Monday, 1 September 2014

Indian Festiva l: गणेश चतुर्थी का साजरी करतात ? कथा २

मी मागील भागात सांगितलेल्या कथेला पुराणांचा आधार आहे हो त्यातील काही स्थळांचा उल्लेख मात्र काल्पनिक आहे. हि दुसरी कथासुद्धा पुरणाचा संदर्भ असणारी -


पार्वतीला मातेला स्नानास जावयाचे होते. परंतु भगवान शंकर महालात नव्हते. आता आपण स्नान गृहात गेलो आणि कुणी अपरिचित आले तर ? असा प्रश्न मनी उदभावातच पार्वती मातेने आपल्या अंगावरील मळापासून एका सुंदर , शूर आणि गुणी मुलाची मूर्ती बनवली. त्या मूर्तीत प्राण ओतले. त्या सजीव मुलाने पार्वतीला, " माते " म्हणत वेढले. त्या बाल लीलातून स्वतःला मुक्त करीत पार्वती त्यास म्हणाली , " हे बघ बाळ , मी स्नानास जाते. मी स्नानाहून प्रत येईपर्यंत महालात कोणासही प्रवेश देऊ नकोस."

पार्वती स्नानास गेली. छोटा मुलगा व्दार रक्षक म्हणून आपल्या मातेचे रक्षण करण्यास दारात ठाण मांडून उभा राहिला.

इतक्यात तेथे भगवान शंकर आले. घरात प्रवेश करू लागले. परंतु त्या छोट्या मुलाने भगवान शंकरांना घरात प्रवेश करण्यास अटकाव केला. भगवान शंकरांनी त्या मुलास सर्वोतोपरी समजावून सांगितले. परंतु आपणास आत प्रवेश करावयाचा असेल तर माझ्याशी युद्ध करून व मला पराभूत करूनच पुढे जाता येईल असे त्या छोट्या मुलाने सांगितले. शंकराच्या गणांनी त्यासोबत युद्धही केले. सारे पराभूत झाले. शेवटी स्वतः भगवान शंकरांनी त्रिशुळाने त्या मुलाचा शिरच्छेद केला. इतक्यात पार्वती स्नान गृहातून बाहेर आली व क्षणापूर्वीच ज्या मुलाने आपणास मते म्हणत मिठी मारली त्याचे धडावेगळे झालेले शीर पाहून संतापली. हे सारे भगवान केल्याचे समजल्यावर संतापली. आपल्या मुलास पुन्हा सजीव करण्याचा ह्ट्ट करू लागली. परंतु मृत जीवास पुन्हा जीवन देणे हे निसर्ग नियमांच्या विरुद्ध होते. परंतु पार्वती ऐकण्यास तयार नव्हती.

तेवढ्यात तिथे ब्रम्हदेव आले व उत्तर दिशेस जो कोणी जीव प्रथम दिसेल त्याचे शीर धडावेगळे करून यास जोडल्यास हा जिवंत होईल असे सांगू लागले. भगवान शंकरांनी त्वरित सगळ्या गणांना उत्तर दिशेस धाडले. त्यांना प्रथम दिसला तो इंद्राचा हत्ती. त्यांनी त्याचे मस्तक धडावेगळे केले व ते भगवान शंकरांना आणून दिले. भगवान शंकरांनी ते हत्तीचे शीर मृत धडावर ठेवताच त्यास जीवन प्राप्त झाले. गज म्हणजे हत्ती. अनन म्हणजे शीर. हत्तीचे शीर त्या मुलास जोडल्यामुळे त्या मुलाचे नामकरण गजानन असे करण्यात आले. तो दिवस चतुर्थीचा होता. गणेशाचा पुनर्जन्म त्या दिवशी उत्सव स्वरुपात साजरा करण्यात आला. तेव्हा पासून तो दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा करण्यात येतो.

( लक्षात घ्या गणेश चतुर्थी म्हणजे गणेश जयंती नव्हे. ) 

2 comments:

  1. गणेशजन्माची कथा माणूस केव्हा बोलू लागला याकडे निर्देश करते असे माझे मत आहे. माणूस बोलू शकतो तो त्याचे मेंदूतील ऐकण्याचे आणि आवाज काढणारे केंद्र एका ठिकाणी असल्याने ही बाब आधुनिक शास्त्रालाही मान्य आहे. पण हे केव्हा घडले याबद्दल अधुनिक शास्त्र काही सांगत नाही. इतर प्राण्यांत नसलेली ही कुवत मानवात कशी निर्माण झाली हा प्रश्र्न अजून या शास्त्राला पडावयातात आहे. कोणत्यातरी जबरदस्त अपघातामुळे अशी कुवत निर्माण झाली असे ही कथा सुचवीत असावी.

    ReplyDelete
  2. मनोहरजी, खुपच वेगळा विचार मांडलात. आपघाताना कुठल्या कुठल्या गोष्टी घडल्या असे मानावे. पृथ्वीची निर्मिती आपघाताने झाली, तुमच्या म्हणण्यानुसार गणेशजन्माची कथा माणूस केव्हा बोलू लागला याकडे निर्देश करते असे माझे मत आहे. आपण केवळ जे आहे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. पण या सार्या निर्मितीमागे एक शक्ती निश्चित आहे आणि ती म्हणजेच परमेश्वर. त्याच्यावर विश्वास आणि श्रद्धा ठेवण एवढंच आपल्या हाती.

    ReplyDelete