Tuesday 10 February 2015

Delhi Election : आम आदमी पार्टीचा विजय

मी केवळ दोन तासापूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचं भाकीत केलं होतं. परंतु भाजपा विजयाच्या जवळपासही पोहचू शकली नाही. लोकसभेला भाजपाच्या विरोधात जे अपयश कॉंग्रेसच्या वाटयाला आलं  तेच
अपयश आज आपने भाजपाच्या पदरात घातलं. भाजपाच्या काय चुका झाल्या याविषयी मी नंतर लिहीन. मग वाचक विचारतील," भाजपाच्या चुका दिसत असताना तुम्ही दोन तासापूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचं भाकीत कसं काय केलं ? " कारण साधं आहे. मला नरेंद्र मोदींविषयी आदर आहे. त्यांच्या कर्तुत्वावर माझा विश्वास आहे. त्यामुळेच ते या देशाला यशाच्या शिखरावर नेतील अशी श्रद्धा आहे. भारत पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यात कोण जिंकेल असा प्रश्न कोणाही भारतीयाला विचारलं तर जितक्या सहजपणे कोणीही, " भारत जिंकेल. " असं सांगेल तितक्याच सहजपणे मी भाजपाच्या विजयाच्या दावा केला होता. असो.

पण हा मोदींचा पराभव नाही. हा मोदींच्या कार्यशैलीचा पराभव नाही. कॉंग्रेसची सगळी मते आपच्या वाट्याला गेली.  हे आपच्या यशाच्या प्रमुख कारण आहे. 

परंतु लोकसभेतल्या आपच्या पराभवाची मीमांसा करताना केजरीवालांनी , " भाजपान बोगस मतदान केलं. वोटिंग मशिनमध्ये बदल केले " असं विधान केलं होतं. ती भाजपा आज तसं का नाही करू शकली याचं उत्तर केजरीवालांनी द्यावं. आपच्या यशामुळे मला आनद झाला नसला तरी दुः ख नक्कीच झालेलं नाही. कारण उदया भाजपाला एक समर्थ पर्याय म्हणुन देशभर उभा राहिला तरी मला आनंदच वाटेल. कारण सक्षम विरोधी पक्ष हि लोकशाहीची गरज आहे. आणि काँग्रेस दिवसेंदिवस दुबळी होत चालली आहे.    


आता पुर्ण बहुमतातलं सरकार असताना केजरीवालांनी केंद्राच्या नावाने खडे फोडू नयेत एवढीच अपेक्षा. कारण गुजरातमध्ये १५ वर्ष मुख्यमंत्री असताना आणि केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना मोदींनी कधीही केंद्र सरकारच्या विरोधात गरळ ओकल्याचे मला स्मरत नाही.        

2 comments:

  1. Yess......I was waiting for your post! :-) It is so nice that you have so honestly accepted your wrong conclusion!

    Keep it up.

    ReplyDelete
  2. अभिप्रायाबद्दल आभार. आण्णांच्या आंदोलनात उडी घेतलेल्या केजरीवालांविषयी मला नितातंत आदर होता. माझं कन्क्लूजन मोदींविषयीच्या आदरातून आलेलं होतं. पण आम आदमी पक्षाला एवढ घवघवीत यश मिळेल याची खात्री खुद्द केजरीवालही देऊ शकले नसते. मोफत पाणी देऊ. वीज दर कमी करू. महागाईला आळा घालु लोकप्रिय स्वप्ने दाखवूनच केजरीवालांनी यश मिळवलंय. त्यामुळे ते काय करतात हे पहाणं खुप औस्तुक्याचा विषय आहे. काय घडेल हे येणारा काळच सांगेल. मागील महिनाभर मी खूप धावपळीत होतो. अजुनही आठवडाभर खूप धावपळीत असणार आहे. पण केजरीवालांच्या मुखवट्याविषयी लवकरच लिहिण.

    ReplyDelete