Thursday, 19 February 2015

Love Poem, Prem Kawita : तूच माझी रोज पूजा

मागे मी -
हा लेख लिहिला होता. तो खरंच तिला परमेश्वर मनात असतो. पण तिला जाणीवही नसते त्याची. तो जेव्हा जेव्हा तिला म्हणतो, " अगं, मी तुला माझा परमेश्वर मानतो."
आणि ती त्याची खिल्ली उडवत म्हणते,
" अस्सं !  मग एक काम कर ना ? "
" सांग ना तू सांगशील ते करीन. " तो विटेवर उभ्या असलेल्या विठ्लासारखा तो अधीर.
" एक काम कर, माझं देऊळ बांध आणि तिथं बसून माझी पूजा करत जा रोज." ती त्याला अगदी खुळ्यातच काढते.
" छे ! छे ! मला काय करायचं तुझं देऊळ बांधून. ते तर केव्हाच बांधलंय मी इथं माझ्या ह्रदयाच्या कोपरयात."
तिला जाणीवही नसते अशा प्रेमाची........तिच्या बोलण्यातला उपरोध त्याच्या लक्षात येतो. कसं सांगावं हिला ?  कसं पटवून द्यावं ?
love poem, प्रेम कविता, मराठी कविता, कविता
अलीकडे खरंच प्रेम म्हणजे आकर्षण एवढीच भावना असते. प्रेम, श्रद्धा, आपुलकी, जिव्हाळा अशा गोष्टींना फार जागा नसते

अलीकडे प्रेमात. प्रेमात ती त्याला सुंदर हवी असते. आणि तो तिला कमावता. सिनेमे, हॉटेलिंग, शॉपिंग असे तिचे शौक पुरवणारा...........तिला तिच्या वाढदिवसाला किमती भेट देणारा.

प्रेमाकडे पहाण्याची तिची भूमिका एवढी उथळ. मग तो त्याच्या भावना शब्दात ओवण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रयत्नांची हि कविता -
पण शेवटी कळतेच तिला त्याची भूमिका. त्याचं प्रेमही कळतं आणि मग ती सारे पाश तोडून त्याच्याकडे धाव घेते............कधी राधा होते ..........कधी मीरा होते.

2 comments: