Saturday, 1 August 2015

तुझ्या ओंजळीत सखे

I Wish all of you a 

                 Very      

Happy friendship day. 


मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


ती आयुष्यातून दूर जाते आणि तो तिच्या आठवणीत हरवून जातो. जगण्याची खरंतर इच्छाच उरलेली नसते त्याला. पण उद्याची आशा त्याला जगायला भाग पडते. मनात कुठेतरी एक उमेद असते,
" नाही ती येईल पुन्हा आपल्या आयुष्यात आणि दरवळून जाईल आपलं आयुष्य पुन्हा एकदा." 
आता देवाला मागायचं तरी काय ? असाही प्रश्न त्याला पडतो. कारण -
तिच तर त्याचा देव..........
तिच त्याच्या अंगणातली जाई......
तिच त्याचं आयुष्य गंधाळून टाकणारी जुई.
तिच्याशिवाय त्याचं आयुष्य म्हणजे एक देऊळ ........देव नसलेलं.  .
तिच्याशिवाय त्याचं आयुष्य म्हणजे एक फुल.........दरवळ नसलेलं.
तिच्याशिवाय त्याचं आयुष्य म्हणजे एक दिवा..........ज्योत नसलेलं.
तिच्याशिवाय त्याचं आयुष्य म्हणजे एक पोकळी........रिकामी रिकामी.
तिची सोबत नसण्याचं दुःख सोसायचं कसं ? हे सांगताना तो म्हणतो-
काही नाही गं आता अश्रूंच्या रुपानं दुःख डोळ्यातून डोकावू लागलं कि डोळे मिटून घ्याचे आणि ओठातला हुंदका ओठातच दाबून सारं दुख पापण्यांच्या आड लोटून द्यायचं. तू सोबत नसल्यामुळे आयुष्यात दुःखाचे जे काही कडू घोट प्यायला लागतील ते डोळे मिटून निमूट प्यायचे.
तुझी सोबत नसण्याचं दुःख मी पापण्यांच्या आड लोटून दिलंय. त्यामुळं मी तुला दुःखी दिसणार नाही. कदाचित एक हलकसं हसूच दिसेल तुला माझ्या चेहऱ्यावर. पण ते हसू उसनच असेल हे लक्षात असू दे. कारण तुझी सोबत असण्याचा आनंद मला मिळणार नसेल तर आनंदाच्या ......... सुखाच्या दुसऱ्या कुठल्याही क्षणांनी माझ्या मनातला मनमोर नाचणार नाही.
तू सोबत नाहीस याचं दुःख असलं तरी मी अगदीच हतबल झालेलो नाही काही. मी तुझ्या जुन्या आठवणींना घट्ट उराशी घेतो........कधी कधी स्वतःला तुझ्या आठवणींच्या कुशीत खोल झोकून देतो. आणि माझ्या नशिबी कितीही दुःख आलं तरी तुझ्या ओंजळीत मात्र फक्त सुखाचच दान पडावं अशी पार्थना करत रहातो.
एका वेडया प्रियकराच्या भावना सांगणारी ही कविता - तुझ्या ओंजळीत सखे 

6 comments:

  1. मैञीसाठी खास एक दिवस नको.मैञी नेहमीच .....आयुष्यभर ..आयुष्यानंतरही .....ती जवळ नाही पण खुप जवळ आहे...छान सर.

    ReplyDelete
    Replies
    1. जगदीशजी, आपली प्रतिक्रिया मिळाली. आभार.

      Delete
  2. Kiti surekh lihita tumhi sir.khup aawdto mlactumcha blog.

    ReplyDelete
    Replies
    1. मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल आभार केतकीजी.

      Delete