प्रेम हि केवढी प्रचंड भावना आहे. जगात दुसऱ्या कुणावर प्रेम करत नाही असा जीव शोधुन सापडणार नाही. माणूस माणसावर प्रेम करतोच पण माणुस पशुपक्षांवरही प्रेम करतो. पशुपक्षांवर प्रेम करण्याच्या माणसाच्या या स्वभावाला भूतदया म्हणतात. पण प्राणीसुद्धा माणसांवर जीवापाड प्रेम करतात. प्राणी का करतात माणसावर प्रेम ? केवळ
दोन वेळच्या चाऱ्यासाठी ती माणसावर प्रेम करत असतील हे नाही पटत मनाला. कारण ज्यानं चोच दिली तो दाणा देणारच असतो. दोन वेळचा चारा तर रानोमाळी कुठेही मिळणार असतो. तरीही काही प्राणी का माणसाच्या आश्रयाला आले असतील ? या कारण मलाही नीटसं नाही सांगता यायचं. पण प्राणी माणसावर प्रेम करतात एवढ मात्रं खरं. प्राण्यांच्या प्रेमाचे दाखले देणारे माझे बैल आणि मी आणि दिवाळी माझ्या बैलाची हे लेख रसिकांना खूप आवडले होते.

मला माझ्या कुत्र्याविषयीसुद्धा मला लिहायचंय. घराभोवतालच्या चिमण्यांविषयी लिहायचं, गावाकडच्या अंगणातल्या कोंबड्यांविषयी पण सवड मिळत नाही.
पण प्रेमाशिवाय आयुष्य म्हणजे वाळवंट. रखरखीत. निष्पर्ण. निर्जिव.
पण हे प्रेम आयुष्याच्या ऐन उमेदीतलं असेल तर. प्रेमात पडण्याच्या वयात भेटलेल्या परीविषयी असेल तर. तर त्या प्रेमाला तोडच नाही.
कारण तिच्याशिवाय आयुष्य म्हणजे सुरांशिवाय गाणं........
तिच्याशिवाय आयुष्य म्हणजे हरवलेलं चांदणं.
ती असते आपल्या आयुष्याला कुठल्याशा एका वळणावर पडलेलं स्वप्नं. आपल्याही नकळत ते स्वप्नं साक्षात उतरतं.........आपल्याभोवती प्रेमाचं चांदणं भिरभिरतं. अळवाच्या पानावरचा थेंब जपावा इतक्या हळूवारपणे तिच्यासोबतच प्रत्येक क्षण जपावासा वाटतो........ ती नसते सोबत तेव्हाही आपल्याला तिचा सहवास लाभतो.
ती दाही दिशात........ती आपल्या प्रत्येक श्वासात.पानाफुलात तिचं हसू........तीच लागते स्वप्नात दिसू.
ती भुईमधुन उगवणारा अंकुर.......ती जखमेवरची फुंकर.
ती शराब होऊन नसानसात भिनलेली.........ती पैंजण होऊन आपल्या आयुष्यात रुणझुणलेली.
ती जशी सखी असते आपली तशीच मूर्तीमंत देवताही असते आपल्या आयुष्यातली.
ती शराब होऊन नसानसात भिनलेली.........ती पैंजण होऊन आपल्या आयुष्यात रुणझुणलेली.
ती जशी सखी असते आपली तशीच मूर्तीमंत देवताही असते आपल्या आयुष्यातली.
अशाच भावना मनात असणारा या कवितेतला तिचा सखा म्हणतोय, " तू माझ्या आयुष्यात आल्यापासून प्रत्येक दिसेल मला तूच दिसतेस. तूच प्रत्येक पानाफुलातून हसतेस. भुईमधुन नुकत्याच अंकुरणाऱ्या कळीनं दवबिंदुना मिठीत घ्यावं एवढ्या निरागसतेनं तू मला कुशीत घेतेस.
तू नुसतीच सुखात सोबत करत नाहीस मला तर जेव्हा मी संकटात सापडतो तेव्हा तूच मला पैलतीराला नेणारी नौका होतेस. म्हणूनच तू नुसती सखी नसतेस माझी तू असतेस माझी मूर्तीमंत देवता. तू जगण्यातली गोडी....तू सुखाचे सर.......आणि तूच होय तूच माझ्या आयुष्यातल्या आनंदाच्या राशी."
Khup surekh.
ReplyDeleteआभार प्रियाजी. आपण माझ्या ब्लॉगला पहिल्यांदाच भेट दिलेली दिसते. रिमझिम पाऊसवर आपले मनापासून स्वागत. यापुढे आपण नियमित भेट देऊन योग्य अभिप्राय दयाल हि अपेक्षा.
Delete