Sunday, 14 December 2014

BJP, Shivsena : शिवसेना हरली की …. ?

मी माझ्या अठ्ठेचाळीस वर्षाच्या आयुष्यात आणि राजकारण कळु लागल्यापासून म्हणजे साधारणतः मागच्या वीस पंचवीस वर्षात एखाद्या विरोधी पक्षाने पंधरा दिवसात विरोधी पक्षाची भुमिका सोडुन सत्तेत सहभागी होण्याची हि पहिली वेळ असावी. सत्तेची हाव कोणाला या प्रश्नावर अनेकांनी तावातावाने मते व्यक्त केली. पण आता सत्तेची हाव नेमकी कोणाला ? राजकीय पटलावरची परिस्थिती लक्षात घेऊन आपल्या मित्र पक्षाला सोबत घेणाऱ्या भाजपाला कि शड्डू ठोकून ' आम्ही विरोधी पक्षातच ' असं सांगुन, पंधरा दिवसात सत्तेत सहभागी होणाऱ्या शिवसेनेला ? हे सुज्ञ वाचकांनी ठरवावे. ' भाजपानं मात्र आम्ही शिवसेनेला सत्ते घेणारच नाही. ' असे विधान केल्याचे स्मरत नाही. 
परंतु आज सत्तेची हाव कोणाला ? अथवा शिवसेना हारली किमिशन सत्ता

Monday, 8 December 2014

Cast Reservation in india : मराठा आरक्षण गरज कि …. ?

मी  आरक्षणाचे समर्थनही करत नाही आणि आरक्षणाला माझा विरोधही नाही. पायउतार झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं मराठा आणि मुस्लिम समाजासाठी अगदी घाई घाईत आरक्षण लागू केलं. सत्ता टिकेल असं त्यांना वाटलं होतं. तरीही त्यांना सत्तेवरून खाली उतरावं लागलं. कारण त्यांची पापंच इतकी होती कि हे असलं उसनं पुण्य त्यांच्या कामी आलं नाही.

Thursday, 4 December 2014

LBT, BJP, Shiv sena : एलबीटी आणि शासकीय सवलती

शेतकऱ्यांच्या अडचणी खुप आहेत. नैसर्गिक आपत्ती टाळणं कुणाच्याच हातात नाही. पण नैसर्गिक आपत्ती येतात आणि त्यात शेतकरी होरपळून निघतो. शेतकरी आत्महत्या करतात. काही क्षणात त्याची बातमी होते.  विरोधी पक्ष बाहया मागे सारून पुढे सरसावतात. सत्ताधारी पक्ष पिडीत कुटुंबाला तातडीची मदत जाहीर करतात. विरोधी पक्षाच्या या भुमिकेकडे पाहिलं कि जनतेला वाटतं आपण सत्ताधाऱ्यांना सत्तेत आणून चूक केली. पण खरंच या विरोधकांना शेतकऱ्यांची एवढी काळजी असते का ?

Monday, 1 December 2014

Marathi Kavita : काळ्या आईचीच पोरं

माझ्या राजकीय लेखांवर भरभरून प्रतिक्रिया देणारे रसिक या कवितेला किती प्रतिक्रिया देताहेत हे मला पहायचे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भरभरून बोलणारी मंडळी या शेतकऱ्यांच्या विषयी लिहिलेल्या कवितेवर काय बोलतात ते मला पहायचे आहे. कारण कुणी कितीही म्हणाले तरी