Friday 8 March 2019

#मिशन_मोदी : देशाच्या अधोगतीला केवळ काँग्रेस जबाबदार ?

narendra modi, rahul gandhi, soniya gandhi, bjp, congress
काँग्रेस आजवर देशाची दिशाभूल करीत आली आहे. आणि असे करताना देशाला अत्यंत बिकट वळणावर नेऊन ठेवले आहे. कधीकाळी शाळेत असताना नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी हरित क्रांती ( शेतीविषयक ) आणि धवल क्रांती ( दुग्ध विषयक ) केल्याचे सांगितले जात असे. पण
आजही भारताला दुष्काळाची झळ बसते आहे. शेतीसाठी व्हायला हवा तेवढा पाणीपुरवठा होत नाही. दुधाच्या भावरून शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येते आहे. राजीव गांधी यांनी संगणक क्रांती केल्याचे सांगितले जाते. त्यांनी दूरसंचार क्रांती केल्याचेही सांगितले जाते. परंतु वर्षानुवर्षे सत्तेत राहूनही काँग्रेसला देशातल्या गरिबीचे आणि बेकारीचे निर्मूलन करता आलेले नाही. आणि आज सत्तर वर्षांनंतरही गरीब, शेतकरी आणि दलित हीच काँग्रेसची व्होटबँक आहे. कारण अजूनही हि मंडळी विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. मग मोदींना पाच वर्षात जबाबदार धरणारी मंडळी काँग्रेसने इतक्या वर्षात काय केले असा प्रश्न का नाही विचारीत ?
काँग्रेसने विकास केला असे काँग्रेसचे समर्थक सांगतात. पण भारताच्या सोबत अथवा भारताच्या नंतर स्वतंत्र झालेल्या अनेक देशांकडे पहिले तर आपण अजून खूप मागे असल्याचे दिसते. अजूनही आपण बुलेट ट्रेनला विरोध करण्याच्या मानसिकतेत आहोत. सिंगापूर, जपान, रशिया हि राष्ट्रे आपल्या कितीतरी पुढे आहेत. दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेला जपान आज अमेरिका, जपान, जर्मनी यासारख्या राष्ट्रांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करतो आहे. बरं हा जपान देश तरी केवढा ? अवघ्या आमच्या महाराष्ट्राएवढा. तरीही आम्हाला कर्ज देऊ शकतो. बुलेट ट्रेनचं तंत्रज्ञान देऊ पाहतो. आणि आम्ही स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाली तरी, आरक्षण, अनुदाने, सरकारी सवलती असल्या जोखडात अडकून पडलो आहोत. कारण काँग्रेसने या देशाची मानसिकता तशी करून ठेवलेली आहे. आजही आम्हाला बेकारी, महागाई, दुष्काळ याच गोष्टींची चिंता आहे. आजही आमच्या देशातला नागरिक स्थिर नाही. याला जबाबदार कोण ? ७५ पैकी ६० वर्षे या देशावर राज्य करणारी काँग्रेस कि १५ वर्षात विभागून सत्तेत असलेले इतर पक्ष ? जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे एवढच काम काँग्रेस करत आली आहे. आणि म्हणूनच आजही सर्जिकल स्ट्राईकची, एअर स्ट्राईकची पाठराखण न करता काँग्रेस पुरावे मागत फिरते आहे. राफेल देशात आलं तर चीनला शह बसेल म्हणून राफेलवर प्रश्न उपस्थित करते आहे. काँग्रेस असो, मायावती असो, ममता असो वा अन्य कोणी नेते त्यांना देशहित मुळीच महत्वाचे वाटत नाही. त्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे सत्ता आणि त्या सत्तेतील त्यांचा वाटा. त्यामुळेच या कौरवांच्या हाती सत्ता द्यायची कि अर्जुनाच्या हे जनतेनं ठरवायला हवं. कारण आमचा स्वार्थ समोर ठेवून आज आम्ही निर्णय घेतला या चोरांच्या हाती सत्ता दिली तर पुढच्या पिढ्यांचं भविष्य अंधारात लोटलं जाईल हे नक्की. आज आम्ही बेकारी साठी मोदींना दोष देत आहोत. खरेतर आम्ही पंचवीस वर्षांपूर्वी आणि त्याआधीही काँग्रेसच्या हाती सत्ता देणाऱ्या आमच्या पूर्वजांनाच दोष द्यायला हवा.

No comments:

Post a Comment