Saturday 21 February 2015

Marathi Blog Directory : विजेटकोड जोडण्याचे फायदे

मी सहा महिन्यापुर्वीच माझ्या ब्लॉगचा विजेटकोड तयार केला होता. ब्लॉगर मित्रांना तो त्यांच्या ब्लॉगवर जोडण्याचं आव्हानही केलं होतं. पण एक दोन अपवाद वगळता माझा विजेटकोड
आपल्या ब्लॉगवर जोडण्यात कोणीच रस दाखवला नाही. त्याला अनेक कारणं असतील पण
माझ्या ब्लॉगचा विजेटकोड तुमच्या ब्लॉगवर जोडल्यानंतर माझ्या ब्लॉगचं प्रातिनिधिक चित्र खुप मोठं दिसायचं.

पण आता मी माझा विजेटकोड नव्यानं बनवलाय. त्यामुळे आता माझ्या ब्लॉगचं चित्रही इतर ब्लॉगच्या चित्रांच्या आकार एवढंच दिसेल. त्यामुळेच आता ब्लॉगर मित्र माझा विजेटकोड त्यांच्या ब्लॉगवर चिटकवतील असा विश्वास वाटतो.

असा आहे माझ्या ब्लॉगचा नवा विजेटकोड - 


<a href="http://maymrathi.blogsopt.com/" target="_blank"><img title=" रिमझिम पाऊस " src="http://bit.ly/1vQUIsf " width=125” height=125” />

आपण माझ्या ब्लॉगचा विजेटकोड आपल्या ब्लॉगवर चिटकवलाट कि मला मेल करा. अथवा माझ्या कोणत्याही पोस्टच्या खाली प्रतिक्रिया देऊन आपण माझा विजेटकोड आपल्या ब्लॉगला जोडला असल्याचे कळवा. मेलमध्ये अथवा प्रतिक्रियेत आपल्या ब्लॉगची लिंक नक्की पाठवा. ( उदा. माझ्या ब्लॉगची लिंक http://maymrathi.blogspot.com/ ) आपण माझा विजेटकोड आपल्या ब्लॉगवर चिटकवल्याची शहानिशा करून काही क्षणात आपला ब्लॉग रिमझिम पाऊसला जोडण्यात येईल.

इतरांचा विजेटकोड आपल्या ब्लॉगवर जोडण्याचे फायदे -

इतरांचा विजेटकोड आपल्या ब्लॉगवर जोडला तर त्यांच्या ब्लॉगची जाहिरात होते. या भावनेतुन बऱ्याचदा        आपण इतरांचा विजेटकोड आपल्या ब्लॉगवर जोडण्याचे टाळतो. पण आपल्या ब्लोगलाही त्याचा मोठा फायदा होतो हे आपल्या लक्षात येत नाही. मी जेव्हा नव्यानं ब्लॉग लिहायला सुरवात केली तेव्हा माझ्या ब्लॉग मराठी ब्लॉग विश्व या ब्लॉग डिरेक्टरीत समाविष्ट केला. त्यासाठी त्यांचे प्रातिनिधिक चिन्ह माझ्या ब्लॉगवर जोडले. आणि सुरवातीच्या काळात माझ्या ब्लॉगला मराठी ब्लॉग विश्व कडून मोठ्या प्रमाणात वाचक मिळाले.

अशा रितीने इतरांचा विजेटकोड आपल्या ब्लॉगवर जोडण्याचे दोन प्रमुख फायदे सांगता येतील -

१ ) त्या ब्लॉगला भेट देणारे वाचक आपल्या ब्लॉगला भेट देण्याची शक्यता निर्माण होते.
२) आपल्या नव्या पोस्टची लिंक त्या ब्लॉगवर दिसत असल्यामुळे सर्च इंजिनला आपला ब्लॉग लवकर शोधण्यास मदत होते.

कोणत्या डिरेक्टरीचा अथवा ब्लॉगचा विजेटकोड आपल्या ब्लॉगवर जोडावा ?

१) सर्च इंजिनला ज्या ब्लॉग डिरेक्टरी प्राधान्यानं सापडतात त्यातल्या पहिल्या पाच ते सहा ब्लॉग डिरेक्टरीचा विजेटकोड आपल्या ब्लोगवर नक्की लावावा.
२ ) ज्या ब्लॉगला वर्षभराच्या अवधीत पन्नासहजारांहून अधिक हितस मिळालेल्या असतील अशा ब्लोगचा विजेटकोड आपल्या ब्लॉगवर जोडावा.

आपल्या डिरेक्टरीची अथवा ब्लॉगची जाहीरात व्हावी अशी विजेटकोड जोडण्याची अट  घालणाऱ्या व्यक्तीची इच्छा असते हे खरे असले तरी. त्यामळे आपले नुकसान होण्याची कोणतीही शक्यता नसते झालाच तर फायदाच होतो. 

2 comments: