Saturday 4 October 2014

Shiv Sena, BJP, NCP : शिकवण शिवरायांची आणि उद्धवरावांची

( खालचं कार्टून नक्की पहा )

युती तुटली आघाडी विस्कटली. बऱ्याच जणांना अनपेक्षितपणे तिकिटे मिळाली. जो तो प्रचाराचे रणशिंग फुंकू लागला. आपल्याच मित्र पक्षांवर टिका करू लागला. ' मी सिंचनाच्या फायलीवर सही केली असती तर अजित पवारांची जय ललिता झाली असती. ' असं स्वतः मुख्यमंत्री चव्हाण सांगू लागले. उद्धव ठाकरे तर स्वतःला छत्रपती शिवाजीचा महाराजांचा अवतार समजू लागले. आणि म्हणु लागले, " माझ्यासमोर झुकायचं दिल्लीसमोर नाही. " 
" दिल्लीसमोर झुकायचे नाही हि शिवरायांची शिकवण आहे. " शिवाजी महाराजांची हि शिकवण उद्धवरावांना कुठल्या बखरीत सापडली कुणास ठाऊक ? शिवाजी महाराज दिल्लीसमोर कधीच झुकले नाही याला इतिहास साक्षी आहे. पण ती दिल्ली निजामाची होती…………… मोगलांची होतो…………… औरंगजेबाची होती. आणि आजची दिल्ली हि आमची आहे. भारतीयांची आहे याचं भान उद्धव ठाकरेंना उरत नाही. शिवाजी महाराज दिल्लीसमोर झुकले नाहीत पण संपुर्ण उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात असलेल्या हिंदु राज्यकर्त्यांशी त्यांचा सलोखा होता.

खरंतर शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जनतेची दिशाभुल करण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना कोणी दिला. ते महाराष्ट्रवर हक्क सांगणार………ते शिवाजी महाराजांवर हक्क सांगणार. मोदी आणि अमित शहा परप्रांतीय आहेत म्हणून त्यांच्यावर टिका करणार. का ? पण हे सारे प्रश्न मी इथं उपस्थित करून उपयोग नाही. हे जनतेच्या लक्षात यायला हवं. हे प्रश्न जनतेनं असल्या ढोंगी माणसांना विचारायला हवेत. 

या असल्याच शिकवणुकमुळे महाराष्ट्रासोबतच देशाचं नुकसान होतंय. उद्या मनात आलं तर हे महाराष्ट्राला देशापासून वेगळे करू पहातील. वेळ आलीच तर शिवसैनिकांना पुढं घालुन दिल्लीशी युद्ध पुकारतील. जीनांनी पाकिस्तान हिंदुस्थानातून वेगळा केला. उद्धव महाराष्ट्र वेगळा करतील. स्थानिक राजकारण करणाऱ्या जयललितांनी केवळ १ रुपया मानधन घेईन असं म्हणत ६७ कोटींची बेहिशोबी मालमत्ता जमवली. ममतांनी पश्चिम बंगालची काय अवस्था केली आहे ते तिथ जाऊन पहा. दोष त्यांचा नाही. मतदार खुळा आहे. 

मी भाजपाची तरफदारी करतोय असे नव्हे. किंवा मी त्यांचं वकीलपत्र घेतलंय असंही नव्हे. महाराष्ट्रातल्या जनतेचा शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंवर खुप विश्वास असेल तर बेलाशक त्यांनी शिवसेनेच्या पदरात एकहाती बहुमत टाकावं. पण मत देताना पुढील प्रश्न स्वतःला विचार पहा - 

१) १६९ जागा लढवून ८२ पेक्षा अधिक जागा कधी न जिंकू शकलेल्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाने १५० ऐवजी १४० किंवा १४५ जागा लढवून भाजपला १२५ ते १३० जागा दिल्या असत्या तर काय बिघडले ? 

२) १५१ + ११९ + १८ हे सुत्र समोर मांडणाऱ्या शिवसेनेने कधी भाजपाच्या जागा कमी केल्या तर कधी भाजपाला जास्त जागा देतो असं सांगत इतर घटक पक्षांच्या जागा कमी केल्या . म्हणजे मी एकही पाऊल मागे सरकणार नाही . असं का ? 

३) मुख्यमंत्रीपद शिवसेनेलाच हवे हा अट्टहास कशासाठी ?


४) परवा एका सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, " केक तुम्ही खायचा आणि आम्ही काय फक्त मेणबत्या लावायच्या का ? " म्हणजे उद्धव ठाकरेंना सत्ता हवी आहे ती जनसेवेसाठी कि केक खाण्यासाठी ? ( उद्धव ठाकरेंच्या केकचा अर्थ समजण्याऐवढी जनता नक्कीच सुज्ञ आहे. )

५) " शिवसेना नसती तर तुम्हाला मुंबईत जगता आलं असतं का ? " असा प्रश्न उद्धव ठाकरे विचारतात. वर्षानुवर्ष मुंबई महानगरपालिका आपल्या हाती असताना शिवसेनेने तिथं कोणती भरीव कामगिरी केली आहे ? 




20 comments:

  1. तुमचं म्हणणं पटतंय.

    ReplyDelete
  2. Compromise fakt shivsrnech ka karaych 170 varun 150 paryany aleli Sena swarthi ani Modi chya navane mat magnari bjp bhari wa wa

    ReplyDelete
  3. आभार. पण ते इतरांनी पटवून देणं हे आपलं काम आहे.

    ReplyDelete
  4. माझं म्हणणं एवढंच आहे १७० पैकी ७५ पेक्षा जास्त जागा कधीही जिंकू न शकलेल्या शिवसेनेने १४० ते १४५ जागा घेतल्या असत्या तर काय बिघडले असते. युती महत्वाची होती. आघाडीला सत्तेवरून हाटवनं गरजेचं होतं. आणि शुभमजी त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे जागांपेक्षा कोणत्याही परीस्थित शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची मागणी हे युती तुटण्याच मुख्य कारण होतं. आणि मोदींच्या नावानं मत मागितलं तर बिघडलं काय काँग्रेस गांधी घराण्याला पुढं करते. आज राहुलचा पत्ता चालत नाही म्हणुन पृथ्वीराज चव्हाण. राष्ट्रवादी शरद पवारांचं नाव घेते. जाऊ दयात. शुभमजी मी शिवसेनेचाच आहे. पण जे चूक ते चुक अशी माझी भावना आहे.

    ReplyDelete
  5. सायली सरकार5 October 2014 at 11:14

    केकचं उदाहरण मस्तच आहे. सगळ्यांची रस्सीखेच चालू आहे ती केवळ केकसाठीच.

    ReplyDelete
  6. Modi ne sangitle hote 100 divsat black money part aanil,kay zale?
    Assam madhi Bangladeshi haklun dein,kay zale?
    CBI congress government chi dalal ahe,bjp CBI la independence karin kay zale?
    Gau hatya band karin,kay zale?
    Modi sodun ek tari mantri tv var statement deto ka?
    Kashmiri pandit Kashmir madhe set karin,kay zale?

    ReplyDelete
  7. mumbai marathi mansachi vatahat honyas marathi manusch karnibhut aahe. rto, mumbai mahanagar palika, rationing card vitaran, air port varil custom vibhag, mantralay, nagarsevak sagle adhaasharskhe paise khat astat. eleection aale ki marathi panache card chalvayche he nehamiche aste.

    ReplyDelete
  8. विजय सर , उद्धव ने संपूर्ण प्रचार हा शिवाजी महाराजां वर केंद्रित केला आहे । जसे काही शिवाजी महाराज त्यांची private property आहे. उद्धव खूपच Negative झाला आहे … आवरा त्याला लवकरच … त्याला सांगा कि तू काय करणार आहेस ते बोल … नुसते भाजपा वर टीका कारण उपयोग नाही रे … आज काल तर त्याला रोजच स्वप्नात नरेंद्र मोदी येत आहे असे वाटतेय … रोज सगळ्या प्रचारसभे मध्ये शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी सोडून दुसरे काही दिसताच नाहीये … उद्धव विचारतोय नरेंद्र मोदी ने १०० दिवसात काय केले …. माझा एक प्रश्न आहे तुमचे अनंत गीते पण मंत्रीमंडळ मध्ये आहेत ,, त्याने असे काय काम केले आहे ते तर सांगा मग नरेंद्र मोदी ना विचार ?????

    ReplyDelete
  9. मी पूर्णतः सहमत आहे. खरंच उद्धव ठकरे स्वतःला शिवाजी महाराजांचा अवतार समजू लागले आहेत...आणि आदित्य च्या सांगण्या वरुन चालतात!
    कुठलाही गव्हर्नंस आणि ॲडमिनिस्ट्रेशन चा अनुभव नसलेल्या माणसाला जनता एकदम मुख्यमंत्री पद कसं देईल?
    काहीतरी भडकाऊ भाषणे करायची आणि लोक गोळा करायचे!
    त्यापेक्षा बी जे पी निदान संयमी भाषा बोलते.

    ReplyDelete
  10. लढाई मध्ये आपला खरा शत्रू कोण ज्याला कळत नाही लढाई कदापि जिंकू शकत नाही …. आणि अशी स्थिती शिवसेनेची आणि मनसेची झाली आहे . … भाजप ला अफजल खानची फौज म्हणायची आणि त्याच फौजेत आपला सेनापती आहे (अनंत गीते ) हे विसरायचे …. हे काय विकास करणार …. हवालदिल झालेली सेना एवढेच म्हणेन …। शिवसेना सैरभैर झाली आहे हेच खरे.मुळात भाजप युती तोडणार नाही आणि आपल्याला मोदींची लाखो मते मिळवता येतील या स्वप्नात ते होते. पण आम्हाला "तुमच्या हरणाऱ्या जागा द्या आणि युती टिकवा हे सुद्धा सेनेने झिडकारले. युती तुटल्यावर मनसे काहीतरी बोलली आणि हे गीतेंचा राजीनामा द्यायला निघाले. मग प्रश्न आला कि सर्वच १८ जणांना सांगा आणि राज्यातील सगळीकडच्या युती तोडा व जमिनीवर बसा ,मग माघार घेतली. आता मोदी प्रचाराला उतरणार म्हटल्यावर भाजपने आपल्या पेक्षा जास्त जागा जिंकता कामा नयेत या हट्टा पायी आपले मूळ शत्रू कोन्ग्रेस व राष्ट्रवादी बाजूला ठेवून भाजपलाच मूळ शत्रू केले आहे. कारण भाजपने जास्त जागा जिंकल्या तर यांचे मोठा भाऊ पण जाणार. आता मनसेचा म्हणे सहारा घेणार. मनसेची बेडकी बैल होऊ शकत नाही हेही माहित आहे पण भाजप सेने बद्दल एकही शब्द बोलत नसताना यांना मात्र त्याला अफझलखान बनवायचे आहे. राष्ट्रवादी बरोबर भाजप युती करेल असा प्रचार सेना काय करणार ,कारण तेच खरेतर भाजपला खच्ची करून आघाडीला मदत करत आहेत. "मी माझे नाक कापीन पण तुला अवलक्षण करीन" असलाच प्रकार आहे.

    उद्धव ठाकरें पवारांच्या खेळीला बळी पडले म्हणून ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी वर टीका न करता मोदी आणि भाजप वर टीका करत आहेत . विकासाचे कुठेले हि Vision नसून केवळ भावनिक आवाहन ते करत आहेत.मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही वेगळे करू शकणार नाही,‘‘ असे ठाम प्रत्युत्तर पंतप्रधान मोदी यांनी आज दिले असताना सुधा पुन्हा पुन्हा तोच भावनिक मुदा पुढे करत आहे आणि उघाच मोदि चा अपप्रचार करीत आहेत , महौतीत अस्तातिनी कुठे गेला होता याचा मोडी विरोध ???? काही मुदा नसल्या मुले परत गुजराती मुदा घेऊन अपप्रचार करीत आहे मित्रानो विकासाठी भाजपला पूर्ण भाहुमत द्या नाहीतर पुन्हा आघाडी सरकार परत येईल , देवेद्र फडणवीस सारखा आभासु आणि युवा उमेदवार मुख्यमत्री साठी सर्वात बेस्ट आहे .

    ReplyDelete
  11. सुजित खुप सुरेख प्रतिक्रिया. आणि अलिकडे उद्धव ठाकरे , मुंडे भगिनींना निवडून दया असे सांगत चांगुलपणाचा आव आणत आहेत. पण त्यांनी काही केले तरी त्या विजयी होणारच आहेत हे कुणी लहान मुलही सांगेल. असो त्यांच्या पापाचा घडा लवकरच भरेल. आणि उद्धव ठाकरेंनी कितीही छाती बडवली तरी काही फरक पडणार नाही. आपण निश्चिंत असा. भाजपा पूर्ण बहुमत घेऊन सत्तेवर येईल अशी चिन्ह आहेत.

    ReplyDelete
  12. आंबट - गोड, सध्या बाहेरगावी आहे. त्यामुळे उत्तरं उशीर झालाय. कृपया गैरसमज करून घेऊ नये . आजही सायबरला बसून उत्तरं देतोय.

    तुमचे आणि माझे विचार जुळतात. मतदारांनाही हे कळत असेल. आणि ज्या कुणाला कळत नसेल त्यांच्यासाठी आपण लिहायला हवं.

    ReplyDelete
  13. सुजित , तुझ्या दोन प्रतिक्रिया येऊन गेल्या. सध्या शेतावर आहे. त्यामुळे उत्तरं दयायला उशीर झालाय. कृपया गैरसमज करून घेऊ नये . आजही सायबरला बसून उत्तरं देतोय.

    आपण जनजागरण करू या. मी इथ गावी तेच करतोय.

    ReplyDelete
  14. अनामिक मित्रा सध्या शेतावर आहे. त्यामुळे उत्तरं दयायला उशीर झालाय. कृपया गैरसमज करून घेऊ नये . आजही सायबरला बसून उत्तरं देतोय.

    हे मतदारांना कळायला हवं. ज्यांच्या हे लक्षात येत नसेल त्यांच्या आपण लक्षात आणून द्यायला हवं. मी इथ गावी तेच करतोय.

    ReplyDelete
  15. रविंद्रजी रोकठोक प्रतिक्रियेबद्दल आभार. सध्या शेतावर आहे. त्यामुळे उत्तरं दयायला उशीर झालाय. कृपया गैरसमज करून घेऊ नये . आजही सायबरला बसून उत्तरं देतोय.

    आपले सगळेच प्रश्न रास्त आहेत. हे प्रश्न तुम्ही नव्हे विरोधकांनी उपस्थित केलेत. आणि आपल्यासारख्या भोळ्या जनतेच्या मुखी पेरलेत. परंतु साठ वर्ष या देशावर आणि राज्यावर राज्य करणारया काँग्रेस संदर्भात हे प्रश्न कोणी कधी उपस्थित केलेत ? सगळ्या गोष्टी होतील. धीर धरा.

    ReplyDelete
  16. सायली प्रतिक्रियेबद्दल आभार. सध्या शेतावर आहे. त्यामुळे उत्तरं दयायला उशीर झालाय. कृपया गैरसमज करून घेऊ नये . आजही सायबरला बसून उत्तरं देतोय. सगळे नव्हे भाजपा त्याला काहीसा अपवाद असायला हवी.

    ReplyDelete
  17. विजय सर बरे झाले तुम्ही ब्लोग चा विषय वेळे वर बदलला …. तुमचा ब्लॉग जरा ACTIVE झालाय …वाचून बरे वाटते … रोजच्या घडामोडी आणि राजकारण मस्त विषय आहे … असेच मस्त मस्त विषय पोस्ट करत जावा

    ReplyDelete
  18. मी ब्लॉगचा विषय बदलला नाही सुजित. पाऊस जसा सर्व प्रांतात पडतो. तसाच हा माझा रिमझिम पाऊस प्रेम, राजकारण, साहित्य, अशा वेगवेगळ्या प्रांतात पडणारच आहे. या देशातलं अस्थिर सरकार हा माझ्या दृष्टीनं नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. आणि आज निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळेच जनजागरण करावं या हेतूनं सध्या या विषयावर भर दिलाय.

    ReplyDelete
  19. आनंद आडसूळ10 October 2014 at 14:26

    खरच सर शिवाजी महाराज हि काही कुणाची जहागिरी नाही. पण जनतेवर स्वतःचा प्रभाव पडता येत नाही म्हणुन यांना शिवाजी म्हाराजांच नाव घेण्याशिवाय पर्याय नाही.

    ReplyDelete
  20. आनंदजी प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. असेच भेटत रहा.

    ReplyDelete