शिवशाही आणतो असं स्वप्न दाखवून जनतेवर अत्याचार करायचे हे योग्य नाही. घरकाम करणाऱ्या मंडळींना सोसायटीमध्ये प्रवेश द्या नाही तर गुन्हे दाखल करतो. घरातून बाहेर पडलात तर गुन्हे दाखल करतो. गाड्या जप्त
करतो. एकट्या मुंबईत एका दिवसात २३ हजार गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. यात जनतेचे हिट कोठे आहे. किती त्रास होत असेल जनतेला. पोलिसांच्या ताब्यात गेलेल्या गाड्या सोडवणे, मगरीच्या जबड्यातून मान सोडवण्यासारखे आहे. मध्ये तर काय तर म्हणे, कोरोना रुग्नांना त्यांचे टेस्ट रिपोर्ट देण्यात येणार नाहीत. का? शाळा सुरु झाल्या नाहीत परंतु शाळांनी फीसाठी तगादा लावला आहे. काढा ना अध्यादेश आणि सांगा ना शाळांना कि, 'जोवर प्रत्यक्ष शाळा सुरु होत नाहीत तोवर कोणत्याही प्रकारची फी आकारली जाऊ नये.' पण तसा अध्यादेश तुम्ही काढणार नाही. कारण तसे केले तर शिक्षण सम्राटांचा तोटा आणि जनतेचा फायदा होईल ना?
वीज बिल जास्त आले तर आपले ऊर्जा मंत्री म्हणतात कि वर्क फ्रॉम होममुळे वीजबिल जास्त आले. सामान्य जनतेला तर माहित नसेलच परंतु आपल्या ऊर्जा मंत्र्यांना तरी आहे का? एकदा लॉपटॉप चार्जिंग करायला ५० वॅट वीज लागते. १००० वॅट म्हणजे १ युनिट. म्हणजे १ युनिट वीज वापर व्हायला लॅपटॉप वीस वेळा चार्जिंग व्हायला लागेल. म्हणजे लॅपटॉप आणि अन्य साधनांसाठी महिना अधिकाधिक ४ युनिट वीज वापर वाढला असेल आणि त्यासाठी वीजबिले दुप्पट?
काय सुरु आहे हे? पंधरा दिवस वारी सुरु असते. २५० किलोमीटरचा पायी प्रवास होतो. आठ दहा लाख वारकरी वारीत सहभागी असतात. ऊन असतं. पाऊस असतो. पण पंधरा दिवसाच्या या वारीत कधी गोंधळ होत नाही. आणि तुमच्या राज्यात काय सुरु आहे आहे. आता पंढरीला गेला आहात ना. तर तुम्ही तिकडेच रहा आणि राज्य त्याच्या हवाली करा. कारण तुमचा भरवसा उरला नाही. तोच तारू शकतो. तुम्ही नाही.
मित्र हो, मुळात मी लेखक. कवी. लॉक डाउनच्या काळात एका कादंबरीचे, एका कथा संग्रहाचे लेखन पूर्ण केले आहे. योग्य आला तर लवकरच ती पुस्तके प्रकाशित होऊन तुमच्या हातात पडतीलच. खरंतर लेखकाने राजकीय फंदात पडू नये असं म्हणतात. परंतु मला नाही पटत हे. त्यामुळे ज्या काही प्रकारचं राजकारण राज्यात आणि देशात सुरु आहे त्यामुळे मला स्वस्थ बसवत नाही. कोणावर टिका करावी हा माझ्या लेखनाचा हेतू नाही. जनतेच्या डोळ्यात अंजन घालण्याचा माझा छोटासा प्रयत्न असतो.
आज सकाळी असाच विचार करत बसलो. मनात कल्पना चमकली आणि कविता लिहून झाली. एखादा व्यंगचित्रकार जसे मजेदार व्यंगचित्र काढतो तसेच हे शाब्दिक व्यंगचित्र आहे. त्याच्याकडे निखळ करमणूक याच भावनेने बघावे.....आवडल्यास खुशाल शेअर करावी.
सांभाळ रे वीट
तुझ्या दारी आला l लबाड लांडगा l
देवा तो कोडगा l आहे फार ll १ ll
खोटे बोलण्याचा l त्याला ना विटाळ l
गाठीला किटाळ l त्याच्या खुप ll २ ll
फसवतो फार l कोणालाही देवा l
भरोसा मी द्यावा l त्याचा कसा ll ३ ll
नावामध्ये त्याच्या l जरी रे उध्दव l
नाही बरे देव l देवा तो रे ll ४ ll
सावध तू राही l सांभाळ रे वीट l
उभा राही नीट l विटेवरी ll ५ ll
खेचूनी घ्यायचा l तुझी वीट देवा l
रोवूनी हो ठेवा l पाय तेथे ll ६ ll
खुर्ची सुद्धा त्याने l अशीच खेचली l
जनता पीचली l त्याच्या पायी ll ७ ll
छानच
ReplyDeleteपरखड मत, अभिनंदन शुभेच्छा!🌹🌹🙏
ReplyDelete