cat , pet animal , mother , mother's day
मी मागच्या पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे माझा प्रवासही बेताचाच आणि माझं जगही छोटंसंच. पण या लहान जगातही अनेक गोष्टी घडत असतात. आणि मी त्यावर लिहित असतो. मागेही मी ' अशीही एक आई ' या मथळ्याखाली एका आईची कहाणी लिहिली होती. तशीच आणखी एका आईची हि आणखी एक कहाणी.
माझं गावाकडच घर जुनं. माळवादाच. साठ सत्तर पावसाळे झेलूनही खंबीरपणे उभं असलेलं. दोन हात रुंदीच्या भिंती असलेलं. भिंतीतच कपाटं. घराला करकरणारे पितळी फिरक्याचे नक्षीकाम केलेले दरवाजे. बाहेरच्या भिंतीला दगडी तशाच लाकडी खुंट्या. आतले आधाराचे खांब अस्सल सागवानी. दरवाजा मात्र उन पाऊस झेलून भेगाळलेला. तो मला अंगावर सुरकुत्या असलेल्या सत्तरीच्या जुन्या जाणत्या म्हाताऱ्यासारखा वाटतो. घराला खिडक्या दोनच हात दिड हात लांबी रुंदीच्या. मी गावावरून परतताना. दार आणि खिडक्या बंद करून येतो.
एकदा असाच गावी गेलो. तर घरात मांजर आणि तिचं पिल्लू . इवलसं. मायलेकरं घरात मुक्तपणे फिरत होती . माझं लक्ष खिडकीकड गेलं. तर खिडकी सताड उघडी. मला पाहिलं तसं ते पिलू आणि त्याची आई चकाट पळाले. आतल्या सोप्याच्या अडगळीत लपले.
काय झालं असावं ? ते माझ्या लक्षात आलं. पिल्लांना घेऊन मांजर सात घरं फिरते हे मला माहित होतं. मी इथं नसताना ती अशीच पिलाला घेऊन उघड्या खिडकीतून आत शिरली असावी. दोन आठवड्यात पिलू चांगलं मोठं झालेलं असावं आणि आता तिला इच्छा असूनही मी नसताना पिलू घेऊन खिडकीतून बाहेर जाता येत नसावं. अथवा यापेक्षा सुरक्षित जागा अन्य कुठली असूच शकत नाही असं वाटून तिनं पिल्लू चांगलं मोठं होईपर्यंत इथंच ठाण मांडायचं ठरवलं असावं.
मी त्यांना हुसकावून लावलं नाही. मांजर आणि पिलू दोघंही बुजरी. ती माझ्या वाऱ्यालाही यायची नाहीत. मी कधी टिव्ही पहाण्यात रमलो असेल तर तेवढ्यापुरतं पिलू अडगळीतून बाहेर यायचं. माझी हालचाल झाली कि धूम अडगळीत पळायचं.
मग मी पुण्यात परतताना मांजरीला आत बाहेर करता यावं म्हणून खिडकी आवर्जून उघडी ठेवायचो. अशा माझ्या दोन चकरा झाल्या. म्हणजे महिना गेला. मी असो, नसो दोघे घरात मस्त तळ ठोकून होते.
तिसऱ्या चकरेला मी गावी गेलो. घर उघडलं. आत गेलो. मांजर आणि तिचं पिलू अडगळीतून बाहेर येऊन मोकळ्या जागेत घोरत पहुडले होते. माझी चाहूल लागली तते दोघेही अडगळीकडे पळाले. मी खिडकीपाशी गेलो. पाहिलं तर खिडकीजवळची तीन चार हात घेराची जमिन पूर्ण उखणलेली. बापरे ! आता हे सारवणार कोण ? बस्स ! आता यांना घरातून बाहेर काढायलाच हवं या इराद्यानं मी हातात लाकूड घेऊन अडगळीकडे गेलो. तशी दोन्ही मायलेकरं अडगळीत आणखीनच आत शिरली. पिल्लू तर मला दिसेना सुध्दा. मन्या दिसली. पण तिलाही हातातल्या लाकडाच्या ढूसन्या देणं मला जमेना. हातातलं लाकूड आपरं पडत होतं. पण मी तिला आवाज करीत हुसकावत राहिलो. नाईलाजानं मन्या बाहेर आली आणि धूम बाहेर पळाली. पिल्लू मात्र अडगळीचा फायदा घेऊन तसच बसून राहिलो.
' हरकत नाही. मांजर तर गेली पिलालाही बाहेर काढता येईल. बघू नंतर. ' म्हणत मी पिलाचा नाद सोडला. ' आता हिचा एक मार्ग बंद करायला हवा. ' म्हणत मी खिडकी बंद केली. आणि पलंगावर आडवा झालो. तासाभरानं मांजर आली पण मी तिला हुसकावून लावलं.
पाच वाजले होते. मी घराला कुलूप लावलं आणि बाहेर गेलो. सात वाजता परत आलो. दार उघडलं. लाईट लावली. पाणी प्यालो. आणि दार बंद करून पुतण्याकडे जाऊन बसलो. त्याला पिलाविषयी सांगितलं. तो म्हणाला , " काका मला द्या ते. मला एक मांजर हवंच आहे. पाळायचंय . "
मी म्हटलं , " ठीक आहे. सकाळी घेऊन जा. "
तिथून थेट नऊ वाजता घरी आलो. दार उघडून घरात आलो तर मागोमाग माझा कुत्रा आला. त्याला मी ' ढमप्या ' म्हणतो. मला जेवायला बसायचं होतं. मी टिव्ही लाऊन टीव्हीसमोरच जेवायला बसलो. ढमप्या दारातच उभा. कोर चतकोरीच्या अपेक्षेने.
पाच एक तास मांजरीची आणि पिलाची भेट नव्हती. दार उघडं बघून ती आली. तर दारात हा राक्षस. आत यायचं तिचं धाडस होईना. ती तिथं कुत्र्याच्या मागे अंतर ठेऊन केविलवाण्या आवाजात पिलाच्या आठवणीने गळा काढू लागली. बहुधा , ' मी आहे हा इथंच. घाबरू नकोस. संधी मिळाली कि मी येतेच आत.' असं म्हणत पिलाला धीर देत असावी.
ढमप्या तिच्याकडे तिरप्या नजरेनं पहायचा. पण गप्पं बसायचा. माझं जेवण होत आलं तशी मी त्याला एक चपाती टाकली. ती त्यानं तिथंच दारातच उभ्यानं खाल्ली. मी ताट वाटी धुतली. टिव्ही पहात पलंगावर आडवा झालो. ढमप्यानं उंबरठ्याच्या आत बसकन मारली. दार उघडच. बाहेर, आत येण्याच्या संधीच्या शोधात असलेली मांजर.
चांगला अर्धा तास गेला. मी जागाच होतो. पण लक्ष टिव्हीत. ढमप्यानं डोळे मिटलेले. मांजरीन अंदाज घेतला आणि धाडस करून जिवावर उदार होत दबक्या पावलानं आत झेप घेतली. अडगळीत पळाली. ढमप्याच्या लक्षात नाही आलं. पण मी उठलो. हातात बॅटरी आणि लाकूड घेतलं. अडगळीकडे गेलो तसा ढमप्या सावध झाला. माझ्या मागोमाग आला. मी मांजरीला आणि पिलाला हुसकावू लागलो. पण दोघेही बाहेर यायचं नाव घेईनात. त्यात समोर त्यांच्या वासावर असलेला कुत्रा त्यांना दिसत होताच. ढमप्या पुढं येऊन पंजा मारत होता. पिलू अडगळीत शक्य तेवढया आत जात होतं. मांजर मात्र शेपूट पिंजारून ढमप्यावर झेप घेण्याचा पावित्रा घेत होती. पुढे ढमप्या ..... मागे मी. माझ्या हातातलं लाकूड तिला लागत नव्हतं आणि लागू नये याची मी काळजीही घेत होतो. पण तिला भीती वाटत होती. आपण बाहेर गेलो नाही तर हा पाठीमागे लागलेला ससेमिरा काही थांबणार नाही याची तिला जाणीव झाली होती. शेवटी धाडस करून रुद्र अवतार धारण करीत ती अडगळीतून बाहेर आली. पण ढमप्यानं तिला पंज्या मारला. तीही त्याच्यावर धावून गेली. एक सणसणीत पंज्या त्याच्या नाकावर मारला. तो चुकवताना ढमप्या दोन पावलं मागे सरला. हि संधी साधुन मांजरीने खिडकीकडे झेप घेतली. पण खिडकी बंद आहे हि तिच्या लक्षात नसावं. खिडकीला धडकून खाली पडली. ढमप्यानं पुन्हा तिच्यावर झेप घेतली पण अत्यंत चपळाईनं ती त्याच्या तावडीतून निसटली आणि वाऱ्याच्या वेगाने घराबाहेर पळाली. रात्रीच्या अंधारातही ढमप्यानं तिचा पाठलाग केला.
मला भीती वाटत होती. कारण माझ्या कुत्र्याचा स्वभाव मला माहित होता. अगदीच अनोळखी आणि फटका माणूस दारात आला तरच तो त्याच्यावर भुंकायचा आणि धावून जायचा. अन्यथा माणसाला तो कधीच फार त्रास द्यायचा नाही. पण माझ्या दारात आलेली कोंबडी असो , दुसरा कुत्रा असो व अन्य कुठलं पाखरू असो. हा पठ्ठ्या त्यांच्यावर तुटून पडायचा. आपल्याला उडता येत नाही हे माहित असूनही उडत्या पाखरांवर सुद्धा तो धावून जायचा. अशीच एक मांजर आणि चांगलं उडता येणारं कोक्या नावाचं पाखरू ही त्यानं माझ्यासमोर मारलेलं मी पाहिलं होतं. त्यामुळेच हिला जर त्यानं मारलं तर माय लेकराची ताटातूट केल्याचं पातक माझ्या माथी येईल या भीतीने माझं मन मला खात होतं.
ढमप्या कुठंवर गेला होता माहित नाही. पण पाच एक मिनिटाने धापा टाकत परत आला. बहुधा रिकाम्या हातानेच आला असावा. मला बरं वाटलं.
खूप गरम होत होतं. मी दार उघडं ठेऊन झोपी गेलो. ढमप्यानं सुध्दा घरातच अंग टाकलं आणि झोपी गेला.
रात्री कधीतरी मला जाग आली. किती वाजले होते माहित नाही. पण घरात ढमप्या दिसत नव्हता. बहुधा टेहाळणीवर गेला असावा. घरात मांजरीचा आणि पिलाचा आवाज येत होता. मी तसाच झोपी गेलो. सकाळी उठलो. दात घासले. दाढी झाली. आंघोळ उरकली. सात वाजले होते. मांजर घरात दिसत नव्हती. पण म्हणलं ',' पिलू नक्कीच ' असेल. ते बाहेर काढावं आणि पुतण्याच्या ताब्यात द्यावं, या विचाराने मी मागच्या सोप्यात गेलो. खूप शोधलं पण पिलू काही सापडलं नाही.
बहुधा इथला धोका मांजरीच्या लक्षात आला असावा आणि पिलाला घेऊन ती दुसऱ्या अधिक सुरक्षित ठिकाणी गेली असावी. मी मनोमनी म्हटलं , ' कशी असते ना आई ? दारात उभ्या कुत्र्याला पाहून पिलाच्या आठवणीने गळा काढणारी. कुत्रा दारात झोपलेला आहे हे माहित असतानाही पिलासाठी धाडस करून आत येणारी. पिलासाठी राक्षसा एवढया कुत्र्यावर धाव घेणारी. पिलू नसतं तिचं आपल्या घरात तर कशाला पत्करला असता असा धोका तिने ? '
माझ्याच ' आई ' या कवितेतल्या -
' आई सशाचं काळीज , आई सिंहाची छाती
आई डोक्यावरचं आभाळ , आई पायाखालची माती '
या ओळी आठवल्या आणि माझ्या मनात आईच्या आठवणीचे ढग दाटून आले. आईला किती काळजी असते लेकरांची. पण तिचेच हात पाय थकतात तेव्हा लेकरं एवढा जीव टाकतात का हो तिच्यावर ?

तुमची हि आणि ' अशीही एक आई ' या दोन्ही पोस्ट वाचल्या. या सगळ्या गोष्टी आम्हालाही दिसतात सर पण आम्हाला असे लिहिता येत नाही. अशा छोट्याशा गोष्टीवर एवढी छान पोस्ट लिहायला दैवी देणगीच हवी.
ReplyDeleteसायलीजी प्रयत्न केला तर तुम्हालाही जमेल. दैवाचा वाट असतो यात पण तो तेवढ्यापुरताच. प्रयत्न आपणच करायचे असतात.
Delete