सौंदर्याच वेड कुणाला नाही.
प्रियकराला त्याची प्रेयसी सुंदर असावी असं वाटतं.........नवऱ्याला त्याची बायको देखणी असावी असं वाटतं..........अगदी
मुलांना सुद्धा त्यांची आई दिसायला छानच हवी असते.छत्रपती शिवाजी महाराजांसारखा धुरंधर.......हरहुन्नरी..........लढवय्या..........द्रष्टा.........राजासुद्धा एके क्षणी -
" अशीच अमुची माता असती सुंदर रूपमती
आम्हीही झालो असतो सुंदर ......................"
असं म्हणतो.
पण हे असं सौंदर्याच वेड आमच्यासारख्या मानव प्राण्याला अधिक. पशूंच्या आणि पक्ष्यांच्या राज्यात नर हा मादीपेक्षा अधिक देखणा असतो. मोर आणि लांडोर हे त्याचं एक सहज सुंदर उदाहरण.
लांडोरीपेक्षा मोर कितीतरी देखणा. मोरपंखी पिसारा असलेला........डोक्यावर झकास तुरा लाभलेला......पिसारा फुलवून थुई थुई नाचता येणारा........अंगभर वेगवेगळ्या रंगांचा सडा असलेला. रगांची एवढी उधळण परमेश्वरानं अन्य कुठल्या प्राण्यावर केल्याचा मला माहित नाही.
असं असलं तरी मोराला लांडोरीची सोबत मिळवण्यासाठी किती यातायात करावी लागते माहिती आहे तुम्हाला. त्या साऱ्या यातायातीला ' मोरनाची ' म्हणतात. या विषयी मी खूप वर्षापूर्वी मारुती चित्तमपल्ली याच्या एका पुस्तकात वाचलं होतं. त्या विषयी मी नंतर कधीतरी लिहीन. आत्ता माझ्या या चारोळी विषयी.
तर असं हा मोर एवढा देखणा असूनही त्याला लांडोरीसामोरून कुर्यात किंवा तोऱ्यात निघून जाता येत नाही. आणि असं कुणी मोर तिच्यासामोरून ऐटीत पुढे चालला असेल तर लांडोर त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. हे असं जेव्हा मी पाहतो तेव्हा मला प्रश्न पडतो ' असं का ?' आपण जसे रूपावरती भाळतो............देखणेपणाचा पाठपुरावा करतो........तशी लांडोर का नाही मोराच्या मागेमागे फिरत ? मला आणखी एक प्रश्न पडतो कि सजीवांना ओढ नेमकी कशाची सौंदर्याची कि भन्न लिंगाची ? हे सारे प्रश्न या चारोळीत -

No comments:
Post a Comment