Monday 6 July 2015

प्रेमाहुनी जगी या

" स्वप्नांच्या पलीकडले." हि मालिका स्टार प्रवाहवर गेल्या तीन वर्षापासुन सुरु आहे. ती मालिकेत आजवर अनेक वळण आली. अनेक खाच खळगे आले. पण अहंकार सोडून केलं जातं ते प्रेम हि सांगण्यास हि मालिका कमीच पडली. नेमकं कसं असायला हवं प्रेम ? 
    
त्या सिरियलची जाहिरात मला आजही आठवतेय. ती म्हणते, " माझ्या बाबांना ना मक्याचं कणीस फार आवडतं. ते ना त्या कणसंवाल्याला त्याच्या गाडीसकट विकत घेतील आणि बंगल्याच्या आवारात नेऊन उभं करतील."
तो म्हणतो, " ती उंच इमारत दिसतेय ना. असं वाटतं, त्या इमारतीवर जाऊन उभं रहावं आणि खालून जाणाऱ्या माणसांकडे मुंग्यांसारख पहावं."
यावर ती म्हणते, " काय भन्नाट विचार आहेत रे तुझे ! "
यात विचारांचा कोणता भन्नाटपणा आहे ? हे काही मला कळलं नाही.
दुसऱ्यांच स्वातंत्र्य हुरवून घेऊन त्यांना विकत घेऊन बंगल्याच्या आवारात उभं करणं काय किंवा उंच इमारतीहून इतरांकड मुंग्यांसारखा पाहणं काय ? दोन्हीतही विचारांची क्षुद्रताच आहे. पण हे असं एकमेकांना धरून बोललं म्हणजे प्रेम. पण खरंच, प्रेम असं असतं ?
पण आजकाल प्रेमाची संकल्पनाच बदलली आहे. त्याच्याशी मोबाईलवर तासंतास बोलणं, कॉलेज सोडून त्याच्या सोबत फिरणं, दिवे लागले कि घरचे आपली वाट पहात असतील असा विचार मनाला शिऊ न देता दिव्यांच्या प्रकाशात झगमगणाऱ्या एखाद्या पुलाच्या कट्ट्यावर त्याच्यासोबत वेळ काढणं.
आणि तिनं  ? ........ तिनं फक्त सुंदर दिसणं. त्याच्या सोबत बाईकवर फिरणं.
जग फक्त दोघांचं असलं पाहिजे. त्यात कुण्णी कुण्णी नको. असं असेल तरच खरं प्रेम आणि त्यातली मजा.
ईश्वरानंतर या जगात सत्य काही असेल तर ते प्रेम. पण त्यातही कलि शिरलाय. आपले अहंकार, आपले स्वार्थ, आपले लोभ आडवे येतात. आणि मग ज्या प्रेमाशिवाय आयुष्याला काही अर्थच नाही त्या प्रेमावरचा विश्वास उडू लागतो.
पण प्रेम म्हणजे त्याग...........प्रेम म्हणजे दान.........प्रेम म्हणजे जगण्याचा आधार हे जेव्हा आपल्याला कळेल त्या दिवशी आपल्याला वाटेल -
प्रेमाहुनी जगी या
नसते सुरेख काही
हे सार अमृताचे
याच्यात विष नाही -
एवढंच सांगण्याचा प्रयत्न मी माझ्या पुढील कवितेतून केलाय.





2 comments:

  1. Kavita aani tavaril Vivechan donhini chhanach....!!

    ReplyDelete
    Replies
    1. सामिधाजी, खूप दिवसानंतर आपला अभिप्राय मिळाला. आपले मनापासून आभार.

      Delete