Sunday, 13 July 2014

Love Poem ; तिची पाऊले झेलून घ्याया

ती अशी कशी येते आपल्या आयुष्यात आणि व्यापून टाकते आपल्याला……..प्रत्येक श्वासागणिक तिचा ध्यास…….जगावंसं वाटण्याच्या प्रत्येक क्षणाला तिचा भास………असं असतं काय तिच्यात ??  हे कधीही न कळलेले आपण एक अजागळ. पिंजरा मधला मास्तरच होऊन जातो आपण. तहान भूक हरवलेले……..स्वतःच्या कर्तुत्वाची उंची विसरलेले.
टिव्ही वरच्या कोणत्याच मराठी मालिका मला आवडत नाहीत. पुढचं पाऊल या मालिकेतल्या प्रेम या संकल्पनेचा तर मी माझ्याच एका लेखात खरपूस समाचार घेतला होता. श्रेष्ठ काय प्रेम कि मैत्री या माझ्या लेखातही मी प्रेम म्हणजे काय ते समजावून सांगायचा प्रयत्न केला होता. म्हणजे प्रेम हि संकल्पना मला प्रेपूर कळली आहे असं नाही. ते मी जे काही मांडलाय ते माझं मत. ते तुम्हाला पटलं तर तुम्ही स्वीकारायचं. नाही तर ठोकारायचं.

मला मालिका आवडत नसतानाही या लिखाणात टिव्ही वरच्या मराठी मालिकांचा उल्लेख येण्याचं कारण असं कि ‘ पुढचं पाऊल ‘ या मालिकेतल्या संग्रमचं देवयानीला ” तुमच्या साठी काय पण.” असं म्हणणं म्हणजेच प्रेम. मला टिव्ही वरच्या मराठी मालिका आवडत नसल्या तरी काही वेळा पहाव्याच लागतात. असाच एके दिवशी संग्राम देवयानीचं पाऊल हातावरती झेलतो. आज ‘ तुझी पाऊले झेलून घ्याया ‘ हि कविता पोस्ट करताना. तो प्रसंग आठवला म्हणून टिव्ही वरच्या मराठी मालिकांचा उल्लेख. अन्यथा शहाण्यानं या मालिका पाहू नयेत. हेच खरं.

पण खरंच ती असतेच तशी………….तिच्यासाठी साऱ्याचा विसर पडावा अशी……….तिला पाहिलं कि आपल्याही नकळत आपल्याला एक सुरेल तान होवून गावंसं वाटत……….तिनं न सांगताही तळहातावर प्राण घेवून जावसं वाटतं……..आणि आपण असे खुळ्यासारखे प्राण तळहातावर घेवून तिच्या समोर जातो………..पण ती……..

” खुळाच आहेस ” असं म्हणत आपल्याला कुशीत घेते………..आणि आपण एका क्षणात पंख नसतानाही पाखरू होऊन आभाळभर झेप घेतो………….ती मात्र तशीच रहाते मातीला घट्ट बिलगून………..आपल्याला

” फार हवेत राहू नकोस. शेवटी आभाळापेक्षा मातीच खरी याची जाणीव करून देत.”

आपल्याला तिचं एवढ वेड का ??? आणि आपण असं एवढ वेडं व्हावं असं तिच्या आहे तरी काय ?? या दोन्ही प्रश्नांची उत्तर माहित नसलेले आपण  ………एक येडच्याप.

पण या दोन्ही प्रश्नांची उत्तर माहित नसली तरी एवढ नक्की माहित असतं……..आपल्याला तिची सोबत हवी…………तिचा सहवास हवा………. तिचं हसू हवं………आणि तिचा रुसवा हवा.

त्यासाठी हवं ते करायची तयारी असते आपली………

तिच्या सहवासासाठी तिच्या पायातली पैंजण होण्याची
किंवा तिच्या मेंदीत रंगलेल्या पावलांचा स्पर्श लाभण्यासाठी तिच्या घरापुढचं अंगण होण्याचीही……….

या अशाच भावनेत बुडताना लिहिलेली हि कविता………2 comments:

  1. khup aawdli kwita

    ReplyDelete
  2. प्रतिक्रियेबद्दल आभार. पण आपण आपल्या नावानिशी प्रतिक्रिया दिल्यास अधिक योग्य होईल.

    ReplyDelete