Wednesday 6 August 2014

Bollywood and Rape : बॉलिवूड आणि बलात्कार


Do not rape
बलात्कार आणि त्यासंदर्भातील बातम्या आता नित्याच्याच झाल्या आहेत. याच संदर्भात मी मागे बलात्कार का होतात हा लेख लिहिला होता. पण एका लेखात संपण्यासारखा हा विषय नाही. एकदा लिहून झाल्यावर पुन्हा या विषयावर लिहिण्याची गरजही नव्हती. पण बलात्कारयांना फाशी दिली तरी हा विषय संपला नाही. आजही रोज बलात्कार होताहेत. वर्तमानपत्रात बातम्या येताहेत. टीव्हीवर झळकताहेत. मिडीयाही अशा बातम्या अधिक खोलात शिरून , रंगवून आणि त्या विषयाशी समरस होऊन दाखवताहेत.


मुलायमसिंग आणि त्यांच्या उत्तर प्रदेशातल्या मंत्र्यांबाबत तर काही बोलूच नये. आपण अशा रितीने रेपीस्टची ( बलात्कारी ) बाजू उचलून धरली तर गेलेली सत्ता आपल्याला पुन्हा मिळेल असं त्यांना वाटतय कि काय कुणास ठाऊक ? 

बलात्कारावर खुप चर्चा होत असली तरी बलात्कार का होत असावेत याची मिमांसा कोणीच करत नाही. मीही माझ्या मागील लेखात थोडा फरफटतच गेलो होतो. परवा मला बलात्कार का होत असावेत याचं कारण सापडलं. 

अर्थात स्त्रियांवर बलात्कार होण्याला केवळ ते एकच  कारण आहे असं मी मुळीच म्हणणार नाही. पण अनेक कारणांपैकी ते एक प्रमुख कारण नक्कीच असू  शकतं. बॉलीवुडमुळे बलात्काराची वृत्ती कशी वाढत असेल ते मला जाणवलं. तेवढच इथं लिहिणार आहे. 

झालं काय ! नुकताच मी हॉलीवूडचा Prey ( शिकार ) हा सिनेमा पाहिला. स्टोरी थोडक्यात सांगतो -

एक अमेरिकन कुटुंब आफ्रिकेच्या जंगलात फिरायला गेलेलं असतं. कुटुंब प्रमुख अर्थात वडील सोबत नसता. आई , मुलगा आणि मुलगी. सोबत जंगलचा गाईड. मुलगा साधारणतः १२ वर्षाचा. जंगलामध्ये बराच वेळ फेरफटका मारल्या नंतर त्या मुलाला लघुशंकेला जाण्याची इच्छा होते. गाईड जीपच्या खिडकीतून लघुशंका करण्यास सांगतो. छोटा असला तरी आई आणि मोठी बहीण सोबत असताना अशा रितीने लघुशंका करण्यास तो नकार देतो. 

सहाजिकच गाईड त्याला घेऊन जीपपासून काही अंतरावर जातो. सोबत बंदुक घेतलेली असतेच. पण काही कळण्याच्या आत वाघ येतो. मुलगा कसाबसा जीपमधे परततो पण. वाघ त्या गाईडला ठार करतो. दिवस सरतो. जवळ अन्न नाही. बाटलीभर पाणी पण तेही घोटभर राहिलेलं. वाघाची जीपजवळ बैठक. माणसाच्या रक्ताला चटावलेला वाघ. रात्र सरते. दुसऱ्या दिवसाची दुपार होते. सोबतचं घोटभर पाणी केव्हाच संपलेलं. मुलाच्या घशाला कोरड पडलेली. त्याचा थेंबभर पाण्यासाठी घोषा चाललेला. रक्ताला चटावलेला वाघ दिसत नव्हता पण तो जवळच कुठेतरी दबा धरून बसला असण्याची शक्यताच अधिक. पाणी तर आणायलाच हवं होतं.

आई म्हणे, " मी जाते."
मुलगी म्हणे, " मी जाते."
जणू ," वाघा मला खा. पण बाकीच्यांना सोड. " असं म्हणल्यासारखं.
शेवटी मुलगी पाणी आणायला जाते. पण आधी पाणी शोधायचं असतं. मुलगी उभ्या गवतातनं मिळेल त्या वाटेनं पुढे सरकू लागते. आणि ………

समोरून वाघ झेपावतो. पळणं शक्य नसतं. मुलगी  गच्च डोळे मिटून घेते. आणि वाघ मरून पडतो. क्षणभर तिलाही आणि आपल्यालाही कळत नाही हे कसं झालं. पण नंतर लक्षात येतं दोन काळ्याकभिन्न रानटी शिकाऱ्यांनी त्या वाघाची शिकार केलेली असते.

सिनेमा इथं संपत नाही. पण मला इथं थांबायचं. आणि बॉलीवूड आणि बलात्कार या विषयावर यायचय. झालं  काय आमच्या नव्वद टक्के सिनेमात आम्हाला रेपसीन पाहण्याची सवय झालेली असते. ती आमची मानसिकता झाली आहे. कशी ते सांगतो. 

तो सिनेमा पहात असताना मीही अशीच कल्पना केली कि आता हि दोन्ही मुलं त्या कोवळ्या लुसलुशीत मुलीवर बलात्कार करणार. भुकेलेला वाघ आणि लिंग पिसाट माणुस दोघे सारखेच. 

पण तसं झालं नाही. ती मुलं तिला पाणावठ्यावर घेऊन गेली. तिच्याकडं पाणी भरून नेण्यासाठी काही नव्हतं. त्यासाठी त्यांनी तिला रानातली आतून पोकळ असलेली भोपळ्यासारखी वाळलेली फळं दिली. त्यांचं त्याला भोक पडून दिलं. आणि तिला जीपपर्यंत पोहचवल.

कसली ही  आमची मानसिकता. माझ्या सारख्या लेखकाच्या मनातही वेगळा विचार आला नाही. तर मग ज्यांना काही विचारसरणीच नाही ती गुंड प्रवृत्ती तर अशा वेळी बलात्काराच करणार ना. कारण आमच्या सिनेमांनी आमची विचारसरणीच तशी केली आहे.

Do not rape
त्यामुळेच एकतर सिनेमात रेपसीन दाखवण्यास मज्जाव केला पाहिजे अथवा कमीतकमी जसा, ' धुम्रपान आरोग्यास घातक आहे.' असा इशारा दिला जातो तसाच, ' बलात्कार करणे हा गुन्हा असुन. अशा कृष्णकृत्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या सहभागी असणाऱ्यांना कठोर शासन होऊ शकते असा इशारा देणे बंधनकारक केले पाहिजे 


No comments:

Post a Comment