मंगला कदम. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या सभागृह नेत्या. महापौरांच्या खालोखाल असलेलं व्यक्तिमत्व. पालिकेतली त्यांची हि चौथी पाचवी टर्म. जुन्या जाणत्या नेत्या. सभागृह नेत्या या नात्यानं विरोधी पक्षासह सगळ्या नगरसेवकांना सांभाळुन घेण्याची त्यांची जबाबदारी. पण
मंगला कदम यांना सगळ्याचा विसर पडला आहे.
अजित पवारांच्या अंगातली मग्रुरी आणि दादागिरी आता खालच्या पातळीवरच्या सगळ्या नेत्यांच्या अंगी उतरली आहे. आपला भ्रष्टाचार दडपुन टाकायचा असेल तर ' दादा ' गिरी शिवाय पर्याय नाही याची जाणीव राष्ट्रवादीच्या तळागाळातल्या प्रत्येक नेत्याला आहे.
त्यामुळेच मागील आठवड्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत निवृत्त डॉक्टर जगदाळे यांच्या भ्रष्टाचाराच्या विषयाला विरोधी पक्षांनी वाचा फोडताच मंगला कदम यांनी विरोधी गटनेत्या सुलभा उबाळे यांच्यासह कार्यक्षम नगरसेविका आशा शेंडगे आणि जेष्ठ नगरसेविका शारदा बाबर यांना आठ दिवसासाठी निलंबित केले.
मंगला कदम यांनी या तिघींना निलंबित केलेच पण त्याच बरोबर पत्रकारांशी बोलताना आपण कोणत्या थराच्या नेत्या आहोत हेही दाखवून दिले. मंगला कदम म्हणाल्या ," कोणी जर आमच्या अंगावर आले तर मही त्यांना शिंगावर घेऊ. " म्हणजे कोणीच आमच्या विरोधात काही बोलायचे नाही. म्हणजेच त्यांचा भ्रष्ट कारभार सगळ्यांनी डोळे मिटून पहायचा.
इतकेच काय ? पुढे बोलताना शिवसेनेतून निलंबित केलेल्या नगर सेविका आशा शेंडगे व शारदा बाबर यांना
उद्देशून, " ज्यांना कोणत्याही पक्षाचा आधार नाही त्यांनी आम्हाला राजकारण शिकवु नये. " असेही म्हणाल्या.
त्यांची हि प्रतिक्रिया अप्रत्यक्षपणे सीमा सावळे यांनाही लागू होती. परंतु हे विधान करताना सिमा सावळे , आशा शेंडगे यांच्या सारख्या नगरसेविका कुणाच्या पुण्याईवर नव्हे तर जनतेच्या पाठबळामुळे पुढे आलेल्या आहेत याचा त्यांना विसर पडतो.

No comments:
Post a Comment