Monday, 11 March 2019

#मिशन_मोदी : यातल्या घराणेशाहीवर बोट कोण ठेवणार ? why parth pawar ?

politics, ajit pawar, parth pawar, narendr modi, ncp
पार्थ पवार निवडणूक लढवणार हे सगळ्यांनाच माहित होतं. काय तर म्हणे कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पार्थला तिकीट देणे भाग आहे. पण कार्यकर्ते कोण
तर यांचे नेहमीचे बगलबच्चे. लाळ घोटत यांच्या मागेपुढे फिरणारे. संतरंज्या उचलण्यात धन्यता मानणारे गुंठे बहाद्दर. परंतु भाजपवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या पत्रकारांना, विचारवंतांना, बुद्धिजीवींना यातली घराणेशाही दिसत नाही का? शरद पवार आहेतच. मागोमाग अजित पवार आहे. पण तो काही पोटचा गोळा नाही म्हणून म्हणून मग सुप्रिया सुळेंना राजकारणात आणले. आता पुढच्या पिढीला दारे खुली करण्यासाठी पार्थ पवारला उभे करण्याचे निर्णय घेतले.

सुरवातीला पार्थ पवार याच्यासाठी आवश्यक वातावरण रंगविण्यात आलं. पण वाट्याला आलेल्या २४ पैकी ३ लोकसभा मतदार संघात एकाच घरातले उमेदवार उभे केले तर बरं दिसणार नाही. लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा रोष ओढवेल. म्हणून मग शरद पवारांनी पार्थ उभा राहणार नाही असं जाहीर केलं. हि सारी नौटंकीच होती. कार्यकर्त्यांचं नाव पुढे करत आणि सुनील तटकरे यांना वकिली करायला लावत अखेरीस पार्थ पवार याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंच. आता इथे कोणीही घराणेशाहीचा आरोप करणार नाही. आणि केला तरी कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढे साहेबांना माघार घ्यावी लागली असं म्हणायला पत्रकारांसह सगळेच मोकळे.

तरुण चेहरा दिल्यामुळे तरुणाई पार्थच्या पाठीशी उभी राहील. आमदार लक्ष्मण जगताप आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यातले अंतर्गत कलह पार्थच्या फायद्याचे ठरतील. आणि मोदी विरोधातली जी काही थोडीशी झुळूक दिसते आहे तिच्या गारव्याने पार्थ विजयी होईल अशी सगळी गणितं पार्थला बोहल्यावर उभं करण्यामागे आहेत. पण मोदी विरोधाची हि झुळूक म्हणजे मृगजळ आहे याची जाणीव सर्व विरोधकांना आहे. पण पार्थ पराभूत झाल्यावर आमदारकीवर तरी हक्क सांगता येईल हा हेतू. पण यातल्या घराणेशाहीवर बोट कोण ठेवणार ?

स्मिता पाटील हिला तिथे तिकीट देण्याची जी काही खेळी केली ती केवळ मतदार संघातील अन्य कोणी त्या जागेवर दावा सांगू नये म्हणून. आणि केवळ डमी म्हणून. स्मिता पाटील तिथे विजयी होणं शक्य नाही हे का कुणाला कळत नाही. पण तिलाही जरा बरं वाटावं म्हणून तिचं नाव पुढं करण्यात आलं होतं. अर्थात तिला तिकीट मिळणार नव्हतंच आणि दिलं असतं तरी ती बळीचा बकरा ठरली असती. 

No comments:

Post a Comment