Tuesday 10 February 2015

Dehli Election : दिल्ली विधानसभा निवडणुका २०१४ काय होईल ?


निवडणुका हा तसा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय नाही. निवडणुका जाहीर होतात. प्रचार रंगतो. राजकीय पक्ष परस्परांवर चिखलफेक करतात. मतदान पार पडतं. आणि काँग्रेसचं सरकार सत्तेवर येतं. हा काही अपवाद वगळता वर्षानुवर्षाचा रिवाज. पण २०१२ साली अस्तित्वात आलेल्या, कोणताही आगा पिछा नसलेल्या
आम आदमी पक्षाने २०१४ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेससारख्या जुन्या जाणत्या पक्षाला दोबी पछाड देत २८ जागा जिंकल्या आणि निवडणुका हा जनतेच्या दृष्टीकोनातून सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय झाला. 


२०१४ च्या लोकसभा निवडणुका तर पारावरच्या चर्चा ठरली. कुठेही जा एकच विषय निवडणुका आणि मोदी. मोदींची जेवढी चर्चा झाली तेवढंच घवघवीत यश त्यांना मिळालं. त्यानंतर झालेल्या अनेक राज्यांच्या निवडणुका चर्चेत राहिल्या. चर्चेचा विषय एकच. काय होईल ? भाजपा कि काँग्रेस सत्तेत येईल ? 



पण दिल्लीच्या विधानसभा निवडणुका याला अपवाद ठरल्या. म्हणजे चर्चा झाली नाही असे नाही. इतर राज्यांच्या निवडणुकांप्रमाणे २०१५ च्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचीही खूप चर्चा झाली. पण चर्चा भाजपा कि काँग्रेस अशी न होता भाजपा कि आम आदमी अशी रंगली. किरण कि केजरीवाल ? अशी चर्चा झाली. कफ ( अरविंद केजरीवाल ) कि टफ ( किरण बेदी ) अशी चर्चा झाली. 


मतदानापुर्वी भाजपाला झुकतं माप देणाऱ्या बहुतेक सर्वांनी मतदानानंतर आपच्या यशाची खात्री दिली आहे. चाणक्य केवळ अपवाद. पण कोणी काही म्हणो. भाजपा बहुमत मिळवेल असा मला विश्वास वाटतोय. का ते निकालानंतर स्पष्ट करेन.          

2 comments:

  1. Ya lekhatTumcha bjp prem distay.

    ReplyDelete
    Replies
    1. दिनेशजी,अभिप्रायाबद्दल आभार. होय मी बीजेपी धार्जिणा आहेच.पण वेळ आल्यास बीजेपीवर टीका करायलाहि मागे पुढे पहाणार नाही. कारण बीजेपी पेक्षा माझ्या देशावर मी अधिक प्रेम करतो. नुकत्याच सत्तेत आलेल्या मोदींना आणि बीजेपीला आपण वेळ द्यायला हवा एवढाच माझं म्हणणं. आपने दिल्लीत बहुमत मिळवले पण पाणी मोफत देऊ,वीज बील निम्म्याने कमी करू असल्या लोकप्रिय घोषणा करूनच. आता त्यांनाही पाच वर्षाचा अवधी आहे, बहुमतातली सत्ता आहे. पाहू या काय होतंय ते.

      Delete