खरंतर खूप उशीर झालाय. दुपारच्या जेवणाच्या वेळी सकाळचा चहा पुढ्यात आणून ठेवावा तसं काहीसं करतोय मी . पण म्हणतात ना , " अंधेर से…. देर भली. " तसं उशिरका होईना पण मला शहानपण सुचलंय ना. ' अंधेर से देर भली 'असा वाकप्रचार हिंदीत हे कि नाही मला माहित नाही. पण
नसला तरी मी म्हणतोय ते बरोबर आहे. आहो नेहमीच अंधार असण्यापेक्षा उशिरा का होईना पण सूर्य उगवणं केव्हाही चांगलंच ना ! हो ! हो ! त्याच अर्थानं मला ' अंधेर से देर भली ' असं म्हणायचंय.
नसला तरी मी म्हणतोय ते बरोबर आहे. आहो नेहमीच अंधार असण्यापेक्षा उशिरा का होईना पण सूर्य उगवणं केव्हाही चांगलंच ना ! हो ! हो ! त्याच अर्थानं मला ' अंधेर से देर भली ' असं म्हणायचंय.
' देरसे आये ……. ' , ' सुबह हा भुला…… ' , ' teaches on time…… ' अशा किती तरी म्हणी मला माझ्या समर्थनासाठी या क्षणी आठवताहेत. पण दुर्दैव असं कि इथं चपखल बसेल अशी एकही मराठी म्हण मला आठवत नाही. तुम्हाला लक्षात आली तर नक्की सांगा.
असो. हे सगळं घडाभर तेल यासाठी कि आता सुर्य पार मावळतीकडे झुकू लागलाय आणि मी तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायला बसलोय. तुम्ही म्हणाल ' " काय हे ! काही अर्थ आहे का तुमच्या या वागण्याला. अहो सगळ्या जगाच्या शुभेच्छा पोहचल्या आम्हाला आणि तुमचे निघालेत वरती मागुन घोडे. "
हिच पोस्ट उद्या सकाळी केली असती तर मात्र पालथ्या घड्यावर पाणी झालं असत. अथवा कोपऱ्यात कुठंतरी ( * ) असा स्टार करून कंसात डोळ्याला दिसणार नाही इतक्या बारीक अक्षरात ' पुढल्या वर्षासाठी लागू ' असं काहीतरी लिहावं लागलं असत.
काही असो पण तुम्हाला विसरलो नाही हे तर खरं आहे ना ! आज सकाळपासून माझ्या मोबाईलचं टुंग टुंग चाललेलं. अहो सकाळी नऊच्या आत चारशे मेसेजेस. गाडया धुवायच्या, हार करायचे, घट हलवायचे, तळी उचलायची एक ना अनेक हजार कामं. मेसेजेस बघायलाही वेळ नाही. बारा साडेबारा वाजता थोडशी उसंत मिळाली. whatsaap पाहिलं तर सगळीकडे दसऱ्याच्या शुभेच्छा. इकडून कॉपी केलेल्या आणि तिकडे पेस्ट केलेल्या. या सगळ्यात विविधता किती तर इनमिन चारपाच प्रकारची.
whatsaap बंद करून थोडासा श्वास घेतोय न घेतोय तोच एकाचा फोन , " काय रे ! मेसेज मिळाला ना माझा . शुभेच्छा पोहचल्या ना ? "
" हो !" त्याला काय म्हणायचं ते माझ्या लक्षात आलं होतं. पण मला बोलायला जागा नव्हती. म्हणुन मी अपराध्यासारखं एकेरी उत्तर दिलं.
तसं उंदराच्या बिळासमोर दबा धरून बसलेल्या मांजराच्या आवेशात तो म्हणाला , " मग उत्तर द्याच कळत नाही तुला ? कि तशी पद्धत नाही तुमच्यात ? कि हिंदूच नाहीस तु ? "
काय बोलावं मला कळत नव्हतं. फार अवघडल्यासारखी स्थिती झाली होती माझी. कशीबशी त्याची समजुत काढली. तोंडी शुभेच्छा दिल्या. आणि फोन ठेवला.
एक मित्र संचेतीला अॅडमिट. त्याला डिसचार्ज मिळाला असेल आणि सणासुदीला तो आपल्या बायकापोरात असेल असं समजुन त्याला शुभेच्छा देण्यासाठी फोन केला तर फोन त्याच्या बायकोनं उचलला. तो अद्यापही अॅडमिट असल्याचं सांगितलं. त्याला भेटायला जायचं ठरवून पोटात चार घास ढकलले. आणि भर दुपारच्या उन्हात संचेतीला पोहचलो. त्याला भेटून परतलो आणि पोस्ट लिहायला बसलो.
खरंतर मलाच कशाला आपल्यापैकी कुणालाच कुणाचं वाईट व्हावं असं वाटत नाही. प्रत्येकच्या मनात सगळ्यांचं चांगलंच व्हावं हिच भावना असते. तरी मग हा शुभेच्छांचा सोपस्कार कशासाठी ?
असं करण्याला एक कारण आहे. कारण असं काहीतरी केल्याशिवाय कुणालातरी आपली आठवण येतेय हे कळत नाही. इथं मलाच काही हिंदी ओळी सुचताहेत. मी त्यांना उर्दू नाही म्हणणार. शायरी तर मुळीच नाही म्हणणार. त्या ओळी अशा -
कौन कहता है , हम तुम्हे याद नही करते
तुम्हे निंद आये इसिलीये हमने सुरज को डूबोया है
और खुले तुम्हारी निंद इसलिये
चिडीयोंको जगाया है.
असा हा प्रियकर. तिला झोप यावी म्हणुन सूर्याला मावळतीला धाडणारा आणि आणि पक्ष्यांच्या मंजुळ किलबिलाटानं तिला जाग यावी म्हणुन पक्षांना जागं करणारा.
असं काहीतरी केल्याशिवाय आपल्याला त्यांची आठवण आली आहे हे त्यांना कळतच नाही. कारण आठवण आली कि उचक्या लागण्याचे दिवस संपले हो आता. आता एखादयाला आपली आठवण आली कि ' टुंग , टुंग ' करत whatsapp ची रिंग वाजते. मला माझ्या सगळ्या वाचकांची, ब्लॉगर मित्रांची ( यात मैत्रिणीही आल्या बरं का ) आठवण येत होती. पण शक्यतो तुम्ही कुठंही न वाचलेलं , कुठंही न पाहिलेलं असं काहीतरी वेगळं पोस्ट करावं अशी इच्छा होती. आणि विचार करता करता प्रत्यक्ष रावण आपल्याशी बोलतोय अशी कल्पना मनात आली - त्या कल्पनेच्याच या ओळी.
श्रीरामांनी मारलंय एकदा मला
आता पुन्हा तुम्ही कशाला मारता
खरंच सांगा कधीतरी तुम्ही
तुमच्यातल्या रावणाचा गळा दाबता ? ………. १
तुम्ही गावोगाव करता दहन माझे
पण मी तर तुमच्यातच आहे
तुम्ही मारत नाही ना तुमच्यातल्या रावणाला
लक्षात ठेवा तोपर्यंत मी जिवंतच आहे ………. २
सोडून दया ना राग लोभ
एकमेकांवर फक्त प्रेम करा
रावण नाही मित्रांनो
शेवटी श्रीरामंच खरा
रावण नाही मित्रांनो
शेवटी श्रीरामंच खरा ………. ३
मस्तच लिहिलंय. अगदी माझ्या मनातील भावना आहेत.. फक्त मी शब्दबद्ध नाही करू शकत तूमच्या इतकं..
ReplyDeleteआभार ओंकारजी. पोस्ट लिहिली आणि गावी गेलो शेतावर. आठ दहा दिवस तिकडेच म्हनून उत्तर द्यायला उशीर झाला.
DeleteVariable rate financial loans have a changing interest rate that usually uses the actual variable
ReplyDeleteand will include a cover on frequency and highest interest will increase?
One fourth associated with associate's degree–earners plus certificate-earners
at equally private for-profit along with nonprofit universities borrowed $20,A thousand or more to complete their certifications,
compared to approximately 5 percent of two-year degree-seekers at open colleges?
A long-term treatment policy won't pay out basically if you are very
frail to your workplace.
Feel free to surf to my website ... reddit.com