जवळ जवळ ३१ वर्ष आहिल्याबाई होळकर ऊन सोसत होत्या, पावसात भिजत होत्या, थंडीत काकडत होत्या. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वतःला धनगर समाजाचे तारणहार मानणारे अनेक नेते आणि समाजसेवक आहेत. ३१ वर्षाच्या काळात परिसरात धनगर समाजाचे अनेक नगरसेवक झाले. पण आहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याची शोकांतिका कुणालाच दिसत नव्हती अथवा दिसत असली तरी सारे असह्य असल्याप्रमाणे निमूट होते.
चार - सहा महिन्यापूर्वी आहिल्याबाई होळकरांची पुण्यतिथी होती. त्या कार्यक्रमाला आशाताईंना निमंत्रित करण्यात आलं. आहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याची दुरवस्था आशाताईंच्या नजरेस आणुन देण्यात आली. ज्या आहिल्याबाई होळकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत समाजावर आणि समस्त जनतेवर कृपाक्षेत्र धरले त्या आहिल्याबाई गेली ३१ वर्ष ऊन, वारा, पाऊस सोसताहेत हि बाब शरमेची होती. आशाताईंनी विडा उचलला. पण काम जिकरीचे होते. कारण आशाताई विरोधी पक्षाच्या नगरसेविका होत्या. आणि सत्ताधारी पक्षाच्या घशात हात घालुन आहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्यावर छत्र उभारण्यासाठी निधी मिळवणे अवघड होते.
पण समाजाने, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी, आयुक्तांसह तमाम अधिकाऱ्यांनी आशाताईंच्या प्रयत्नास पाठबळ दिल्यामुळे अशक्य ते शक्य झाले. आणि ३१ वर्ष ऊन, वारा, पाऊस सोसणाऱ्या आहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्यावर मेघडंबरी उभारली गेली. काल म्हणजे ३१ मी रोजी मेघडंबरी अनावरणाचा मोठा सोहळा पार पडला. आहिल्याबाई होळकरांच्या पुण्यतिथीच्या ज्या कार्यक्रमाला समाजाचे केवळ पाच पन्नास कार्यकर्ते उपस्थित असायचे त्याच कार्यक्रमाला काल हजार बाराशे समाज बांधव उपस्थित होते. छायाचित्रे काढण्यासाठी समाज बांधवांची झुंबड उडाली होती. आशाताईंच्या शब्दाला मान देऊन, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांच्या प्रेमापोटी आणि आपण समाजाचे काही देणे लागतो या भुमिकेतुन सांगली कोल्हापुरातून गजी नृत्याचे दोन पथक आले होते. ते बेभान होऊन नृत्य सादर करत होते.
समाजाचे आमदार रामहरी रूपनवर कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांच्या भाषणाने कार्यक्रमात रंगत आणली. महापौर शकुंतला धराडे, तळोदे संस्थानाचे जहागीरदार आहिल्याबाई होळकरांचे वंशज श्रीमंत अमरजित राजे बारगळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री. जाधवसाहेब, ज्ञानराज विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक, कार्याध्यक्ष असलेले आमचे बंधु श्री. शेंडगे सर आणि समाजातील अनेक मातब्बर मंडळी कार्यक्रमास उपस्थित होती.
सकाळी सहा वाजल्यापासून सुरु झालेली लगबग दुपारी दोन वाजता थांबली. पण जाताना भर दुपारच्या उन्हातही पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांच्या चेहऱ्यावरचे स्मित समाजबांधवांना दिसत होते. आणि समाजबांधवांचे चेहरे आनंदाने उजळुन निघाले होते.
Smajasathi kam krnarya ashatai aahilyabainchya wars aahet .
ReplyDeleteभानुदासजी, आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. पण आपण सामान्य माणसे त्या महामातेशी आपली तुलना होऊच शकत नाही.
Deleteसलाम आशाताई च्या कार्यास
ReplyDeleteआणि आपल्या निरिक्षणास
रमेशजी, आपल्याप्रतिक्रियेबद्दल आभार.
Delete