या ब्लॉगवर राजकीय, सामाजिक लेखन असेल. हि माझी वैयक्तित मतं असली तरी ती समाज विघातक नाहीत. त्यामुळेच आपणास हे लेखन योग्य वाटल्यास समाजमाध्यमांवर शेअर करण्यास माझी मुळीच हरकत नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्याची गरज नाही. माशाचा काटा गळ्यात अडकावा तसे माझे लेखन एखाद्याच्या गळ्यात अडकल्यास त्यास मी जबाबदार नाही.
Sunday, 7 July 2019
अमर्त्यसेन हे भारतरत्न कसे?
मी सचिन आणि रोहितची तुलना करणारी एक तिरकस पोस्ट लिहिली आणि सचिनप्रेमी मंडळींना बरेच वाईट वाटले. म्हणून हे स्पष्टीकरण. खरेतर मी लेखक कवी. मोदी सत्तेत आले काय आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले काय मला काहीच फरक पडायला नको. त्याच प्रमाणे सचिनला भारतरत्न दिले म्हणून मला काहीही फरक पडायचं कारण नाही. परंतु एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर त्याविषयी लिहायला हवेच ना.
खरेतर मला स्वतःला सचिनविषयी जेवढे प्रेम आहे तेवढेच प्रेम धोनीविषयी आहे. याउपर नेतृत्व गुण यासह इतर
खरेतर मला स्वतःला सचिनविषयी जेवढे प्रेम आहे तेवढेच प्रेम धोनीविषयी आहे. याउपर नेतृत्व गुण यासह इतर
Thursday, 4 July 2019
खळाळत्या आयुष्याची धरण गाणी.
जे चांगलं त्यावर चांगलं लिहिताना मला शब्द कमी पडत नाहीत. परंतु आमच्या कवितेची स्तुतीच करा असा कुणाचा आग्रह असेल तर ते शक्य नाही. अलीकडे माझ्याहून थोर मीच अशीच प्रत्येक कवीची भावना असते त्यामुळे कुणावर टीका केली तर ती त्याला रुचत नाही. त्यामुळे अलीकडे लोकांना काय आवडेल खूप भान बाळगावे लागते. मीच नव्हे श्रीपाल सबनीस यांच्या सारखे जेष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा आपल्या अध्यक्षिय भाषणात कसल्याही सुमार पुस्तकावर अतिशय भरभरून बोलतात.
पण कवी गोविंद काळे हे जसे वयाने थोर तसेच अनुभवाने. त्यांचा सखी सांगाती हा काव्यसंग्रह तीन महिन्यापूर्वी माझ्याकडे आला. तो वाचून मी त्यावर लिहिले. त्यातली एखादी दुसरी उणीव मी त्यांना दाखवली. ती त्यांनी स्वीकारली. परवा सोलापूरला गेलो होतो. त्यांना फोन केला होता. मी जिथे मुक्कामी होतो तिथे ते आले. भेट झाली आदराने त्यांच्या घरी घेऊन गेले. चहापाणी झालं. आपलं मोठेपण विसरून इतरांचा आदरसत्कार करणारी फार

Subscribe to:
Posts (Atom)