कधीतरी नेहमीची साईट ओपन करताना आपल्या स्क्रिनवर harmful programs असा मेसेज दिसू लागतो. आपण घाबरून ती साईट ओपन करायचे टळू लागतो. कधी कधी ती साईट आपल्यासाठी गरजेची असते. काय करावं सुचात नाही. तेव्हा प्रश्न पडतो हा मेसेज कसा घालवायचा ?
जगात आज प्रामुख्याने Google Crome , firefox आणि Internet Explorer हे ब्राउझर वापरले जातात. यातही Google Crome सर्वात अधिक वापरले जाते. मी स्वतः Google Crome आणि firefox हे दोन्ही ब्राउझर वापरतो. पण गेल्या काही दिवसापासुन Google Crome ने माझी साईट ओपन करताना नेहमीच The site ahead contains harmful programs असा मेसेज यायचा. Google Crome वरून माझी साईट ओपन करू पहाणाऱ्या आपल्यासारख्या रसिकांनी हा मेसेज येत असेल आणि समोर लालभडक स्क्रिन दिसत असेल.
साधारण मे महिन्यापासून हा मेसेज मला दिसतो आहे. का ते माहित नाही. माझी साईट मला रोज दिवसातून चार सहा वेळा तरी ओपन करावी लागते. आणि हा मेसेज दिसला कि मी वैतागतो. मग details वर क्लिक करायचे. मग त्याखाली येणाऱ्या ओळीतील view this site वर क्लिक करायचे. मग माझी साईट ओपन व्हायची. परंतु firefox अथवा इतर ब्राउझर वरून माझी साईट ओपन करताना मात्र वरील प्रमाणे मेसेज येत नाही.
मी खुप शोध घेतला. पण माझ्या साईटवर काहीही चुकीचे नाही. मग तरीही हा मेसेज का येत असेल ? मी खुप विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आले कि माझ्या साईटवर काही जाहिराती आहेत. वाचकांनी त्या जाहिरातीवर केवळ क्लिक केले तरी मला थोडेफार पैसे मिळतात. हि अमाउंट अगदीच किरकोळ असते.
blogspot हि साईट गुगलच्या मालकीची आहे. blogspot च्या सहकार्याने मी सुरु केलेल्या ब्लॉगचा ओनर मी असलो तरी अप्रत्यक्षरीत्या गुगल माझ्या ब्लॉगचे ओनर आहे. परंतु या माझ्या साईटवर गुगल व्यतिरिक्त अन्य कंपनीच्या जाहिराती दिसतात. त्यामुळे गुगल by default हा मेसेज पाठवत आहे.
परंतु रसिक वाचक मित्रांनो विश्वास बाळगा. खरेच माझ्या साईटवर धोकादायक असे काही नाही.
पण Google Crome ने माझी अथवा इतर कोणतीही साईट ओपन करताना हा मेसेज येउच नये यासाठी पुढील उपाय योजना करता येते. हे एकद्च करावे लागेल. -
१ ) तुमच्या google crome ब्राउझरच्या उजव्या बाजुच्या कोपऱ्यात एकावर एक असलेल्या तीन आडव्या ओळी दिसतात. त्यावर क्लिक करा. ( click on the three line mark on the right hand side of your browser )
२ ) उघडणाऱ्या विंडोतील setting या शब्दावर क्लिक करा. ( click on setting )
३) त्यानंतर उघडणाऱ्या खिडकीतील show advance setting वर क्लिक करा. ( click on show advance setting. )
४) त्यानंतर उघडणाऱ्या खिडकीतील enable phishing and malware protection समोरील चौकोनातील बरोबरच्या खुणेवर वर क्लिक करा. आता बरोबरची खून नाहीशी झालेली असेल. ( click on square heaving write mark in front of enable phishing and malware protection. Conform that now there is no write mark in that squre )
याच पानाच्या तळाशी असलेल्या reset setting वर क्लिक करा. ( ( cick on reset setting at bootom of same page. )
झाले तुमचे काम.
आता पुन्हा तुम्हाला The site ahead contains harmful programs असा मेसेज दिसणार नाही.
मलाही हाच प्रॉब्लेम येत होता. आत्ता ह्या सेटींग्ज प्रमाणे करुन बघितले असता ब्लॉग उघडला. थॅक्य़ू
ReplyDeleteबरेच दिवस तुमची पोस्ट्स वाचता आली नाहीत.
माझ्याकडे हा प्रॉब्लेम येत होता. का ते माहित नव्हतं. पण वाचक कमी झाले होते. नेहमीच्या रसिकांच्या प्रतिक्रिया मिळत नव्हत्या. त्यामुळेच घेवून हा लेख लिहिला. एखादया साईटमध्ये खरेच काही हार्मफुल असते. google अथवा firefox वार्निंग मेसेज यायलाच हवा होता. पण ती केवळ google ब्राउझर वरून येत असल्यामुळे मी हा लेख लिहिला. समजा सगळ्याच ब्राउझर वरून हा मेसेज आला असता तर मी हा लेखही लिहिलाच नसता. आपले नवे लेखन मात्र बर्याच दिवसात दिसले नाही.
Deleteखुपच सुंदर माहिती दिलेली आहे विजय सर
ReplyDeleteआभार चिंतामणीजी.
Delete