Thursday, 8 October 2015

प्रेम हे प्रेम असतं......कि ?

कमल हसन आणि श्रीदेवीचा ' सदमा ' हा सिनेमा सगळ्यांना आठवत असेल. स्मरणशक्ती हरवलेली श्रीदेवी. सर्वस्व झोकुन तिला प्रेम देणारा कमल हसन. आणि स्मरणशक्ती परतल्यानंतर कमल हसनला न ओळखणारी श्रीदेवी. परवा हा सिनेमा पाहिला आणि मला प्रश्न पडला प्रेम हे खरंच प्रेम असतं......कि
तडजोड ?
आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी प्रेमात पडलेला असतो. रुसण्या फुगण्याचे कितीतरी अनुभव आपल्या आयुष्यात आलेले असतात. तिची समजुत काढताना आपली कसोटी लागलेली असते. खुपदा असं होतं कि ती रागावते आणि आपण हवालदिल होतो. आणि मग आपण आपला सगळा अहंकार.....आपला सगळा स्वाभिमान बाजूला ठेवून तिचा शब्द झेलू पहातो. तिच्या चेहऱ्यावरचा रुसवा जावून तिथ हसू यावं म्हणुन वेडेपिसे होतो. आपल्यातल्या विदुषकाला जागे करतो. आणि ती ओठांच्या कोनातून हळूवार हसते. दोन्ही पंख पसरून आपल्या कुशीत शिरते. आपल्या खांद्यावर विसावते. आपण भरून पावतो.
कधी कधी आपण तिची वाट पहात उभे असतो. तिला उशीर होतो. आपला प्राण कंठाशी येतो. फार फार राग आलेला असतो आपल्याला तिचा. वाट पाहून कंटाळून गेलेलो असतोआपण. मन निराश झालेलं असत…....... तिची वाट पाहून थकलेलो असतो. जड पावलांनी परत निघालेलो असतो......…… आणि ती येते......तेच आपल्याला हवं असलेलं हसू ओठांच्या कोनात घेवून येते. आपली सारी निराशा....... आपला सारा राग मनातल्या मनात कुठल्या कुठे पळून जातो. तरीही आपण चेहरा मात्र कोऱ्या पाटीसारखा ठेवतो. ती मात्र फुललेल्या चेहऱ्यानं आणि बोलक्या डोळ्यानं विचारते, " रागावलास ? " आणि असं विचारतानाच अगदी निरागसपणे पंख पसरून आपल्या कुशीत शिरते.
तिचं हसू पाहून आपण असे नेहमीच विरघळून जातो.………. अळवावरचा थेंब होतो. तिच्या डोळ्यात हरवून जाताना फक्त फक्त तिचे होतो. आपण रागावलेलो होतो हेही विसरून जातो. तिचा फुलून आलेला चेहरा पहात रहातो. 
पण कधीं कधी मात्र सगळं काही बिनसलेलं असतं. तिचा रुसवा निघत नाही. आणि त्याचा स्वाभिमान त्याला माघार घेवू देत नाही. दोघांच्या वाट वेगळ्या व्हायची वेळ येते. पण त्याला जाणीव असते. नाही, तिच्या शिवाय आपलं आयुष्य फुलणार नाही. आणि मग तो म्हणतो -


5 comments:

 1. तुझ्या आइला माळी धनगर वंजारी लावला. आइझवाड्या

  ReplyDelete
 2. प्रेम माणसाला विशाल बनवतं... किंबहुना तोच प्रेमाचा सर्वोच्च अविष्कार आहे...अर्थात समजूत फक्त त्यानेच काढली पाहीजे असे नाही.... तिच्यासाठी तो बहर होत असेल तर तिनेही ऊनसावलीचा श्रावण होऊन त्याला फुलवायला हवं..... :-) (हे उगीच तुमच्या कवितेला जोड म्हणून लिहीलं...!)...- अश्विनी.

  ReplyDelete
  Replies
  1. तिनेही ऊनसावलीचा श्रावण होऊन त्याला फुलवायला हवं.....खूप सुंदर.

   Delete
 3. Replies
  1. ???? इथे स्मायली दिसत नाहीत.

   Delete