दोन दिवसांवर थर्टी फस्ट आलाय. प्रत्येक बारला चौपाटीच स्वरूप प्राप्त होईल. घरदार , गड किल्ले , गच्च्या - बिच्च्या सगळीकडे तळीरामांच साम्राज्य असेल. दुसऱ्या दिवशी थर्टी फस्टच्या रात्री किती अपघात झाले. कितीजण त्या अपघातात बळी गेले. याच्या बातम्या झळकतील. त्यात पिऊन टाईट स्वतः वरचं नियंत्रण गमावलेले असतीलच. पण न
पिलेला सुधा एखादा असेल. अर्थात ,' पिऊ नका ' असं मी म्हणणार नाही. पण पिणं म्हणजे सेलिब्रेशन का ? रस्त्यावर बेलगाम आरडा ओरडा करणं म्हणजे सेलिब्रेशन का ? याचा विचार करा. प्या पण हि कविता मनाच्या कोपऱ्यात ठेवून प्या. प्रकाशाच्या पलीकडे असलेल्या काळोखाला सामोरं जावं लागणार नाही याची काळजी घ्या.
हि कविता माझी नाही. कधी नव्हे ते पहिल्यांदा मी दुसऱ्याचं लेखन माझ्या ब्लॉगवर प्रकाशित करतोय. पण हि कविता मी जशीच्या तशी प्रकाशित केलेली नाही. अनेक नव्या कवींच्या लिखत असतात तसे अनेक दोष या कवितेत होते. त्यामुळेच मी तिच्या अनेक बदल केले आहेत. कविता या वर्गात मी या लेखनाचे वर्गीकरण करणार असलो तरी मी या लेखनाला कविता म्हणणार नाही. या लेखनाला फार तर प्रासंगिक लेखन म्हणता येईल.
आई,
तू म्हणाली होतीस,
पार्टीला जायचंय, तर जा..
पण ‘पिऊ’ नकोस.. !
आई,
खरं सांगतो. मी नाही प्यायलो.
मी फक्त सॉफ्टड्रिंक प्यायलो.
सोडा असलेलं..!
मित्रांनी खुप आग्रह केला
म्हणाले, " पी रे. पी रे ! "
पण नाही प्यायलो मी.
सगळ्यांनी चिडवलं मला,
भरीस पाडलं.
पण मी नाहीच ग्लासला हात लावला.
तुला दिलेलं न पिण्याचं प्रॉमिस पाळलं मी आई !
आई,
" न पिता एन्जॉय करता येतं. "
हे तुझं वाक्य माझ्या लक्षात होतं.
मला गरजच नाही वाटली नशेची.!
पार्टी संपत आली आहे आत्ता.
जो तो घराकडे निघालाय.
पिऊन ‘टाईट’ झालेले माझे मित्र
स्वत ड्राईव्ह करत घराकडे निघालेत.
मीही माझ्या कारजवळ पोहोचलोय.
निघालोय. पूर्ण शुद्धीत..!
मी येईन घरी धडधाकट.
नशेत गाडी ठोकण्याचा,
काहीबाही होण्याचा प्रश्नच नाही
कारण मी प्यालोच नाही आई .
आई,
मी गाडी काढतच होतो बाहेर.
तेवढ्यात एक गाडी सुसाट आली
मला धडकुन एका पोलवर आदळली
तसं रक्त उडतंय माझ्या अंगातनं
माझा मी मलाच पहातोय
वाहताना लाल रंगातनं.
डॉक्टर, पोलीस, बघणारे खुप जण जमा झालेत.
पिऊन तीत झालेले अनेकजण कट मारून पुढे गेलेत.
डॉक्टर म्हणताहेत..
काही चान्सेस नाही,
संपलंय सारं.
काहीच उपाय नाही.
नाही वाचणार हा.
आई तुझी शपथ.
मी ‘प्यायलो’ नव्हतो गं.
मी ‘प्यायलो’ नव्हतो गं.
तरीही असं का झालं
दुसऱ्याचं पिणं
माझ्या जीवावर का आलं ?
आई
मला मरणाचं दुख्ख नाही
उलट तुला दिलेला शब्द पाळल्याचा आनंदच आहे.
त्यामुळेच मला पाहिल्यानंतर तुला हसता आलं नाही ना आई
तरी रडू नकोस.
हा पिला तर नसेल ना ?
या शंकेला चुकुनसुद्धा बळी पडु नकोस.
जमलंच तर प्रत्येक बारसमोर
माझा पुतळा उभा कर
आणि खाली लिही
" थर्टी फस्टच्या दिवशीच माझा मुलगा
अपघातात बळी गेला होता
पण शपथ घेऊन सांगते तो प्यायला नव्हता.'
हे त्याला मी पढवल होतं
तुमच्यासारख्याच कुणीतरी त्याला उडवलं होतं."
काही असो मित्रानो पण या शब्दातल्या भावना लक्षात घ्या आणि थर्टी फस्टला दोन घोट कमीच प्या.
अप्रतिम लेखन. मुळ कविता दुसऱ्याची असल्याचे सांगण्याचा प्रामाणिक पण दाखवलात त्याबद्दल अभिनंदन. मुळ कविताही माझ्या वाचण्यात आली होती. त्यामुळे मुळ कवितेत बदल करताना आपण आपली छाप सोडली आहे नक्की. शेवट खूप छान केला आहे.
ReplyDeleteवैभव अभिप्रायाबद्दल आभार. दुसऱ्याची संकल्पना वापरून मी कधीच लिहित नाही. परंतु विषय आवडला. फेसबुकवर माझ्या एका मित्रानं हा विषय पोस्ट केला होता. इतरांशी शेअर करावा असं सुचवलं होतं. मलाही ते पटलं. म्हणून मी मला हवे तसे ब्दाल्क्रून हि कविता लिहिली.पन मुळ कवीचं आणि त्यांच्या संकल्पनेच श्रेय मी घेऊ शकत नाही.
ReplyDeleteखुप छान लिहिलंय.
ReplyDeleteकिरण प्रतिक्रियेबद्दल आभार. परंतु हि पोस्ट सर्वात कमी वेळा वाचली गेली आहे हि वस्तुस्थिती आहे.
Delete