Friday, 2 October 2015

गाई , गाई आणि शांताबाई

मराठी गाणी, Marathi Songs 


खरंतर या विषयावर लिहिण्यापेक्षा इतर अनेक विषय लिहिणे गरजेचे आहेत. पण जिथं जाईल तिथं माझ्या कानावर शांताबाई येऊ लागलं. अगदी माझ्या घरातुनसुद्धा. म्हणुन मग सारे विषय बाजूला ठेऊन हा विषय ऐरणीवर घेतला.

झालं काय !
शनिवारी मी मामांकडे मुक्कामी गेलो. तिथुन सकाळी सकाळी निघलो. आठ वाजता शेतावर पोहचलो. दिवसभर कामात होतो. पाच सहा वाजता कामातुन मोकळा झालो. वस्तीवरच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली होती. तिच्यात सामील झालो. रविवार मावळला.

सोमवारी निम्मा दिवस कामात गेला. गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती ती मिळेल या अपेक्षेने तीन वाजताच गावात गेलो. तर गॅरेज बंद. विशाल शिंदेच कृषी केंद्र अथवा नवनाथ शिंदेच हार्डवेअरच दुकान हा माझा बसण्याचा ठेपा. पण दोन्ही दुकानं बंद. शेवटी परभू शिंद्याच्या हॉटेलात बसलो. हे हॉटेल म्हणजे गावातला पार. सगळे चुकले माकले इथे भेटणार. तीन चार जणांचा एक घोळका हॉटेलात आला. हात वर करून म्हणाला , ' शांताबाई '. हॉटेलातल्या चार सहा जणांनी ' शांताबाई ' म्हणत प्रतिसाद दिला. ' जयमहाराष्ट्र ' , ' जयभीम ' अथवा ' जयहरी ' म्हणत परस्परांना प्रतिसाद देण्याचा प्रकार माझ्या परिचयाचा आहे. पण ' शांताबाई ' हा काय नविन प्रकार आहे मला काही कळेना.

माझे एक मित्र तिथेच बसले होते. त्यांना बोलावलं आणि विचारलं, " शांताबाई , हा काय प्रकार आहे ? " तेव्हा त्यांनी सांगितलं , " हे नविन गाणं आलंय. काल मिरवणुकीत वाजत होतं. त्यामुळे सगळ्यांच शांताबाई चालू झालं आहे. "

गावाकडची कामं उरकून गुरवारी घरी आलो. तर आमचे धाकटे चिरंजीव आणि आमच्या सौभाग्यवती दोघांनी मिळून माझ्या एका एका कानाचा ताबा घेतला आणि शांताबाईचे किस्से सांगायला सुरवात केली. चिरंजीवांनी तर लगेच त्या गाण्याचा ऑन लाईन ऑडीओ सुद्धा आमच्या कानापर्यंत पोहचवला. भ्रमनिरास ..... फक्त भ्रमनिरास. एका दिवसात त्या गाण्याला दोन लाखहून हिट्स मिळाल्या होत्या. पाच पन्नास हजार लाईक होत्या पण समाधानाची बाब एवढीच हि दोनशे का असेनात पण डिसलाईकही होत्या. मी यु टुबवर मुद्दाम चेक केले तर लतादीदींच्या ' येरे घना ' ला केवळ दोन हजार हिट्स, तर संदीप खरेच्या ' दमलेल्या बाबाला सुद्धा दिड लाख हिट्स. यामुळे लतादीदींची आणि संदीपची उंची कमी होत नाही. पण या असल्या हिट्समुळे संजय लोंढेची उंची वाढत देखील नाही. पण समाजाच्या अभिरुचीचा विचार केला तर ती खालावली आहे असे नक्कीच म्हणावे लागेल.

घरी आल्याआल्या मोबाईलच नेट चालू झालं. तर टिंग ...टिंग करत वॉट्सअपचे मेसेज आले. वॉट्सअप ओपन केलं तर तिथही ' शांताबाई '. संध्याकाळी फेसबुक ओपन केलं तर तिथंही तेच. काही वेळातच शांताबाईचं मेल व्हर्जिन ' शांताराम ' सुद्धा पोहचलं. ABP माझावर सुद्धा ' शांताबाई ' आमच्या काही वैचारिक दृष्ट्या सोन्यासारख्या शुद्ध असलेल्या मित्रांच्या टाईम लाईनवर सुद्धा ' शांताबाई'. आमचे मित्र मोहन दाने. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये त्या गीतकाराच्या जिवनाची दुरवस्था मांडली होती. त्यावर मी ' इतकं सुमार दर्जाचं गाणं मी आजवर पाहिलं नाही ' अशी प्रतिक्रिया दिली. तर मोहन दानेंनी त्या गाण्याचे लिरिक्स पाठवत यात अश्लिल काय आहे अशी विचारणा केली.

खरंच इतकं सुमार दर्जाचं गाणं मी आजवर ऐकलं नाही. ' मिठू मिठू पोपट, कोंबडी पळाली, पोरी तुझा झगा ' हि गाणी सुद्धा बरी. पण हे काय - शांताबाय

तेरा ये जलवा
माहीमच हलवा
जिवाचाकालवा
मनाला भुलवा
मामाला बोलवा
कालवा - हलवा ,  कालवा - हलवा , कालवा - हलवा ,
शांताबाई  ………

यात कोणतं काव्य आहे. 

 ABP ला दिलेल्या मुलाखतीत या गाण्याचे गीतकार आणि गायक संजय शिंदे म्हणतात कि . " २० वर्षापुर्वी हे गाणं माझ्या छोट्या मुलीला रिझविण्यासाठी लिहिलं होतं." अर्थात यातला रिझवणे ह शब्द आमच्या प्रगल्भ पत्रकाराचाच असणार.

जाऊ दया. तो शब्द कोणाचा का ही असेना. प्रश्न आहे ते एवढाच कि या पुढे आमच्या तहानुल्यांना जोजावताना आम्ही , " गाई , गाई म्हणण्याऐवजी शांताबाई शांताबाई म्हणणार आहोत का ? "

माझी संजय लोंढेच्या संदर्भात काहीच तक्रार नाही. त्यानं काय लिहावं आणि काय गावं हा त्याचा प्रश्न आहे.  परंतु आमची आवड किती बदलली आहे हे आम्ही आमच्या काळजात डोकावुन पहायला हवं.

यापुढे याच ढाच्याची अनेक गाणी येतील. पण जातीवंत कवी कधीच त्या वाटेला जाणार नाहीत. हे मात्र नक्की.                                   

13 comments:

  1. याचं मेल वर्जन आहे त्यात बेवड्यांचं वर्णन विडंबनात्मक मांडलय! पण दर्जा सुमारच आहे. शांताबाई आणि शांताराम यामधे मुख्य फरक म्हणजे शांताबाई ग्लोरीफाय केलीय आणि शांताराम condemned. अति त्रोटक आयुष्य असणार्या रचना असतात! काही दिवसातच विरून जातात.

    ReplyDelete
  2. प्रमोद सर अभिप्रायाबद्दल आभार. आज बऱ्याच दिवसानंतर आपली प्रतिक्रिया मिळाली. आपण ग्लोरिफाय आणि condemned सारखे अत्यंत तर्कशुद्ध शब्द वापरले आहेत. पण कौतुक करावे असे त्या गाण्यात काहीच नाही. आपण शांताबाईला ग्लोरिफाय केल्याचे जे मत मांडले आहे तेही पटण्यासारखे नाही. स्त्रीला ग्लोरिफाय केल्याचे उत्तन उदाहरण द्याचे झाले तर ' हिची चाल तुरु तुरु .....' या गाण्याचे देता येईल.

    ReplyDelete
  3. आइझवाड्या पुचच्चीच्या

    ReplyDelete
  4. मधुर मोटे3 October 2015 at 11:22

    अप्रतिम

    ReplyDelete
  5. सविता देशपांडे3 October 2015 at 11:28

    या लेखावर सुद्धा काही मंडळी जातीयवादाचा शिक्का मारतील

    ReplyDelete
    Replies
    1. सविताजी आपल्या नावात देशपांडे असल्यामुळे तर आपल्या प्रतिक्रियेला सुद्धा जातीयवादी संबोधण्यात येईल.

      Delete
  6. Vijayji, Khare tar tumchya matashi mi sahmat aahe. Ganyacha kharach kahich artha lagat nahi ho. Pan aajkalche kaansen suddha hya prakarala tevdhech jababdar aahet. Mhanje baghana Anand Shindenchya double meaning gaane he tar kuthe kutumbiyansobat aslo aani kanavar durun jari aiku aale tar angacha tilpapad hoto. Mhanje evadhe awkward feel hote. Pan hyalasuddha prasiddhi denare ambatshoukinach jababdar. Sanjay Londhenshi mi phonvar bolloy suddha, tyanchi pratikriya ashi hoti ki tyani he gaane tyanchya Shantabai navachi ek atya hoti tichyavar lihile hote, aani tyat asshlil ase kahich shabda nahit. Nantar matra mandalinni tya ganyache DJ karun vikrutikaran kelay ase tyanche mhanane. Tyanchya ek bhau kuthlyashya gambhir aajarane shevatchya ghatka mojat hota hya ganyatun milalelya paishatun tyanche upchar zale khare pan to vachu shakla nahi ashi khantahi tyanni bolun dakhavali.

    Vijayji, ek sangitkar mhanun mala ase vatate ki pratyek ganyache ek Genre aste. Ani tyala definition naste. Sangitkarane kasahi gaan tayar kel aani tyala aiknara shrota varga tayar zala ki te gaane hit hote. Honey Singh, Anand Milind Shinde hehi tyachech ek udaharan. Shashtriya gaykishi kinchitahi parichay naslele hi mandali matra aaj bajarat tufan chaltat. Karan sangitala definition nahi. Kunala kaay avdel he kunich sangu shakat nahi... Dhanyavaad.

    ReplyDelete
    Replies
    1. मनोजजी, मी गाणे अश्लिल आहे असे कुठेही म्हणालो नाही. माझी संजय लोंढे यांच्या विषयीसुद्धा काही तक्रार नाही. माझी तक्रार आहे ती सामाजिक अभिरुची विषयी. अर्थात समजला काय रुचावे हे सुद्धा आपल्या हातात नाही. आनंद शिंदे , प्रल्हाद शिंदे , संजय लोंढे यासारख्या मागासवर्गीय समाजातून आलेल्या बहुतेक संगीतकारांनी समाजाच्या पदरात असेच दान टाकले आहे. त्य्ल जनाधार मिळतो म्हणुन माझ्या अथवा आपल्या सारख्या कलावंतांकडून अशी सुमार निर्मिती होणार नाही हे मात्र नक्की.

      मनोजजी , मी माझ्या प्रत्येक कवितेचे एकेक कडवे लिहिताना किती परिश्रम घेतो हे माझे मला ठाऊक.

      Delete
  7. आभार प्रकाशजी .

    ReplyDelete
  8. अगदी फडतूस गाणे आहे.. पब्लिकची स्मृती क्शणभंगुर असते एव्हढेच दु:खात सुख...

    ReplyDelete
    Replies
    1. पब्लिकची स्मृती क्शणभंगुर असते एव्हढेच दु:खात सुख......................अत्यंत चपखल भाष्य.

      Delete
    2. पब्लिकची स्मृती क्शणभंगुर असते एव्हढेच दु:खात सुख......................अत्यंत चपखल भाष्य.

      Delete