Sunday, 19 October 2014

Assembly election exit poll, shivsena, BJP : हा तर शिवसेनेचा पराभव

शिवसेनेनं भाजपाशी युती तोडली त्या क्षणापासून शिवसेनेला ६० ते ७० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत असा मला विश्वास होता. किंवा शिवसेनेला ६० ते ७० पेक्षा अधिक जागा मिळू अशी माझी मनोमन इच्छा होती. आता पर्यंतच्या एग्झीट पोल नुसार तसंच होणार आहे हे स्पष्ट झालंय. त्यामुळेच शिवसेनेला ६० ते ७० आणि भाजपाला ११० पेक्षा अधिक जागा मिळणं ' हा तर शिवसेनेचाच पराभव ' असं मला वाटतंय. 

फरक कसा असतो पहा.Assembly election exit poll 2104 :
मी ' हा तर शिवसेनेचाच पराभव ' असं म्हणतोय. तेच जर आपण शिवसेनेच्या नेत्यांना अर्थात प्रवक्त्यांना विचारलं तर ते , ' हा तर मराठी माणसाचा पराभव ' किंवा ' हा तर हिंदुत्वाचा पराभव ' किंवा ' हा तर महाराष्ट्राचा पराभव ' किंवा अगदी टोकाला जाऊन ' हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव ' अशी विधानं करतील. या पुढच्या राजकीय खेळ्या फार विचत्र असतील. आणि जेव्हा एका पक्षाला पुर्ण बहुमत मिळत नाही तेव्हा पाठींबा देणारा पक्ष स्वतःचाच स्वार्थ साधन्याचाच प्रयत्न करतो. आणि त्यामुळेच अशा प्रकारचं ते कधीही जनतेच्या हिताचं असू शकत नाही.

टिव्हीवर विविध चर्चा रंगताहेत. त्यातुन वेगवेगळे सूर उमटताहेत. मोठी बातमी म्हणत , ' राष्ट्रवादी भाजपाला पाठींबा देणार. ' अशी बातमी नुकतीच माध्यमांवर झळकली. पण भाजपा कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा पाठींबा घेणार नाही. पण भाजपा बरोबर सत्तेत सहभागी होताना शिवसेना अनेक अटी घालेल. आणि त्या अटी खुप जाचक असतील तरच भाजपाला वेगळा विचार करावा लागेल. शिवसेना मुख्यमंत्रीपद विभागून मागेल असा सूर टिव्हीवर विविध चर्चातून उमटतो आहे. परंतु मुख्यमंत्रीपदापेक्षाही वेगळ्या विदर्भाला विरोध या मुद्दयाला शिवसेना अधिक महत्व देईल असा माझा अंदाज आहे. का ते पुढच्या पोस्टमध्ये विस्तारानं लिहिण. 

पण शिवसेनेची हि पीछेहाट आणि प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे, संजय राउत यासह शिवसेनेच्या सगळ्याच नेत्यांनी भाजपावर ज्या रितीने टिका केली त्यावरून शिवसेनेचं नेतृत्व अर्थात उद्धव ठाकरे किती अपरिपक्व आहेत तेच सिद्ध होतंय.  


पण युती तोडल्यापासून आपलं मिशन १५१ प्लस पूर्णत्वास जाणार आहे आणि आपलंच सरकार सत्तेवर येणार आहे अशा अविर्भावात ' भाजपाच्या नेत्यांना भांडी घासायला लावू ' असलं हीन विधान संजय राउत यांच्यासारखा नेता करतो. ' मोदींचा बाप दामोदर आला तरी महाराष्ट्रात शिवसेनेचा पराभव करू शकणार नाही .  ' असं विधान उद्धव ठाकरे करतात. हे असले नेते महाराष्ट्राला काय संस्कार आणि संस्कृती देणार आणि महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवणार हा विचार सुद्धा करवत नाही. 

आता आपल्याला आहे ती परिस्थिती स्विकारणं भाग आहे. शिवसेना - भाजपा एकत्र येतील आणि सरकार स्थापन करतील असा मला विश्वास आहे. फक्त पाच वर्षानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी जसे एकमेकांवर आरोप करताहेत तशी वेळ शिवसेना आणि भाजपवर येऊ नये हे निश्चित. 

आणखी एक महाराष्ट्रात स्वबळावर राजकारण करण्याची आपली कुवत नाही आणि भाजपा हाच आपला मोठा भाऊ आहे हे शिवसेनेने आता तरी लक्षात घ्यावं. 

20 comments:

  1. मी ' हा तर शिवसेनेचाच पराभव ' असं म्हणतोय. तेच जर आपण शिवसेनेच्या नेत्यांना अर्थात प्रवक्त्यांना विचारलं तर ते , ' हा तर मराठी माणसाचा पराभव ' किंवा ' हा तर हिंदुत्वाचा पराभव ' किंवा ' हा तर महाराष्ट्राचा पराभव ' किंवा अगदी टोकाला जाऊन ' हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव ' अशी विधानं करतील.
    Are tu pan ' modi is india ; india is modi' aslya comment kartos na bhikardya. Baman mukhyamantri banavnar tar tyachya navane mat magayachi. Modi(obc) chya navane ka mate magitali.

    ReplyDelete
  2. मित्रा एवढी सणसणीत प्रतिक्रिया दयायची तर कमीत कमी नाव तरी टाकायचं. असो पण माझे इतरही लेख वाच. शिवसेनाच काय कोणत्याही स्थानिक पक्षाचं राजकारण जनहिताच आणि देशहिताच असुच शकत नाही. पण हे तुमच्यासारख्या मतदारांना कळत नाही त्याला कोण काय करणार ? असो प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
  3. Nav takun fakt jat kalat aste. Tyacha post barobar kahihi sambandh nahi. Ani sthanik paksha lokanch hit baghat nahit?

    ReplyDelete
  4. i agree with mr vijay.

    ReplyDelete
  5. BJP war kasa marathi mansane vishwas thewawa ? Pardeshatil kala paisa ( Black Money) baabat BJP ne aata Palti khalli aahe, Marathi Belgaon sharache Belgaavi he kannad namantarala hyach BJP sarkarne parvaangi dewun Marathi mansavar motha anyaay kela aahe!! Sivsenecha ikade lakshya aahe ???

    ReplyDelete
  6. 2 hours ago
    hey doghana mahit hotha ki Marathi vote futnaarach. 2009 saal chya nivadnukit aaaplyala doosrya bhasikaani saath dili karan BJP shivsena barobar hothi. Pan ya veli shivsena ani manase la marathi mansaan shivay kauni vote denar nahi asa doghana thavook hotha, tari yaana samjla kasa nahi? Arey aaj aaplya rajyat evdhe parpranti hayet tyamadhe tumhi ase marathi matache vibhajan kela tar kasa chalnar. Mi kataar Mansainik haye pan aat madhun hi bhiti hoti ki jar shivsena pan nahi ali tar Maharashtra cha kaay honar. Bara jhala kamit kami doghana samajla asel ki tey exactly kuthe hayet.
    Raj Thackeray yancha kaay ek seat nahi hanoo shakat Nashik madhe. Arey tumhi Godha park var lakshya denya peksha jaar mulbhut garja jase Raste, pani, veej ani lokan madhe misloon lakshya dile aste tar lokha samadhani aste. Lokana aaram nako pan gharja bhagli pahije. Total failure from MNS. Mahit haye tumhi mothi project ghetli hayet pan lokana immediate result hava asto. Hi mothi project tumhi nantar pan karoo shaktat. Aso jassi karni tasshi bharni..... pan hey vakya dusrya pakshyanna lagat nahi. te kiti pan nagde nachale tari lokha tyanach vote denar. karan disha bhool karayla hi mansa pudhe astat. Jai shivsena

    ReplyDelete
  7. मित्रा या आधी तुझी जी प्रतिक्रिया आली होती तिला मी दिलेल्या उत्तराला हे तुझा उत्तर दिसतंय. असो जातीचा आणि नावाचा काही संबंध नाही. किंवा मी नाव त्यासाठी टाकायला सांगितलं नाही. पण मी दिलेल्या उत्तरात मी आपल्या नावाचा संदर्भ लिहिल्यास मी कुणाच्या प्रतिक्रियेला उत्तर दिलं आहे ते इतर वाचकांना कळायला सोपं जातं. असो स्थानिक पक्ष जनतेच्या हिताचा विचार करत नाहीत या माझ्या विचाराशी मी ठाम आहे. अगदी उद्धव ठाकरेंचा जाहीरनामा आपण पाहिलात तरी त्यात बेकारी , महागाई, शेतमालाला हमी भाव हे मुद्दे कुठेच नव्हते.

    ReplyDelete
  8. मित्रा शक्यतो निनावी प्रतिक्रिया देऊ नये.

    Choose an identity या सुचनेखालील तिसर्या क्रमांकाचा पर्याय स्विकारून आपण केवळ आपले नाव टाकूनही प्रतिक्रिया देऊ शकता. असो आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

    ReplyDelete
  9. मित्रा शक्यतो निनावी प्रतिक्रिया देऊ नये. Choose an identity या सुचनेखालील तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय स्विकारून आपण केवळ आपले नाव टाकूनही प्रतिक्रिया देऊ शकता. मित्रा आपण जे प्रश्न उपस्थित केलेत त्याच्याशी आपला काहीच संबंध नाही. विदर्भ वेगळा झाला तर तो पाकिस्तानला जोडला जाणार नाही. बेळगावचे बेळगावी झाल्याने काही फरक पडत नाही. काळा पैसा भारतात आणण्याचं आश्वासन आजपर्यंत अनेकांनी दिलं पण द्विपक्षीय करार करताना काँग्रेस असा काही करार केलाय कि आपण हतबल होतो. तरी मोडी यातून काही मार्ग काढतील असा विश्वास बाळगू. पण या सगळ्या पेक्षा बेकारी , महागाई, शेतमालाला हमी भाव, वीज, पाणी, रस्ते, शिक्षण हे मुद्दे आपल्या दृष्टीने अधिक महत्वाचे आहेत.

    ReplyDelete
  10. मित्रा शक्यतो निनावी प्रतिक्रिया देऊ नये. Choose an identity या सुचनेखालील तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय स्विकारून आपण केवळ आपले नाव टाकूनही प्रतिक्रिया देऊ शकता. मित्रा बेकारी , महागाई, शेतमालाला हमी भाव, वीज, पाणी, रस्ते, शिक्षण हेच आपले मुलभूत मुद्दे आहेत हे जसं तुला कळतं आहे तसं प्रत्येकाला कळालं तर किती बरं होईल. आणखी एक माझ्या ब्लॉगच्या उजव्या बाजुला मराठी लिहिण्याची सोय आहे. तिथे मराठीत लिहून आपण मराठीत प्रतिक्रिया देवू शकता.

    ReplyDelete
  11. सर ,
    तुम्हाला नेहमीच शिवसेनेवर टिका करुन
    मनाला शांती लाभत असेल तर ते तुमच्यासाठी उत्तमच आहे . भाजप बद्दल तुमचे प्रेम एवढे उफाळुन येत आहे ते काही दिवस मि बघतो आहे , पण ह्याच भाजप वाल्याची बेळगाव प्रश्नी दुटप्पी भुमिका किंवा मागच्या महिन्यात पालघर मधला तो सागरी संरक्षण प्रकल्प मोदीनी गुजरात ला नेला , काल परवा गुजरात च्या मुख्य्मंत्री मुम्बईत येवुन उद्योजकाना बोलतात कि गुजरातेत चला आणी शिवाय स्वताहाच्या निव्वळ फायद्यासाठी विदर्भ वेगळा करण्याचा , 105 हुतात्म्याच्या रक्ताने निर्माण झालेला महाराष्ट्र तोडण्याचा जो घाट भाजप घालते आहे ते तुम्हाला दिसत नसेल बहुतेक .
    निवडणुकी आधी आम्हाला कोणाची गरज लागणार नाही . आम्ही याव करु आम्ही त्याव करु अशा वल्गना करणारे भाजप नेते आता काय प्रतीक्रिया देत आहेत ते आपण बहुधा बघत असालाच , शिवाय मोदीनी ईथे 22 सभा घेवुन सुध्हा 110 ते 120 च्या आसपास भाजप जाताना दिसते म्हंजे विधानसभेतील हे यश म्हंजे मोदींचा सपशेल पराभव आहे .
    तुमचे प्रत्येक विश्लेषण हे भाजप कडे झुकलेले असते आणी शिवसेना विरोध म्हंजे तुमच्या लेखाचा आत्माच असतो जणु त्यामुळे तुमची प्रतिक्रिया म्हंजे महाराष्ट्राची प्रतिक्रिया अशा थाटात चालु नका .

    ReplyDelete
  12. Avadli post . dhanyavad

    ReplyDelete
  13. Varchi pratikiya patli. Jai shivsena. Brahman naslele bjp kade ka manun jatat tech kalat nahi. Baman nehmi 1 no. Position var rahtat ani dusrya jatichya mansala kamavar thevtat.
    Jase (namo) la thevle ahe. Pan khari power ahe RSS chya hatat. BJP ahe te reservation kadhayla basliye.

    ReplyDelete
  14. प्रसादजी सर्वप्रथम अत्यंत परखड प्रतिक्रियेबद्दल तुमचे मनापासून आभार. माझे इतर लेख वाचलेत तर माझं आणि शिवसेनेचं नातं किती जवळचं आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळेच शिवसेनेवर टीका करताना मला आनंद होत नाही. पण युती तोडण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय अत्यंत दुर्दैवी होता. आज युती अति तर आपल्या २२० च्या आसपास जागा आल्या असत्या. भाजपाचं सोडा ६३ जागांवर आलेली शिवसेनाही आम्ही स्वबळावर सत्ता स्थापन करू असाच म्हणत होती ना ? शिवसेनेचं सोडा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा हेच म्हणत होते. प्रसादजी आपण इतर जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्या पेक्षा बेकारी, महागाई, शेतीमालाला हमीभाव, वीज, रस्ते, पाणी, दळणवळण या आमच्या प्रमुख गरजा आहेत. आणि याविषयी जो बोलेल त्यालाच मतदारांनी पाठबळ द्यावं. भले मग ती शिवसेना असो अथवा काँग्रेस. पण शिवसेनेच्या वचननाम्यात यातले कोणते मुद्दे होते ते पहा जरा.

    ReplyDelete
  15. मित्रा प्रतिक्रियेबद्दल तुमचे मनापासून आभार.

    ReplyDelete
  16. प्रसादजी सर्वप्रथम अत्यंत परखड मित्रा प्रतिक्रियेबद्दल तुमचे मनापासून आभार. आपण म्हणताय तसे काही नाही. ब्राम्हण हा भाजपाच्या राजकारणाचा पाया आहे असे आपणास वाटत असेल तर महाराष्ट्रात शरद पवार इतर जातींना खालच्या पातळीवर ठेऊन मराठा समाजाचं राजकारण करत नाहीत का ? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याणसिंगांची जात कोणती होती ? मुख्तार अब्बास यांच्यासारखे अनेक नेते भाजपात नाहीत का ? भाजपावर ब्राम्हण धार्जिणे असा आरोप करताना समाजातल्या कितीतरी जुन्या रूढी परंपरा मोडीत काढणारे ब्राह्मणच होते याचा आपल्याला विसर पडतो.

    ReplyDelete
  17. प्रसाद वैद्य20 October 2014 at 12:11


    आपण जे म्हणत आहाते ते
    बेकारी, महागाई,
    शेतीमालाला हमीभाव, वीज, रस्ते, पाणी,
    दळणवळण हे तर महत्वाचे मुद्दे काय तर महत्वाच्या गरजा आहेत पण आपण ईथे भावनेविषयी बोलतो , तुम्हाला माहीती असेलच की राजकारण हे या मुद्द्या पेक्षा भावनेवर चालते.
    आपण नाव घेतली त्याप्रमाणे (कल्याणसिंग ,मुख्तार अब्बास ) भाजप ने थोडी फार काम केली ईतर जातीसाठी तर उपकार नाय केले .
    आता मोदी आल्यापासुन हा पक्ष तर सर्वसामान्यासाठी मुळीच नाही ,हे व्यापारी लोक काय भल करतील या बद्दल शंकाच आहे .
    आज पर्यत राम मंदीर मुद्दा मांडत होते . रामाच्या नावावर यानी राजकारण केल आणी आज राम मंदीर बद्दल विचारले तर प्रश्नाना बगल देतात . अरे बांधा ना राम मंदीर आता तर बहुमत आहे ना तुमच्याकडे पण ह्याना फक्त राजकारण करायचे आहे .
    राम मंदीर जरुर बनायेंगे लेकीन
    तारीख नही बतायेंगे
    ह्या प्रवृत्तीची माणसे ही .
    बाबरी मशीदीच्या वेळी पण कुल्यात शेपट्या घालुन पळाली ही माणसे तेव्हाचे बाळासाहेबांचे statement तुम्हाला आठवत असेलच .
    काळ्या पैशाबद्दल संसद महीना महीना बंद पाडणारे हे लोक काल परवा सुप्रीम कोर्टात काय बोलले हे सगळ्या देशाने पाहीलेच आहे.
    हे भाजप वाले ढोंगी लोक मुळात स्वताला हिंदुत्ववादी म्हणवुन घेण्याच्या लायकीचे नाहीत .

    जी लोक आज मोदी मोदी नावानी जयघोष करत आहेत त्याना लवकरच कळुन चुकेल की आपण व्यापार्याला निवडुन दिलेय पंतप्रधानाला नाही .
    ज्या व्यक्तीने आपल्या राजकीय गुरुलाच (आडवाणी ) विजनवासात पाठवण्याची कामगीरी केली , ती व्यक्ती काय करु शकेल या बाबत शंकाच आहे .
    राहीला प्रश्न युतीचा , उध्दव ठाकरेनी युती मुळात तोडलीच नाही . ज्यांचा हात पकडुन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे झालो त्या भावाच्या पाठीत खंजीर खुपसणार्याची ही औलादच नाही का . ह्याची लायकी तरी होती का महाराष्ट्रात मोठे व्हायची , शिवसेनेच्या जिवावर मोठे झाले. ह्यांच्या कडे एक चेहरा तरी आहे का कि ज्याला महाराष्ट्रात मान्यता आहे . मुंडे सोडले तर एक पन नाही तसा .
    मतांची भिक मागताना सुध्दा मोदींच्या नावांने मागत कारण याना माहीती आहे आपल्या नावावर 50 मत नाय पडणार .

    मला अभिमान वाटतो तो एवढ्याच गोष्टीचा की शिवसेनेचे 63 आमदार निवडुन आले ते केवळ शिवसेनेच्याच बळावर ,
    एका बाजुला प्रचाराला सगळे केंद्रातले मंत्री आले असताना
    उध्दव ठाकरेनी एकट्याने झुंज दिली . आणि
    आता तुमच्या सारखी शिवसेनेचा द्वेष करणारी माणसे म्हणु शकत नाही... कि,, हे आमदार मोदी लाटे मुळे निवडुन आलेत....


    ReplyDelete
  18. प्रसादजी भावनेच्या मुद्यावर राजकारण चालते हे या नेत्यांनी चांगलेच ओळखले आहे. आणि अशा रितीनं आमच्या देशाचं राजकारण चालणं हे आमच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे. आपण शिवसैनिक उद्धव ठाकरेंची भाषा बोलता. आपल्या प्रतिक्रियेतली बहुतेक वाक्ये उद्धव ठाकरेंच्या ऐकली आहेत. साठ वर्ष या देशावर राज्य करणाऱ्या कॉंग्रेस संदर्भात शिवसेनेने आणि शिवसैनिकांनी एवढी आगपाखड केल्याचे ऐकिवात नाही. आपण जरी उद्धव ठाकरेंची भाषा बोलत असलात तरी मी माझे विचार मांडतो आहे. हे कुणी स्विकारायचे कुणी नाही हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. माझं म्हणणं एवढंच भावनिक मुद्द्यांपेक्षा देशाचा विकास महत्वाचा. बर मोडी काही पुढ्या ६० वर्षासाठी सत्तेत आलेले नाहीत. पाच वर्षात अपेक्षित परिणाम नाही दिसला तर आहेच न पुन्हा निवडणुका. पण मोदींना सत्तेत येऊन ५ महिने होत नाहीत तोवर प्रत्येकानं जो मोदी विरोधी पावित्रा घेतला आहे तो चुकीचा आहे. मोदी एवढे सत्तालोलुप असते तर कधी नव्हे ते गुजराती जनता भाजपाला १५ वर्ष राज्य करू द्यायला मूर्ख आहे का ? केवळ गुजरात हे एक उदाहरण नाही. उत्तराखंड आहे. मध्यप्रदेश आहे. गोवा आहे. मराठी माणसाला स्वतः कधी मोठं होता आलं नाही. आणि त्यानं दुसऱ्यालाही कधी मोठं होऊ दिलं नाही. या अशा वृत्तीमुळेच महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेले. आपल्याला काही जमलं नाही कि दुसऱ्याच्या नावानं खडे फोडायचे हा महाराष्ट्रीयन माणसाचा आणखी एक गुण. एवढाच वाटतं ना द्यावाना शिवसेनेने बिनशर्त पाठींबा. कशाला हवा सत्तेत सहभाग ? म्हणूनच मगच्या उत्तरात मी तुम्हाला सल्ला दिला होता कि माझ्या ब्लॉगवरच्या सगळ्या पोस्ट वाचा. तुमच्यापेक्षा शिवसेना मला किती जवळची आहे ते कळेल. आणि शेवटचं देशभरातल्या स्थानिक पक्षांच्या राजकारणामुळेच आमच्यातली देश हि भावना मोडीस निघत चालली आहे.

    ReplyDelete

  19. माझे हे स्वताचे मत आहे आणि माझ्या सारखी मते ईतरांची सुध्दा असु शकतात आणि उध्दव ठाकरेंची थोडी फार मत पटली तर त्यात गैर असे काय आहे .
    मोदीना सत्तेत बसवायला आम्ही पण कष्ट घेतले हो पण मोदी ज्या प्रमाणे आता गुजरात केंद्रीत राजकारण करतात ह्या गोष्टीचा राग येतो .
    पालघर चा जो प्रोजेक्ट मोदिनी गुजरातला पळवला त्याबद्द्ल किवा काल परवा गुजरात च्या मुख्य्मंत्री मुम्बईत येवुन उद्योजकाना बोलतात कि गुजरातेत चला अशा गोष्टी बद्दल तुमच्या सारख्या लोकाना काय बोलायचे नसतेच मुळी.
    तुम्ही म्हणतात त्या प्रमाणे गुजराती जनतेने भाजपाला १५ वर्ष
    राज्य करू दिले मग महाराष्ट्रात congess Ncp ne 15 वर्ष राज्य केले मग मग सगळा मराठी माणुस काय मुर्ख होतो काय ?
    मराठी माणसाला स्वतः कधी मोठं
    होता आलं नाही. आणि त्यानं
    दुसऱ्यालाही कधी मोठं होऊ दिलं
    नाही. या अशा वृत्तीमुळेच
    महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेले हे तुमचे आरोप निव्वळ खोटे आहेत .
    शिवाजी महाराजाना कालपर्यत सुरतेचा लुटारी म्हणणारे लोक आज महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला घेवुन जात आहेत हे तुमच्या दृष्टीला दिसत नसेल बहुतेक (कधी दिसणार ही नाही).
    आणखी एक मुद्दा तुम्ही म्हणतात तो की शिवसेनेने
    बिनशर्त पाठींबा द्यावा .
    कशाला द्यायला पाहीजे पाठींबा काल पर्यत हिच लोक म्हणत होती कोणाची गरज नाही लागणार , मोठ्या फुशारक्या मारीत होती आणी आज भिक मागत आल्यात ना दारात .

    महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे स्वप्न बघणार्या हरामखोराना कशाला द्यावा बिनशर्त पाठीबा.
    स्थानीक पक्षान्मुळेच थोडी फार अस्मीता टीकुन आहे नायतर हे राष्ट्रीय पक्ष काय करुन ठेवतील हे न सांगीतलेलेच बरे .

    ReplyDelete
  20. प्रसादजी नाव टाकलं नसेल तरी हि प्रतिक्रिया आपलीच असावी असं समजून हे उत्तर लिहितोय. मी नव्या लिखाणाच्या गडबडीत आहे. पण तरीही आएल्य प्रत्येक प्रतिक्रियेला सविस्तर उत्तर देणं मी माझं कर्तव्य समजतो.

    आपणास उद्धव ठाकरेंची मतं पटली तर त्यात मला किंवा कोणालाही गैर वाटण्याचे काहीच कारण नाही. प्रसादजी तुमची राजकारणातली ओळख किती मला माहित नाही. मी मात्र शिवसेनेतल राजकारण फार जवळुन पाहिलं आहे. ते लिहू शकत नाही. पण मी तुम्हाला सुरवातीपासून सांगत आलोय की माझे इतर लेख वाचा आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. मी मुळात भाजपाचा समर्थक नाही आणि शिवसेनेचा विरोधक नाही. जे चूक ते लोकांच्या नजरेस आणून देण्याचा आणि लोकशाहीला जागं करण्याचा एक इवलासा प्रयत्न मी करतो आहे.

    ReplyDelete