Tuesday, 21 October 2014

Shivsena, BJP, Congress, NCP : बुडत्याला आधार


म्हणी कशा अस्तित्वात आल्या कुणास ठाऊक. पण आधुनिक म्हणी मात्र कशा  अस्तित्वात येत असतील हे माझं मलाच जाणवलं. लोकसभेला काँग्रेस फारच मोडीत निघाली. विधान सभेला हरियाणात तेच झालं. जसं  केंद्रात काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद राखता आलं नाही तसाच हरियानातही. महाराष्ट्रातही तेच झालं असतं. पण तुटलेल्या युतीनं त्यांना वाचवलं आणि म्हणुनच माझ्या मनात ' बुडत्याला आधार
शिवसेनेचा ' या म्हणीन जन्म घेतला.

उद्धव ठाकरे गेल्या महिन्याभरात ज्या रीतीचे निर्णय घेताहेत ते पहिला कि पुढच्या काही काळात ते शिवसेनेला कुठं नेऊन ठेवणार आहेत असा प्रश्न पडतो. स्वार्थापायी राज ठाकरे शिवसेनेतले काही शिलेदार घेऊन बाहेर पडले. आणि नऊ वर्षात स्वतःला कुठल्या कड्यावर आणुन ठेवलंय हे आपण सारे जण पहात आहोत. राज ठाकरेंवर हि अवस्था कुणी आणली नाही. त्यांचीच धोरणं त्यांच्या अंगाशी येताहेत. आणि उद्धव ठाकरेंची पावलंही त्याच दिशेने पडू लागली आहे. केवळ आडमुठेपणामुळे. त्यामुळेच प्रश्न पडतो कि काय होणार शिवसेनेचं ? 

अनेक जण म्हणतील कि काय फरक पडणार आहे ? काही फरक पडत नाही ? शिवसेना कालपण, आजपण उद्यापण. नारायण राणे गेले काय फरक पडला ? छगन भुजबळ गेले काय फरक पडला ? राज ठाकरे गेले काय फरक पडला ? पण हे सगळे गेले तेव्हा बाळासाहेब होते. आणि बाळासाहेबांची एक जादू होती. राजकारण हा त्यांचा पिंड होता. कोणत्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचे याची त्यांना जाण होती. त्यांच्यात काळाची पावलं ओळखण्याची ताकद होती, स्वतःच्या अंगावर येईल असा अहंकार त्यांना नव्हता. म्हणुनच आज बाळासाहेब असते तर त्यांनी युती तुटू दिली नसती. भाजपच्या निम्म्या जागांची मागणी मान्य केली असती. कारण बाळासाहेब खऱ्या अर्थानं ८० % समाजकारण आणि २० % राजकारण करत होते. आणि म्हणुनच त्यांनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवलं. नाही तर उद्धव ठाकरे,  मीच मुख्यमंत्री होणार म्हणुन गुढग्याला बाशिंग बांधुन बसले. 

झालं काय ! १५१ प्लसचं मिशन हाती घेतलं आणि केवळ ६३ जागांवर समाधान मानावं लागलं. 

होय मला माहिती शिवसेनेचे अनेक समर्थक म्हणतील, तिकडे फौज होती, इकडे एकटा वाघ होता इत्यादी इत्यादी.  

परंतु शिवसेना आणि भाजपा एकत्र लढले असते तर आज युतीला २२० च्या आसपास जागांवर विजय मिळवता आला असता. काँग्रेस राष्ट्रवादीला एकत्रितपणे अधिकाधिक ५० ते ५५ जागांवर विजय मिळाला असता. पण युती तोडल्यामुळे काय झालं काँग्रेस आणि राष्ट्रवादी बुडता बुडता वाचली. पण नाही उद्धव ठाकरेंचा अहंकार आणि फाजील आत्मविश्वास आड आला. युती तुटली. सगळेच स्वतंत्रपणे लढले आणि कॉंग्रेस - राष्ट्रवादी ८५ जागा मिळवून नका तोंडात पाणी जाऊनही वाचली. 

समजा शिवसेनेनं १३५ जागा घेऊन भाजपा १३५ आणि उरलेल्या १८ जागा मित्र पक्षांना दिल्या असत्या, ज्यांचे विजयी उमेदवार जास्त त्यांचा मुख्यमंत्री  असे ठ्र्वे असते तर काय झाले असते ! शिवसेना १०० जागांवर भाजपा ११० जागांवर आणि मित्र पक्षांना ८ ते १० जागा मिळाल्या असत्या. म्हणजेच आजच्या पेक्षा शिवसेनेचे ४० आमदार जास्त विजयी झाले असते. पण नाही महाराष्ट्रात आम्ही मोठे, आम्हाला जागा देणारे तुम्ही कोण उलट आम्ही देऊ तेवढ्याच जागा तुम्हाला घ्याव्या लागतील. असली काहीतरी तत्वशुन्य विधानं करून त्यांनी युतीचा आणि स्वतःच्या पक्षाचा खेळ खंडोबा करून टाकला. भरीस भर म्हणुन आपल्याच मित्र पक्षावर घणाघाती टीका करीत राहिले. भाजपा हा आमचा एक नंबरचा शत्रू आहे असं जाहीरपणे सांगु लागले. काय फळं मिळाली. भाजपानं १२३ जागांवर विजय मिळवला आणि शिवसेनेला केवळ ६३ जागांवर समाधान मानावं लागलं. भले भाजपाच्या १२३ मधले २२ विजयी उमेदवार आयात केलेले असतील पण शिवसेनेच्या ६३ मधले १३ विजयी उमेदवारही आयात केलेलेच आहेत. कसं नजरेआड करता येईल. कसली हि शोकांतिका !  

युती तुटायला शिवसेनाच कशी कारणीभूत आहे हे मी माझ्या  उद्धव ठाकरेंचं ढोंग या लेखात स्पष्ट केलं आहे. आजही सरकार स्थापन करताना उद्धव ठाकरेंनी जे काही चालवलेलं आहे ते शिवसेनेच्या हिताचं निश्चित नाही. 
 
' विनाश काले विपरीत बुद्धी ' म्हणतात ते यालाच.

12 comments:

  1. kadachit karyakartyanchi ichcha asu shakel ki ekda seperate ladhve, tymulech aghadi and yuti tutalya....pan matamojaninantar matra Udhdhav chya admuthepanacha namuna pahyala milato....Shivsenesathi hi changali sandhi ahe...15 varshananatar satta milali ahe tyacha fayada ghyayala hava....lokana congrase and NCP nako hote mhanun thyani tumhala ek sandhi deu keli ahe....lokancha bhramniras karu naka....Sharad pawarankadun shika

    ReplyDelete
  2. रोहितजी प्रतिक्रियेबद्दल आभार. कदाचित भाजपाही विदर्भ स्वतंत्र करू इच्छित नसेल. कारण महाराष्ट्राच्या सत्तेची चावी सतत आपल्या हातात ठेवण्याचा तो एक मार्ग आहे याची जनिए भाजपाला आहे. पण शिवसेनेने कोणत्याही अटी शर्थी घालू नयेत. कारण सत्ता महत्वाची आणि सत्तेत राहून जनसेवा महत्वाची. पुन्हा पाच वर्ष सत्ता मिळविण्याचा तोच एक उपाय आहे.

    ReplyDelete
  3. Patle aple mhanane.

    ReplyDelete
  4. मित्रा प्रतिक्रियेबद्दल आभार. पण नावासह प्रतिक्रिया दिल्यास अधिक आनंद होईल. असो पण शिवसेना जागेवर येईल. सत्तेत सहभागी होईल. आणि तसं होणं गरजेचं आहे. समजा भाजपाला सत्तेबाहेर ठेऊन शिवसेनेसोबत राष्ट्रवादीन अथवा राष्ट्रवादी - काँग्रेस - शिवसेना अशी तिघांनी एकत्रित सत्ता स्थापन केली असती तर महाराष्ट्राचं आणखी पाच वर्ष काही खरं नव्हतं. या दोघांनी शिवसेनेला अक्षरशा बोटावर खेळवलं असतं.

    ReplyDelete
  5. महाराष्ट्रात शिवसेनेने थोडा लवचिकपणा दाखवून भाजपशी युती कायम ठेवली असती तर युतीला २०० च्या वर जागा मिळाल्या असत्या. ज्या जागांवर शिवसेना आणि भाजप पूर्वापार हरत आलेले आहेत त्या जागांची योग्य अदलाबदल करण्याचा, भाजपचा अत्यंत व्यवहार्य असलेला पर्याय, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी अतिआत्मविश्वासाने आणि मुख्यमंत्रीपदाच्या लालसेने धुडकावला. महाराष्ट्रातील युतीच्या पारंपारिक मतदारांमध्ये दुफळी निर्माण केली. निवडणुकीनंतर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपल्या उद्धटपणाचे जाहीर प्रदर्शन करून, भाजपच्या नेत्यांना बोलणी करण्यासाठी आपल्या "दरबारी" येण्याचा आदेश दिला. भाजपचे नेते हा आदेश पाळण्यास बांधील नाहीत हे उद्धट ठाकरे सोयीस्करपणे विसरले. आता उलट शिवसेनाच भाजपच्या नाकदुऱ्या काढत असल्याचे चित्र दिसते आहे. भाजपने आता अधिक ताणून न धरता, शिवसेनेबरोबर सन्माननीय समझोता करून सत्तास्थापन करावी आणि महाराष्ट्राला भ्रष्टाचाराच्या, महागाईच्या, अनागोंदीच्या कारभारामधून मुक्त करावे.

    ReplyDelete
  6. Aho kaypan tark kasa lavta ho tumhi. Ata sanga mukhyamantri kon honar ahe. Gadkari ani phadanvis hyamadhye bhandan zali tar bjpmadhye ani Congress madhe farak kay?

    ReplyDelete
  7. सुजित अगदी खरं आहे तुझं म्हणणं. जे तुला मला कळतं ते यांना कळत नाही अशातला भाग नाही. पण स्वार्थ आडवा येतो. आणि म्हणुनच स्थानिक पक्षांचं देशहिताचं आणि जनहिताच असणार नाही असं मत मी माझ्या स्थानिक पक्षांचा स्वार्थीपणा या लेखात व्यक्त केलंय

    ReplyDelete
  8. मित्रा भाजपाला एक संस्कृती आहे. अधिक बोलणाऱ्या नेत्यांना गप्प बसवण्याची ताकद आहे. वेळ आली तर पक्षाबाहेर काढण्याची धमक आहे. गडकरी केंद्रातच रहाणार. फडणवीस मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट आहे. असो प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete
    Replies
    1. Sanskriti ata kalel jevha gadkari shakti pradarshan karel.

      Delete
  9. मित्रा सगळं काही लवकरच कळेल.

    ReplyDelete
  10. तुम्ही मराठी लिहीण्यासाठी कोणता app वापरता. त्याबद्दल थोडे मार्गदर्शन कराल काय?

    ReplyDelete
  11. मित्रा, शक्यतो निनावी प्रतिक्रिया देऊ नयेत. माझ्या ब्लॉगच्या डाव्या बाजुला ' मराठीत लिहायचं ? इथं लिहा ' या शिर्षका खाली असलेल्या विंडोत मराठी लिहिण्याची सोय आहे. त्या व्यतिरिक्त http://www.google.com/intl/mr/inputtools/try/ या लिंकचा ही वापर आपण करू शकता. मराठी शब्दांचे इंग्रजी स्पेलिंग लिहिल्यास ते मराठीत कन्व्हर्ट होते. तेथून ते कॉपी पेस्ट करून आपण हवे तेथे वापरू शकता.

    ReplyDelete