Monday 27 October 2014

Shivsena, BJP, Assembly election : काय आहे भाजपाच्या मनात ?

( खालचं चित्रं नक्की पहा )

किती घडामोडी घडल्या मागच्या महिन्याभरात. युती तुटली. उद्धव ठाकरेंनी ओकता येईल तेवढी गरळ ओकली. प्रचार संपला. एग्झिट पोलनी भाजपा एक नंबरचा तर शिवसेना दोन नंबरचा पक्ष ठरण्याच भाकीत केलं. सगळ्याच पक्षांनी. ते नाकारलं. मतमोजणी पार पडली. १२३ जागासह भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. ६३ जागासह शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिला. पुढचं सगळं तुम्हाला ठाऊक आहे.  पण काय होणार आहे शेवटी. भाजपा शिवसेना युती होणार कि शिवसेना विरोधात बसणार. नेमकं काय आहे भाजपाच्या मनात ?

माध्यमात एकामागून एक बातम्या झळकताहेत. कधी २८- १४ असं खाते वाटप होणार. तर कधी १८-९ असा खाते वाटप होणार. कशी उद्धव ठाकरे मोदींच्या स्नेह भोजनाला उपस्थित रहाणार तर कधी उद्धव ठाकरे मोदींच्या स्नेह भोजनाला उपस्थित रहाणार नाहीत. एक ना अनेक. पण खरं काय ? आजही हे असं घडेल असं कुणीच सांगू शकत नाही. पण भाजपा शिवसेनेचा पाठींबा घेऊन सरकार स्थापन करेल असा मला विश्वास आहे. मग या वेगवेगळ्या बातम्या येताहेत त्या खऱ्या नाहीत का ? नक्कीच खऱ्या आहेत. मग का वागताहेत भाजपाचे नेते असे ?

जागा वाटपावरून शिवसेनेने अखेरपर्यंत जी भूमिका घेतली ती आज भाजपा आज घेते आहे. यात बदला घेण्याची भावना मुळीच नाही. केवळ भाजपाला जे निर्णय घ्यायचे आहेत त्यात भाजपाला शिवसेनेचा हस्तक्षेप नको आहे. म्हणजे भाजपाला सापत्नभावाची वागणुक दयायची आहे असंही नाही. पण भाजपानं हात पुढे केला तर शिवसेनेच्या अनेक अटी डोकं वर काढतील असं भाजपा नेत्यांना वाटतं आहे. आणि म्हणुनच शिवसेनेला अखेरच्या क्षणापर्यंत चर्चेपासून दुर ठेवण्याचा भाजपाचा मनसुबा आहे.

भाजपाला शिवसेनेपासुन दूर राहून चालणारही नाही. कारण ते केवळ येत्या पाच वर्षाचा विचार करत नाहीत. या नंतर विरोधी पक्षांनी लवकर डोकं वर काढू नये यासाठी भाजपाच्या सर्व खेळ्या अत्यंत नियोजनबद्ध सुरु आहेत. भाजपात मुख्यमंत्रीपदासाठी वाद वगेरे काही नाही. तसं असतं तर हरियाणात मुख्यमंत्री पदाचे चार सहा दावेदार असताना कोणत्याही वादाशिवाय मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री झालेच ना. अवघ्या ७ दिवसात त्यांच्या मंत्रीमंडळासकट सगळ्यांचे शपथविधी पार पडले ना. खट्टर यांच्या सारखा कोणताही प्रशासकीय अनुभव नसलेला प्रथमच आमदार झालेला इसम मुख्यमंत्री झाला ना ! त्यांनाच का मुख्यमंत्री केलं. कारण एकच विनापाश माणुस. ज्याला भ्रष्टाचार करण्याची आणि करू देण्याची गरज नाही.

या सगळ्यातनं शिवसेनेने एकच धडा घ्यायचा आहे. महाराष्ट्रातल्या पाच वर्षाच्या सत्तेत आपल्याला भाजपाच्या कोणत्याही निर्णयात फार हस्तक्षेप करून चालणार नाही. राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन किंवा अल्प मतातलं सरकार स्थापन करण्यात भाजपाला मुळीच स्वारस्य नाही. आणि नुसता विधानसभेचाच प्रश्न नाही. वर्षा दोन वर्षात येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात अजुनही मजबुत पाऊल ठेवायचं आहे. शिवसेनेनं भाजपाच्या कलानं घेण्यातच शिवसेनेचं हित आहे. फक्त शिवसेनेला ते समजायला हवं.

भाजपाच्या निम्मी मंत्रिपद शिवसेनेला मिळायला हवीत ही शिवसेनेची अपेक्षा भाजपाच्या पचनी पडत नाही. कारण भाजपाला निर्णायक बहुमतासाठी केवळ २२ जागा कमी पडताहेत. त्यामुळे तेवढ्यापुरतीच मंत्रिपद शिवसेनेने मागवित हि खरी भाजपाची अपेक्षा आहे आणि ती सहाजिकच आहे. कारण केंद्रात स्पष्ट बहुमत असतानाही भाजपानं आपलं मंत्रीमंडळ लहानच ठेवलं आहे. तसंच त्यांना महाराष्ट्रातही करायचं आहे. समजा भाजपाला एकूण ४० मंत्रीपद असावीत असे मनात असेल तर १४५ ला ४० तर १० ला किती ? तर साधारणता ३ मंत्रिपदे. आता इतरांचा पाठींबा गृहीत धरून भाजपाचे संख्याबळ १३२ होत असेल तर भाजपाला बहुमतासाठी १३ आमदार कमी पडताहेत त्यामुळेच तीनस एक यानुसार १३ ला ४ मंत्रिपद शिवसेनेला द्यावीत असे भाजपाच्या मनात असेल. जागा वाटपाचे गणितही मी मांडले होते. हेही गणितही योग्य आहे असे माझे मत आहे. पण हे शिवसेनेला पटले पाहिजे. 

राष्ट्रवादीनं विनाशर्त पाठींबा देऊ केला म्हणुन भाजपा हुरळून गेली नाही. आणि कोणत्याही परिस्थितीत ते राष्ट्रवादीचा पाठींबा घेऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार नाहीत. तेवढी समज त्यांना आहे. नुकताच पण भरतकुमार राउत या माजी खासदारांनी, " शिवसेनेनं आता अधिक अपमान सहन करू नये. सन्मानानं विरोधी पक्षात बसावं." असा सल्ला दिला आहे. या राउतांचा बोलविता धनी कुणी दुसराच असू शकतो. असं बोलुन शिवसेनेच्या मनात द्विधा मनस्थिती निर्माण करायची. बसु शकणारी घडी मोडायची. एवढाच हेतू यामागे असू शकतो. तो उद्धव ठाकरेंच्या लक्षात यायला हवा. 

अशा गोष्टींनी विचलित न होता. शिवसेनेने वाट पहावी. शेवटी सारे काही मंगलच होईल. मी तर त्यापुढे जाऊन असं म्हणेन कि शिवसेनेने एक पाऊल पुढं टाकुन भाजपाला बिनशर्त पाठींबा द्यावा. भाजपा तो नाकारू शकणार नाही. असा बिनशर्त पाठींबा घेताना भाजपानं शिवसेनेच्या पदरात काहीच टाकलं नाही तर नाचक्की भाजपाची होईल. आणि जनतेची सहानभूती शिवसेनेसोबत राहील.

गरज आहे ती शिवसेनेने डोक्यात राख घालून न घेता समंजस भुमिका घेण्याची.



8 comments:

  1. प्रचारामध्ये सतत भाजपवर टीकेचा भडीमार करणाऱ्या शिवसेनेला सत्तेमध्ये भागीदारी मागण्याचा काहीही हक्क नाही .आधी ताठ मान असल्याच्या गर्जना करायच्या ,महाराज दिल्ली तख्तापुढे कधीही झुकले नाहीत आणि आम्हीही दिल्लीपुढे वाकणार नाही यासारखी वाक्ये सांगून टाळ्या मिळवणे सोपे असते पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर ते कृतीमध्ये आणणे हे फार अवघड असते हे आता सेनेच्या राणा भीमदेवी आवेश आणणाऱ्या नेत्यांना कळले असेल पण आता फार उशीर झाला आहे..समेत घडवून आणण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे.आता सपशेल लोटांगण घालण्यावाचून पर्याय नाही. शिवाजी महाराजांचे दाखले देणे सोपे पण त्यांचा मुत्सद्दीपणा असणे फार दुर्मिळ आहे याची नोंद घ्यावी

    ReplyDelete
  2. सुजीत, जे काही करते ते शिवसेना करते आहे. पण याचा त्रास दोन्ही पक्षांना होणार आहे. पण शिवसेना भाजपा एकत्र येतील. कोण लोटांगण घालेल ते घालो. पण त्यांनी एकत्र येणं हे दोघांच्या भल्याचं आहे. भाजपापेक्षा शिवेसेनेच्या अधिक भल्याचं आहे.

    ReplyDelete
  3. बेशिस्त शिवसेनेच्या भल्याने म्हाराष्ट्राचे भले होणार आहे का... ? मला तरी नाही वाटत... पुढील दोन पिढी काही लीडरशिप आणि दूरदृष्टी पण नाही... कुणाचे तरी ऐकून बेशर्म परत मजतील मुंबईचे माजोरडे..

    असा वाटताय तुम्ही मवाळ लिहिताहेत...

    ReplyDelete
  4. मित्रा मवाळ किंवा जहाल लिहिणं हे माझ्या लिखाणाचे विशेष नाहीत. जन्मत तयार करणं हा माझा हेतु. शिवसेनेने राज्य केलंय. शिवसेनेचा मुख्यमंत्री झालाय. त्यामुळे त्यांना राज्य चालवतच येणार नाही असे नाही. ववेडा सुधा संसार करतोच ना. शिवसेना नुसतीच बेशिस्तच नाही अविचारी आहे. या वेळच्या घडामोडीतून शिवसेना शहाणी झाली नाही तर हि शिवसेनेच्या अधपतनाची सुरवात आहे.

    ReplyDelete
  5. बामन मुख्यमन्ञी केला का ? तिकडे आरक्षण काढायला लागले बघ आता. आपल्य जातीचा बळी देतो का?

    ReplyDelete
  6. मित्रा हा जातीयवादच माणसातल्या माणुसकीचा बळी घेतोय. तुम्हाला वाटतंय तसं काही होत नसतं. कुणी आरक्ष काढण्यासाठी सत्तेत येत नसतं.

    ReplyDelete
  7. bamana bamana kadhi hoshil re manus tuzya peksha bar gothyatal zanavar.

    ReplyDelete
  8. मित्रा प्रतिक्रियेबद्दल आभार. माझे लेख वाचुन मी ब्राम्हण असेन असा बऱ्याच जणांचा समज होतो. पण तसे नाही. मुळात मी जात, धर्म, पंथ मानत नाही. आपण सगळे माणुस आहोत. एवढंच माझं मत. गावी शेतावर गेल्यामुळे आपल्या प्रतिक्रियेस उत्तर दयायला उशीर झाला. कृपया गैरसमज करून घेऊ नये.

    ReplyDelete