Saturday, 29 November 2014

BJP, shiv sena : शिवसेनेचा आणखी एक पराभव

खरंतर सत्तेची हाव कुणाला ? भाजपाला कि शिवसेनेला ? या विषयावर मी लिहिणारच नव्हतो. कारण काय या विषयावर चर्चा करण्याचं ? भाजपा शिवसेना एकत्र येणं हि महाराष्ट्राची गरज आहे. पण मला ज्या अनेक प्रतिक्रिया येतात त्यात शिवसेनेचे काही पाठीराखे भाजपाला सत्तेची हाव आहे असे म्हणतात. त्यांचे म्हणणे खोडून काढणे हा माझा हेतु नाही. पण वस्तुस्थिती काय आहे हे वाचकांसमोर मांडायलाच हवे. म्हणुन या विषयावर लिहायला घेतलं. 

Thursday, 27 November 2014

BJP, MIM, Shivsena : देशद्रोही इमाम शाही

( रसिक वाचकांनी तळास असलेले व्यंगचित्र आवर्जून पहावे. )

लोकसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रेसला मुस्लिम समाजाच्या शाही इमामांनी जाहीर पाठींबा दिला. मुस्लिम समाजाला भाजपाच्या विरोधात मतदान करण्याचं आव्हान केलं. काँग्रेसलाही तो पाठींबा गोड वाटला. कोणी कोणाला पाठींबा दयावा आणि कोणी कोणाचा पाठींबा घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण

Monday, 24 November 2014

Shivsena, BJP : संजय राउतांची गच्छन्ति

( तळाच चित्रं आवर्जून पहा ) 
उद्धव ठाकरेंनी सामनाचं संपादकपद संजय राउतांना देऊन जणु शिवसेनेचं शिवधनुष्यचं संजय राउतांच्या हाती दिलं होतं. पुढे ते शिवसेनेचे प्रवक्ते झाले. आणि मग असे काही तीर सोडत राहिले कि विचारता सोय नाही. धनुष्यातून बाण सोडताना त्यांनी कुठलंही भान बाळगलं नाही. त्यामुळे 

Saturday, 22 November 2014

Shivsena, BJP, NCP : पवारांची पलटी

देशाच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांचा मन मोठा असला तरी त्यांची पत फार कमी आहे. आणि म्हणुनच इच्छा आणि पात्रता असुनही ते कधीच देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत. पण राजकीय डाव टाकण्यात त्यांच्या एवढा पट्टीचा मल्ल अवघ्या देशात नाही.  त्यामुळेच स्थिर सरकारसाठी भाजपाला पाठींबा असं ठासून सांगणारे शरद पवार आज सरकार स्थापन करून केवळ दहा दिवस झाले नाहीत तोच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील असं भाकीत करतात. तेव्हा त्या विधानाचा मतितार्थ शोधावाच लागतो. पण खरचं तसं घडेल का ?