Tuesday, 26 February 2019

#मोदी_मिशन : राज ठाकरे सारखे राज्यकर्ते हेच खरे देशद्रोही. - rulers like Raj Thackeray are the true traitors

narendra modi, rahul gandhi, pulvama attack, raj thakre, ,
मागचे पाच सहा दिवस खूपच धावपळीत होतो. मनात असूनही पोस्ट करू शकलो नाही. पुलवामा हल्ला घडला आणि विरोधकांचा आत्मविश्वास ढासळला. आपण जीवाचा आटापिटा करून रान उठवले. तत्व गुंडाळून ठेवून आघाड्या केल्या. आणि
आता हि घटना घडली. आता मोदी सर्जिकल स्ट्राईक पेक्षा काहीतरी जबरदस्त कारवाई करतील आणि आपल्या हातातोंडाशी आलेला घास जाणार. मोदी पुन्हा बहुमताने सत्तेत येणार.

याच भीतीने राज ठाकरेसारखा मूर्ख माणुस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची चौकशी व्हावी असे सांगतो. तिकडे ममता बॅनर्जी मोदींनी सैन्यांना मृ दिले असे वक्तव्य केले. यांचे तर कामच आहे ते. परंतु परवा एका व्यासपीठावर एका कवीला ऐकलं. पोटातले आतडे ओठात आणून हा माणूस कविता सादर करत होता. मोदींचे नाव घेऊन बोंब मारत होता. म्हणे ," मोदीजी आता तुम्ही एखादे सर्जिकल स्ट्राईक करून शहिदांच्या टाळूवरच लोणी खाण्याचं काम करणार." आपली लायकी काय? आपण बोलतो काय ?

इतकेच कशाला विविध चर्चासत्रात बोलणारे वक्ते ऐकले. सगळ्यांची बोंब एकच. मोदींनी व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली. अक्षरशः सुपारी घेतल्याप्रमाणे स्वतःला विचारवंत म्हणवणारी हि सर्व मंडळी बोलत होती. साहित्य संमेलन हि साहित्यासाठी काम करणार व्यासपीठ राहिलेलं नसून सरकार विरोधात बोंब मारण्याचं ठिकाण झालं आहे विरोधकांशी हातमिळवणी केलेल्या पोपटाप्रमाणे हि मंडळी बोलत असतात. देश, त्याची प्रगती,  मानवता याच्याशी कोणाला काहीही घेणेदेणे उरलेले नाही. तुम्ही आम्हाला आज तुमच्या व्यासपीठावर बोलावलं आहे. पुन्हा बोलवावं म्हणून आम्ही तुम्हाला हवे तसे बोलू.

सर्जिकल स्ट्राईकचा पुरवा मागणाऱ्या, पुलवामा हल्य्यात मोदींच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी त्याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या, मोदी हटाव यापेक्षा अन्य कोणताही अजेंडा नसलेल्या विरोधकांच्या हातात सत्ता देणे किती धोक्याचे आहे हे प्रत्येकाला चांगले कळून चुकले आहे. मोदी सत्तेत आले नाही आले तर त्यांना काहीही फरक पडणार नाही. प्रश्न आहे तो देशहिताचा. त्यामुळेच पुन्हा मोदीच सत्तेवर येणं हि देशाची गरज आहे.

त्यातही महत्वाचं म्हणजे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी. आणि म्हणूनच आजचा मुहूर्त साधून भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्याला अधिक महत्व प्राप्त होते. मोदीजी ४०० पेक्षा अधिक मताधिक्याश सत्तेत येतील असा मला विश्वास आहे.    

No comments:

Post a Comment