Dog Video, My Dog ( तळाचा व्हिडीओ नक्की पहा . )
माझे गडी येताना ढंमप्याला सोबत घेऊन आले. पण जाताना मात्र त्यांना रिकाम्या हाताने परत जावं लागलं. ढंमप्या माझ्याजवळच राहिला. तीनचार महिन्यानंतर माझ्याकडे दुसरं गडी आला. जातीनं भिल्ल. तीर कामठा जाऊन हाती गलोल आलेला. चार पोर, तीन पोरी, नवरा बायको असं मोठं खटलं. त्याला ठेवताना बरीच माणसं कामाला मिळतील हा माझा हेतू.
ढवळ्या शेजारी बांधला पवळा , वाण नाही पण
गुण लागणारच. याची पोरं गलोल हाती घेऊन ओढ्या वघळीनं फिरायची. चित्रं , पारवे मारत फिरायची. दोनचार दिवसातून दोनचार पाखरा आणायची. त्यांचा बेत व्हायचा. कधी जाळं टाकून ससे पकडायचे. एक दोन वेळा घोरपड सुद्धा पकडून आणलेली. मी हे सगळं त्यांच्या सोबत खाल्लेलं.
चार दिवसासाठी मी पुण्यात आलो होतो. परत गेलो तर ढंमप्याच्या कपाळावर अगदी मधोमध जखम. काय झालं असावं याचा अंदाज लागत नव्हता. प्राण्यांच्या जख्मा त्यांनी चाटल्या कि आपोआप बऱ्या होतात हे मी ऐकून होतो होतो. होईल आपोआप बरी म्हणून मी आधी दुर्लक्ष केलं. पण दहा बारा दिवसांत ढंमप्याला खूपच त्रास होऊ लागला. त्याच्या जखमेत आळ्या झाल्या होत्या. जखम कपाळाच्या मधोमध असल्यामुळे त्याला ती जिभेने चाटताही येत नव्हती.
शेवटी मी गुरांच्या डॉक्टरला बोलावलं. त्यानं दोन हजार रुपयांची औषध सांगितली. त्याची फी. इंजेक्शन. गोळ्या. जख्मेवर मारण्यासाठी जंतुनाशक फवारा. आणलं सारं. त्याला इंजेक्शन देणं म्हणजे काही साधं काम नव्हतं. एकतर त्याला त्रास होत होता. माझ्याही जवळ तो फारसा येत नव्हता. तरीही त्याला चुचकारून आंजारून त्याला जवळ बोलवायचो. त्याचे चारी पाय बांधायचो. जबडा बांधून टाकायचो. मग डॉक्टर त्याला इंजेक्शन द्यायचा. सुटायची खूप धडपड करायचा. पण आम्ही चारपाच जन त्याला आवळून धरायचो. त्याच्या कपाळावर जंतुनाशक फवारल्यानंतर त्याला अजिबात सहन व्हायचं नाही. आग आग होत असावी. आम्हा सगळ्यांना झुगारून तो सुटायचा. पण कोणावर धावायचा नाही. लांब जाऊन बसायचा. जंतू नाशक फवारल्यानंतर काही वेळातच त्याच्या जखमेतून बाहेर पडणाऱ्या चांगल्या मोठ मोठ्या आळ्या मी पहिल्या आहेत.
अशी पंधरा दिवस मी त्याची सेवा केली. औषध संपली. पुन्हा आणली. नैसर्गिक औषधांचा जेवढा चांगला परिणाम होतो तेवढा या औषधांचा होईना. मी चार एक हजार घालवले होते. पण हवी तशी जखम भरून येत नव्हती. मला काय करावं सुचत नव्हतं. चार जणांकडे चौकशी केली. तेव्हा एकानं जखमेत पेट्रोल टाकण्याचा सल्ला दिला. तो प्रयोग केला. चार हजार रुपयांच्या औषधानं जे साधला नाही ते चार वेळा त्याच्या जखमेवर पेट्रोल टाकल्यानं साधलं. ढंमप्याची जखम भरून आली.
पण त्याला असं लागलंच कसं ? कपाळावर तेही नेमकी मधोमध जखम झालीच कशी ? हा प्रश्न सुटत नव्हता. चर्चेतून पुतण्यांशी केलेल्या चर्चेतून या पोरांनीच गलोलीने दगड मारला असावा असा असा अंदाज निघाला. भिल्लाच्या पोरांना प्रेमाने विचारलं, खडसावून विचारलं. पण ती काही दाद लागू देईनात. एक दिवस त्यातलं बारकं पोरगा गपचूप माझ्याकडे आलं. म्हणालं , " शेट , पिऱ्याणी मारला व्हता दगड."
" का ? "
" काय नाय. असंच. म्हणला तुला नेम दाखवतो.
डोकं सणकल. पिऱ्या फिरत होता ओढ्याला. पार दिवस मावळा. काळोख दाटून आला तेव्हा आला घरी. मी आल्या त्याच्या कानाखाली चढवली. पैसे गेल्याचं दुःख नव्हतं. महिनाभर माझ्या ढंमप्याला झालेल्या त्रासामुळे माझं काळीज तुटत होतं.
त्याच्या आईबापांनी त्याचीच बाजू घेतली. म्हणाले , " तो कशाला मारतोय ? काय कुत्रं काय खायचं का काय आमास्नी ? " जास्त वाद घालत बसलो नाही.
त्यांना आठ दिवसांत दुसरीकडे काम शोधायला आणि माझा हिशोब द्यायला सांगितलं. तीन महिन्यात चाळीस हजार रुपये दिले होते मी त्यांना. कामाचे पैसे वजा करता. पंचवीस हजार रुपये त्यांच्याकडे फिरत होते.
त्यांनी आठ दिवसांत दुसरीकडे काम शोधलं. माझा हिशोब मिटवण्यासाठी म्हणून त्या माणसाकडून उचल घेतली. आणि माझ्या पैशाची व्यवस्था केली.
पाच वर्षे झाले ढंमप्या माझ्याकडे आहे. चार चार कुत्र्यांना एका वेळी लोळवणारा हा पठ्ठ्या. पण पाच वर्षात तो कोणत्याही माणसाला कधीहि चावला नाही. अंगावर धावून जातो. पण मर्यादा राखून. समोरच्या माणसाला भीती तर वाटली पाहिजे पण त्याच्या मनात धडकी नाही भरली पाहिजे असा.
गडी आले गेले. पण ढंमप्यानं माझी साथ सोडली नाही.

No comments:
Post a Comment