Wednesday 24 December 2014

BJP, congress : मोदींचा अश्वमेघ

रामायणात श्री राम प्रभुंनी आपल्या राज्याच्या परिसीमा विस्तारण्यासाठी अश्वमेघ यज्ञ केल्याचा उल्लेख आहे. असा यज्ञ अनेक राजे करीत. यज्ञ करून एक अश्व मोकळे सोडले जात असे. त्या अश्वाला जो कोणी अडवेल त्याच्याशी युद्ध करून ते राज्य खालसा केले जात असे. असाच एक यज्ञ
नरेंद्र मोदींनी आरंभला आणि गेली आठ महिने त्यांचा अश्व एकेक राज्य पादाक्रांत करीत निघाला आहे.          ' ' काँग्रेस मुक्त भारत ' हि मोदींची घोषणा. भाजपाची सुत्रे हाती घेतल्यापासुन मोदींच प्रत्येक पाऊल त्या घोषणेवर शिक्कामोर्तब करतंय. 
२०१४ च्या सुरवातीला मोदी आणि भाजपा हा विषय फारसा चर्चेत नव्हता. पण काँग्रेसचा भ्रष्टाचार सर्वांच्या मुखी होता. टुजी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा खाण घोटाळा ही प्रकरणे राजीव गांधींच्या काळातील बोफ़र्स आणि लालुंच्या चाराघोटाळ्यापेक्षा अधिक गाजली. भरीस भर म्हणुन महागाईनं महाकाय रूप धारण केलं, डॉलरच्या तुलनेत रुपया घसरून मातीमोल होऊ लागला. आणि अशा सर्वदूर पसरलेल्या काळोखातून एक प्रकाशाचा किरण दिसू लागला. त्या प्रकाश किरणाचं नाव नरेंद्र मोदी. 

लोकसभेत स्वबळावर सत्ता मिळविली. मध्यप्रदेश , गुजरात , उत्तरांचल या राज्यातली १५ वर्षातली एकहाती सत्ता राखतानाच राज्यस्थान विधानसभेत निर्विवाद बहुमत प्राप्त केले. पाठोपाठ आलेल्या महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशातल्या निवडणुकात तिथली सत्ता हस्तगत केली. झारखंड काबीज केलं. जम्मू-काश्मीर मध्ये अपेक्षित यश मिळालं नाही. पण भाजपाने एकटया जम्मु काश्मीरमध्ये २५ जागा जिंकल्या. पण कॉंग्रेसला जम्मु काश्मीर आणि झारखंड या दोन्ही राज्यात मिळुन केवळ १७ जागा जिंकता आल्या. त्यामुळेच ' काँग्रेस मुक्त भारत ' या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं असं म्हणता येतं. 

मोदींचा अश्वमेघ कसा आणि कोणी रोखायचा याचं उत्तर काँग्रेसकडे नाही. सोनिया गांधींची मात्रा चालत नाही. राहुल गांधींची हिम्मत होत नाही. बाकी सारे त्यांच्या मागे लपत असल्याने मोदींचा अश्वमेघ अडवायला काँग्रेसमधुन कोणी पुढे सरसावेल याची शक्यता नाही. लवकरच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. तिथे काँग्रेस स्पर्धेतही नाही. केजारीवालांची ' आप ' तिथे थोडीफार चुरस रंगत आणेल. पण ' सरड्याची धाव कुंपणापर्यंत. ' त्यामुळेच दिल्ली विधानसभेवर भाजपाचा झेंडा फडकेल यात शंका नाही.              

काँग्रेस सतत पराभवाचा सामना करतेय याचा मला मुळीच आनंद नाही. उलट कॉंग्रेसन लवकरात लवकर या पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडुन एक प्रमुख राष्ट्रीय विरोधी पक्ष म्हणुन स्थान मिळविणं हि या देशाची गरज आहे. पण सध्यातरी ते शक्य दिसत नाही. 

विखुरलेला जनता परिवार एकत्र येतोय. तिसरी आघाडी स्थापन करून मोदींच्या विरोधात दंड थोपटू पहातोय. त्यांना कितपत यश मिळेल. हे वर्षभरात येऊ घातलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकात दिसेल. पण मोदींच्या कामाचा झपाटा पहाता त्यांना फार यश मिळेल असे वाटत नाही. ममतांचा तृणमुल दिवसेंदिवस अडचणीत येत चालला आहे. 


एकुणच आज तरी मोदींचा अश्वमेघ रोखायला कुणी समर्थ आहे असे दिसत नाही. याचाच फायदा काही हिंदुत्ववादी प्रवृत्ती घेताना दिसताहेत. त्यातुन काही वाईट घडणार नाही. पण विरोधकांना आणि माध्यमांना विषय मिळतो आहे. अर्थात मोदी या प्रवृत्तींना लवकरच वेसण घालतील आणि ' सबका साथ , सबका विकास ' या मंत्रासह देशाला प्रगती पथावर नेतील. विरोधकांनी कितीही गोंधळ घातला, कितीही रान पेटविले तरी जोपर्यंत देशाची जनता  विश्वास दाखवेल तोपर्यंत मोदींच्या अश्मेघाच्या लगामाला हात घालणे कोणालाही शक्य होणार नाही.                 

2 comments:

  1. नरेंद्र मोदींना काँग्रेस ने कितीही शिव्या दिल्या तरीसुद्धा त्यांचा करिष्मा कमी होण्याचे नांव घेत नाही. देशातील जनता काँग्रेस ला आणि तत्सम पक्षांना पूरती विटली आहे. फोडा आणि झोडा आणि लूटा या त्रिसुत्रीवर चालणाऱ्या खांग्रेसला आता शमशान घाटावर पोचवल्याशिवाय देशातील जनता स्वस्थ बसणार नाही हाच काश्मीर आणि झारखंड मधील निकालांचा अन्वयार्थ आहे. लोकसभा निवडणुकीपासून एकेक राज्य जिंकत निघालेल्या भाजपने झारखंडमध्येही विजयकमळ फुलवले असून, भारताचे नंदनवन असलेल्या जम्मू-काश्मीरमध्येही जोरदार मुसंडी मारत आपला आवाज बुलंद केला आहे. काँग्रेस व झारखंड मुक्ती मोर्चाचे आघाडीचे राजकारण संपवत भाजपने मित्रपक्ष एजेएसयूच्या साथीने झारखंडमध्ये प्रथमच बहुमताची सत्ता स्थापन केली. जम्मू-काश्मीरमध्ये २५ जागा जिंकत भाजपने केसरीया फडकवला.

    ReplyDelete
  2. सुजीतजी, आपले म्हणणे खरे आहे. पण काँग्रेसन सावरायला हवं. कारण प्रबळ सत्ताधारी पक्षाबरोबरच बलवान विरोधी पक्ष हि सुद्धा प्रत्येक देशाची गरज असते.

    ReplyDelete