच शको नसतो. अभिप्रायाबद्दल मनापासुन आभार.

      Delete
  2. विजयजी नेहमी प्रमाणे उत्कृष्ट लेखन
    मस्त सिनेमा खुप दिवसानंतर चांगला सिनेमा

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासुन आभार रमेशजी .

      Delete