अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत असं म्हणलं
जातं. पण मला नाही पटत हे फारसं. ज्या कुणी या गरजांना माणसाच्या मुलभूत
गरजा ठरवल्यात त्याला माणसाचं फक्त जगणं अपेक्षित असावं.
पण खरंच माणूस जन्म घेतो तो केवळ जगण्यासाठीच का ? नाही ! मुळीच नाही. प्रेम हीसुद्धा माणसाची अगदी मुलभूत गरज आहे. नव्हें प्रेमाविना माणसाच्याच काय कोणत्याही सजीवाच्या जगण्याला मुळीच अर्थ नाही. आणि म्हणूनच मोरासारखा देखणा पक्षांचा राजा प्रेमाच्या शोधात रुपाची वानवा असलेल्या लांडोरीच्या मागे फिरतो.
त्याच विषयाला धरून लिहिलेली माझी मोर आणि लांडोर हि पोस्ट सर्वाधिक वेळा वाचली जाते.
प्रेम याच विषयाला धरून लिहिलेल्या -
Love Poem : रे घना
Love Poem : कृष्ण सावळा होईन मी
Love poem : छान दिसतेस अशी तू
Love Poem : हसू कसं येतं
Love Poem : खुशाल पडतो प्रेमात
Love Poem : आयुष्य हरवले माझे
यासारख्या कितीतरी प्रेमकविता सर्वाधिक वेळा पहिल्या गेल्या.
आज टिव्ही वर डिस्कव्हरी पहात होतो. तेव्हा खोल समुद्रातील माशांच्या एका प्रजातीविषयी माहिती मिळाली ती अशी -
या प्रजातीमधील मादिचा मीलनकाळ जवळ आला कि एकाच वेळी वीस वीस नर मासे तिच्या अवतीभोवती फेर धरतात. पाण्यात विविध कसरती करून तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतात. मादी एका नराला पसंत करते. इतर नर दुसऱ्या मादीच्या शोधात निघून जातात. मादी ज्या नराला स्विकारते त्याच्याशी तिचं मिलन होतं. मादी अंडी घालते. उबवते. पिलं जन्मतात आणि नर मादी दोघे मिळून पिलांचं संगोपन करतात.
इतकंच कशाला आपला बया पक्षी. यातील मादीचा विणीचा हंगाम जवळ येतो तेव्हा घरट मादी नाही बांधत काही. घरट बांधण्याचं काम करतो नर. तेही त्यानं एक घरट बांधून नाही चालत काही. त्याला चारसहा घरटी बांधावी लागतात. आणि मादी त्यातलं एक घरट पसंत करून त्यात रहायला जाते आणि तेव्हा कुठे सुरु होतो त्या दोघांचा संसार.
मोर खूप देखणा म्हणून लांडोर त्याला सहज जवळ करत असेल असा तुमचा समाज असेल तर तो मनातून काढून टाका. लांडोरीचा सहवास मिळवायला मोरालाही खुप पाठपुरावा करावा लागतो. तिथंही एक लांडोर आणि चार सहा मोर अशी स्पर्धा असतेच. त्यामुळेच लांडोरीचा सहवास मिळवण्यासाठी मोराला किती यातायात करावी लागते त्याविषयी मोरनाची या शीर्षकाखाली लिहायचं आहे. लिहीन लवकरच.
आता तुम्ही म्हणाल जर प्रेम हि माणसाची अगदी मुलभूत गरज असेल तर मग शृंगार किंवा समागम कशासाठी हवा असतो ?
मित्रहो…
शृंगार किंवा समागम हि गरज नसते माणसाची ती भूक असते. शरीराला उर्जा मिळण्यासाठी जशी अन्नाची गरज असते. तशी मनाला उर्जा मिळण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासाची, त्याच्यासोबतच्या शृंगाराची अर्थात समागमाची गरज असते.
समागम मग तो कुणाचाही असो………..नर आणि मादा माशांचा असो………नर आणि मादा पाखरांचा असो……….मोर लांडोरीचा असो किंवा आपल्यासारख्या प्रगत, बुद्धिमान अशा मनुष्य प्राण्याचा असो. समागम म्हणजे समर्पण असतं मनाच्या तारा जुळल्यानंतरच.

mornachi h lekh kdhi lihinar aahat. mi wat phate aahe.
ReplyDeleteप्राची लिहिण्यासारखे इतके विषय असतात कि मनात असूनही काही विषय मागे पडतात. पण तुमची अपेक्षा लवकरच पूर्ण करीन. लवकरच तुम्हाला मोरनाची हा लेख वाचायला मिळेल.
ReplyDelete