' पीके ' वर अनेकांनी लिहिलं आहे. तरीही मी लिहितोय. त्याला कारणही तसंच आहे. फेसबुकवर या चित्रपटाला हिंदुंच्या भावनांचा अपमान करणारा चित्रपट असा रंग देण्यात आला. काही ठिकाणी हिंदु मुस्लिम असा वाद रंगताना दिसला. त्याहीपेक्षा काही तरुणांच्या अत्यंत बिभस्त प्रतिक्रिया मी पाहिल्या. अशा नको त्या गोष्टींसाठी इतरांच्या आया बहिणींवर अश्लील
चिखलफेक करणाऱ्या तरुणांनी हिंदू धर्माचा कैवार घेण्याची काहीच गरज नाही.
चिखलफेक करणाऱ्या तरुणांनी हिंदू धर्माचा कैवार घेण्याची काहीच गरज नाही.
खरंतर मला सिनेमांविषयी फारसं लिहिण्याची इच्छा नसते. कारण मी काही चित्रपट समीक्षक नाही. तरीही मी ' प्रकाश बाबा आमटे ' या चित्रपटाविषयी लिहिलं होतं. ' ' थ्री इडीटस ' चित्रपटाविषयी लिहिलं होतं. कारण जे जे माझ्या काळजाला भिडतं त्या विषयी मी आवर्जून लिहितो.
चित्रपट हि माझी आवड नाही. त्यामुळेच खास आवर्जून अथवा काही विशेष असल्याशिवाय मी कोणताही चित्रपट पहात नाही. फावल्या वेळात टिव्हीवर काही चित्रपट पहातो. पण त्यात आवडीपेक्षा मनोरंजन हाच भाग अधिक असतो.
पण पीके मात्र आवर्जून पाहिला. कारण तो प्रदर्शित झाल्यापासुन त्यात हिंदू देवतांचा आणि हिंदू धर्माचा अपमान केला गेला असल्याचं एक अतिरंजित चित्र रंगवलं जातंय. इतकंच काय शंकराचार्य आणि रामदेव बाबांसारखे महात्मे त्यावर मत व्यक्त करतात. भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी जेव्हा ' पीके ' चं समर्थन करतात, प्रत्येक व्यक्तीनं हा चित्रपट आवर्जून पहावा असं मत मांडतात आणि ABP माझानं त्यांच्या या विधानाच्या केलेल्या बातमीला फेसबुकवर एका तरुणाची ' अरे , यानं कापून घेतलाय कि काय ? ' अशा स्वरुपाची प्रतिक्रिया मिळते तेव्हा माझी तो चित्रपट पहाण्याची जिज्ञासा अधिकच तीव्र होते आणि मी तो चित्रपट पहातो.
आणि चित्रपट पाहिल्यानंतर मलाही वाटतं ' काय सांगावं इतरांना ? पी के पहा म्हणुन सांगावं कि पाहू नका म्हणुन सांगावं ? '
कोणी काही म्हणो, ' प्रकाश बाबा आमटे ' हा प्रत्येकानं आवर्जुन पहावा असा चित्रपट होता. म्हणुन मी त्याविषयी लिहिलं होतं. पण पीके पहावाच असं त्यात फारसं काही नाही. ' थ्री इडीटस ' हा पीके श्रेष्ठ चित्रपट आहे. या पीकेवर बहिष्कार टाकावा असं त्यात नक्कीच काही नाही.
पीकेत हिंदू देवतांचा आणि हिंदू धर्माचा अपमान केला गेलाय हे धादांत खोटं आहे. कारण -
१ ) त्यात हिंदु, शीख, ख्रिश्चन, मुस्लिम अशा सर्वच धर्मस्थळांचा उल्लेख आहे. हिंदू धर्मात अनेक देवता असल्यामुळे चित्रीकरणात विविधता आली आणि त्यामुळेच थोडा भेदभाव जाणवतो. पण तो जाणीवपूर्वक नाही.
२ ) चित्रपटाच्या शेवटी ' आम्हाला निर्माण करणारा परमेश्वर एका असेल तर त्याची वेगवेगळी रूपे कशाला ? ' हे त्यातलं विधान.
न पटण्यासारख्या चित्रपटात अनेक गोष्टी आहेत. त्यामुळेच ' थ्री इडीटस ' च्या तुलनेत पीके सुमार वाटतो. उदाहरणार्थ -
१ ) परग्रहवासी अमीर पृथ्वीवर कसा राहिला.?
२ ) दुसऱ्या ग्रहावर पोहचण्या इतपत प्रगत असणारे परग्रहवासी आदिमानवा प्रमाणे नग्न कसे ?
३ ) परग्रहवासियांना केवळ दुसऱ्यांना स्पर्श करून त्यांची भाषा जाणुन घेता येईल का ?
४ ) अशी भाषा जाणून घेण्यासाठी स्त्रीलाच स्पर्श करून घेणे गरजेचे कसे ठरते ?
५ ) इतरांचा भुतकाळ जाणून घेण्याची क्षमता असणाऱ्या परग्रहवासी अमीरला स्वतःच्या रिमोटचा शोध घेण्यासाठी परमेश्वराला साकडे घालण्याची गरज का पडावी ?
६ ) अथवा रिमोट चोरणाऱ्या इसमाचा शोध संजय दत्त घेतो मग अमीर खानला का घेत येत नाही ?
परंतु असे काही चटपटीत मत व्यक्त केले कि त्याची चर्चा होते त्यामुळे असेल अथवा हिंदुत्ववाद म्हणजे राष्ट्रवाद असल्या खुळचट कल्पनेपोटी असेल. काही मंडळी असलीच प्रक्षोभक मते व्यक्त करत रहाणार. कारण असली असलीच प्रक्षोभक मते व्यक्त करून ते स्वतःला हिंदू धर्माचे कैवारी ठरवू पहातात. पण हिंदू धर्म टिकून आहे तो शंकराचार्य अथवा रामदेव बाबांसारख्या विभूतींमुळे नव्हे तर हिंदू धर्म टिकून आहे तो सर्वासामान्य माणसांमुळे.
मीच नव्हे तर माझ्यासारख्या करोडो जीवांची ईश्वराच्या अस्तित्वावर नितांत श्रद्धा आहे. हिंदू असोत अथवा मुस्लिम, शीख असोत वा ख्रिचन हे जीव ईश्वराचं अस्तित्व मानतात. कुणी कितीही सांगितलं तरी त्यांच्या श्रद्धेला तडा जाणार नाही. आणि ज्यांचा आपल्या श्रद्धेवर विश्वास आहे त्यांनी पीकेविषयी अधिक चर्चा करण्याची गरज नाही. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे पीकेतली हिंदू देवतांची विटंबना दिसणाऱ्या हिंदुंना गणेश विसर्जनावेळी होणारी श्री गजाननाच्या मुर्तीची विटंबना दिसत नाही का ?
.
Vijayji I liked it.superbconversion! And very dramatic fantacy!!
ReplyDeleteप्रमोदजी तुमच्या G + वर आणि माझ्या ब्लॉगखाली आपण माझ्या लिखाणावर नोदवीत असलेले अभिप्राय मला नेहमीच प्रोस्ताहन देतात. आभार.
DeleteVery nice!
ReplyDeleteThanks Sir.
Deleteचिञपट हा ठराविक जातीधर्मावर आधारीत नसतो.निख्खळ मनोरंजन किंवा थोडेफार समाजप्रबोधन हा त्याचा विषय असतो.बघनार्याने ठरवायचे असते.त्यातुन काय घ्यावे काय नाही.
ReplyDeleteबाबाजी अभिप्रायाबद्दल आभार. या प्रसिद्धी लोलुप मंडळींना जनतेने दूर ठेवले पाहिजे.
ReplyDeleteSir लाेकमान्य सिनेमा पहा .. मस्त आहे .......... प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी पाहावी अशी फिल्म आहे
ReplyDeleteसुजीतजी,फेसबुकवरही मला तुमचा निरोप मिळालाय. ट्रेलर पहिला आहे. लवकरच पूर्ण सिनेमा पाहीन आणि त्यावर माझे मत व्यक्त करेन.
Deletebetter not to discuss.we are tolerant & understanding.same is not true for all
ReplyDeleteHemant ji thanks for visit to my blog. I hope you will be regular.I am not writing on such subject regularly.But the responsible people colouring this subject with very harmful colour. .
Delete