Wednesday, 13 March 2019

#मिशन_मोदी : फक्त भाजपचं या देशाला दिशा देऊ शकतो ? only BJP can give direction to country

bjp, congress, narendra modi, rahul gandhi,
महिना झालं मी मिशन मोदी हा टॅग घेऊन पोस्ट लिहितो आहे. पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर झाल्या. लेख आवडणारे अभिप्राय जसे आले तसेच लेखावर नकारात्मक प्रतिक्रिया नोंदविणारे अभिप्राय सुद्धा आले. नकारात्मक अभिप्राय नोंदविणाऱ्या मंडळींची खाती चाळली.
मी जातपात मानत नाही तरी उल्लेख करणं गरजेचं वाटतं. नकारात्मक अभिप्राय नोंदविणारी बहुतेक मंडळी आंबेडकरी विचारधारेची आहेत. वर्षानुवर्षे काँग्रेसी संस्कृतीत आणि आरक्षणाच्या उबेत वाढलेली हि मंडळी काँग्रेसचं बोट कसं सोडतील ? देशातील ८० टक्के व्यक्तींना देशापेक्षा आपले हित अधिक महत्वाचे वाटते. आपला स्वार्थ अधिक महत्वाचा  वाटतो. गरिबी हटाव या एकाच घोषणेवर काँग्रेसने दशकामागून दशके देशावर सत्ता गाजवली. पण गरिबी संपली का ? त्या संदर्भात लेख लिहून झाला आहे म्हणून त्यावर सविस्तर लिहीत नाही.

पण मला आठवतं आहे अटलबिहारी वाजपेयी सत्तेत आले आणि त्या पाच वर्षात देशातल्या प्रमुख शहरांना जोडणारे रस्त्यांचे महाकाय प्रकल्प अस्तित्वात आले आणि पूर्ण झाले. नदी जोड प्रकल्प होऊ शकतो आणि शेतीला मुबलक पाणी मिळू शकते हा विचार मांडला गेला. देशातले सर्व वीज प्रकल्प एकत्र जोडण्याची कल्पना मांडली गेली. विकास अशा प्रकारे होतो याची सामान्य माणसाला जाणीव सुद्धा नव्हती. पुन्हा काँग्रेस साकार आलं आणि विकासाचे सगळे मुद्दे मागे पडले. बोगस कंपन्या आल्या, रोजगाराचे बोगस आकडे आले, बँकांचे NPA लपविण्यात आले. झालं काय तर २G स्पेक्ट्रम झाले, कोळसा खाण घोटाळा झाला एक ना अनेक. काँग्रेसने साठ वर्षाच्या कारकिर्दीत घोटाळ्यांशिवाय अन्य फार काही केले नाही. नव्वदच्या दशकातले हर्षद मेहताचे स्टॉक मार्केट घोटाळे, तेलगीचे स्टॅम्प ड्युटीतले घोटाळे हे तर तरुण पिढीला माहित सुद्धा नसतील.

काँग्रेसने काय केलं तर प्रत्येक सरकारी योजनांना गांधी घराण्याची नावे देऊन गांधी घराण्याला अजरामर करण्याचा आटापिटा केला. काँग्रेसच्या बगलबच्च्यांनी  नेहरू, इंदिरा, राहुल, सोनिया यांच्या नावाने खाजगी शिक्षण संस्था, शाळा, कॉलेज सुरु करायचे आणि सरकारने त्यांना डोळे झाकून परवानग्या द्यायच्या. मोदींनी स्वतःच्या नावे सुरु केलेली एकतरी योजना दाखवावी. हो एखादी दुसरी योजना अटलजींच्या, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने सुरु केली असेल. पण त्यात कोणत्या घराण्याला नव्हे तर व्यक्तींच्या कर्तुत्वाला महत्व देण्यात आले.

काँग्रेसला साठ वर्षात तरुणांच्या बेकारीचे, शेतमालाच्या बाजारभावाचे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रश्न मिटवता आले नाहीत. आणि केवळ पाच वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या मोदींकडून आम्ही सगळ्या समस्यांवर तोडग्याची अपेक्षा करतो. मोदींनी देशाची आंत्रस्थिर राजकारणात जी प्रतिमा उंचावली ती आम्हाला महत्वाची वाटत नाही. पाकिस्तानाने अभिनंदनला दोन दिवसात सोडल्यावर आम्ही जिनिव्हा कराराचा दाखला देऊन मोदींच्या परराष्ट्र नितीला त्याचे श्रेय देण्याचे टाळतो. मोदींना एवढे पाण्यात पाहणाऱ्या मंडळींनी भूतकाळ जरा चाळून पहावा. मोगलांच्या घोड्यांना जसे पाण्यात संताजी धनाजी दिसायचे तसा तसा त्यांनाही सगळीकडे विकास दिसेल.

काँग्रेसला अथवा महाआघाडीला सत्तेत आणणं म्हणजे आपण आपल्या हाताने या देशाच्या विकासात आत्मघातकी बॉम्ब पेरणे होय. काय करायचं हे जनतेनं ठरवावं.

No comments:

Post a Comment