Wednesday, 8 October 2014

Sketch of PM Shri Narendra Modi : नरेंद्र मोदींच चित्रं

( मेडिसन स्क्वेअर इथं दोन्ही हातांनी मोदींच स्केच साकारणाऱ्या चित्रकाराच ते स्केच साकारताना घेतलेला व्हिडीओ. यातली आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे तो चित्रकार ते चित्र उलटं चितारत होता. आपण हा व्हिडीओ पहिला नसेल तर नक्की पहा. )


जो तो आपापलं नशीब घेऊन जन्माला येतो असं  म्हणतात. परंतु नरेंद्र मोदींसारख्या माणसाकडे पाहिलं की वाटतं काहीकाही माणसं स्वतःच आपलं नशीब घडवतात. एक वर्षापूर्वी कोण ओळखत होतं मोदींना. पण आज लहानापासून थोरांपर्यंत आणि विरोधकांपासून सत्ताधाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या ओठी मोदींच नाव आहे.  पण आम्हा सामान्य माणसाची विचार क्षमता किती सीमीत असतेयाचं  ये फार ज्वलंत उदाहरण मी एका मराठी न्युज च्यानल वर पाहिलं. पाच सहा दिवसांपूर्वीची घटना आहे. सदर च्यानलचा पत्रकार मतदारांची मतं जाणून घेण्यासाठी कोकणात फिरत होता. 

त्या पत्रकाराला वाटेत एक आजोबा भेटले. सत्तरी गाठलेले. पिकून पांढरे शुभ्र झालेले. पत्रकारांनी त्यांना विचारलं काय आजोबा यावेळी कोणाला मत देणार. त्यांनी कुठल्यातरी एका उमेदवारच नाव घेतलं. मग पत्रकाराने विचारलं, " आजोबा मोदींना मत देणार कि नाही ? " 

त्यावर आजोबा तत्काळ उत्तरले, " त्याला कशाला मत द्यायचं ? तो काय करतोय ? त्यानं सगळी महागाई वाढवली. रेल्वेचं भाडं वाढवलं. तो काय करतो ? नुसता चीनला जातो……… जपानला जातो………अमेरिकेला जातो. नुसता फिरत बसलाय. अरे, इथं भारतात राहुन कर न म्हणावं काय करायचं ते. " पत्रकार दुसऱ्या मतदाराकडे वळाला. 

आम्हा भारतीयांची विचारसरणीच एवढी. अमेरिकेत गेल्यानंतर मात्रं तिथं सर्वत्र मोदींची सावली पडलेली दिसते. प्रत्येकजण मोदींची स्तुती करत असताना दिसतो. अल्पबुद्धी, विघ्नसंतोषी विरोधक मात्र टिकाच करताहेत. 

आज मोदी जे काही करताहेत ती प्रत्येक गोष्ट पाहिली की' " हे आपल्याला का नाही सुचलं. " असं वाटण्याखेरीज विरोधकांच्या हाती काहीच रहात नाही. आजपर्यंत कोणत्याही भारतीय व्यक्तीला मिळाला नाही असा सन्मान मोदींच्या वाटयाला आला. न भूतो न भविष्यती असा. विरोधकांचा खूप खूप जळफळाट होत असेल. पण त्याशिवाय विरोधकांच्या हाती काहीच नाही. मोदींना मात्र पुन्हा एकदा सलाम. 

2 comments:

  1. लेखकच्या मते भाजपा हा सर्वगुण संपन्न असलेल्या व्यक्तींचा पक्ष आहे, चुका असतील तर सर्वांच्या मांडा, खरच का हो
    एवढे चांगले आहेत भाजपवाले …… का हो त्यांनी भ्रष्ट म्हणून आरोप असणाऱ्यांना उमेदवारी दिली. …… जनता पण वेडी नाही
    शेवटी पडले ना ते ……चुकीचा वागतील त्यांना जनता घरी बसवणार मग त्यामध्ये किं कोन्ग्रेस , कोण राष्ट्रवादी कोण शिवसेना कि मनसे आणि कोण भाजपा

    ReplyDelete
  2. मित्रा माझ्या ब्लॉगला भेट देऊन प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार. गावी गेलो होतो म्हणुन आपल्या प्रतिक्रियेस उत्तर दयायला उशीर झाला.

    जगात कोणीही सर्व गुण संपन्न नाही. मी भाजपाचा समर्थक नाही. जनतेच्या आशा अपेक्षा पुर्ण करू शकेल असा एक पर्याय समोर आला आहे. पाच वर्ष काय होतंय ते पहायला हवं. नंतर आपण पुन्हा हव्या त्या पर्यायाची निवड करू शकतो.

    ReplyDelete